आपल्या मोहक आणि सुंदर स्टाइलने अंकिताने चाहत्यांची मने जिंकली आहेत. नवीन अवतारातील काही सुंदर फोटो तिनं नुकतेच शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिनं पांढऱ्या रंगाची साडी नेसल्याचे तुम्ही पाहू शकता. तिच्या या फोटोंवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला जात आहे. तर काही जणांनी तिच्या या साडीचे कनेक्शन सुशांत सिंह राजपूतसोबतही जोडले. (सर्व फोटो क्रेडिट – इन्स्टाग्राम)
(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)
साडीवरील थ्रेड वर्क
अंकिताने सी- थ्रू मटेरिअल असणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील आपले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या संपूर्ण साडीवर थ्रेड वर्क करण्यात आल्याचे दिसत आहे. साडीच्या पदरावर पाने आणि फुलांची एम्ब्रॉयडरी दिसत आहे. साडीवर धाग्याने बारीक विणकाम केल्याचे तुम्ही पाहू शकता. यामुळे साडी अतिशय सुंदर दिसत आहे. साडीच्या बॉर्डरवर सोनेरी रंगाचे सीक्वेन्स वर्क करण्यात आलंय.
परिधान केलं बोल्ड डिझाइनचं ब्लाउज

अंकिताने या साडीवर हॉल्टर नेकलाइनचे ब्लाउज परिधान केलं होतं. ब्लाउजचा खांद्यावरील भाग पूर्णतः शीअर मटेरिअलने डिझाइन करण्यात आला आहे. या पॅटर्नमध्ये पांढऱ्या कापडाचाही वापर करण्यात आल्याने ब्लाउजला ट्युब डिझाइन प्रमाणे इफेक्ट मिळाला आहे. साडीशी मॅचिंग असणारी गोल्डन बॉर्डर ब्लाउजवरही दिसत आहे. या साडीवर अंकिताने चंदेरी आणि सोनेरी रंगाचे ईअररिंग्स मॅच केले होते.
(Ankita Lokhande ‘पवित्र रिश्ता’मधील अंकिता लोखंडेचा स्टायलिश अवतार)
सुशांत सिंह राजपूतसह जोडले कनेक्शन

अंकिताची ही पांढरी साडी पाहिल्यानंतर लोकांना सुशांत सिंह राजपूतची आठवण आली. एका युजरने लिहिलं की, ‘हीच साडी नेसून तुम्ही सुशांतसोबत एका व्यासपीठावर आल्या होतात’. तर दुसऱ्या व्यक्तीने म्हटलं की, ‘माझ्या मते सुशांतची ही आवडती साडी असावी, कारण हीच साडी यापूर्वीही अनेकदा पाहिली गेलीय’. दरम्यान, चाहत्यांनी अंकिताच्या रूपाचेही प्रचंड कौतुक केलं. कमेंट बॉक्समध्ये काही जणांनी हार्ट इमोजी शेअर करत तिची स्तुती केली.
(अंकिता लोखंडेनं हिना खानची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)
साडी पॅटर्न आहे वेगवेगळे?

दरम्यान नेटिझन्स चर्चा करत असलेली साडी आणि अंकितानं नुकतेच शेअर केलेल्या फोटोतील साडी, दोन्ही पॅटर्न वेगवेगळे आहेत. नीट पाहिल्यास तुम्हालाही यातील फरक दिसेल. सुशांतसह असलेल्या फोटोमध्ये अंकिता ज्या पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसतेय, ती नेट पॅटर्नची साडी आहे. त्यावर पूर्णतः मायक्रो सीक्वेन्स वर्क करण्यात आले होते. साडीच्या बॉर्डरवर देखील हेच डिझाइन दिसत आहे.
(जेव्हा अंकिता लोखंडेनं परिणिती चोप्राची स्टाइल केली होती कॉपी, चाहते म्हणाले…)
साडी किंमत माहिती आहे का?

तर इन्स्टाग्रामवर अंकिताने शेअर केलेल्या फोटोतील साडी अंकिताने ‘पवित्र रिश्ता’ मालिकेच्या शूटिंगसाठी घेतली होती. मालिकेमध्ये तिचा आणि सनी लियोनीचा एक स्पेशल डान्स सीन शूट करण्यात येणार होता. याच सीनसाठी अंकिताने ही साडी घेतली होती. विशेषतः या सीनसाठी तिने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांच्याकडून साडी घेतली होती. त्यावेळेस या साडीची किंमत जवळपास १ लाख रुपये एवढी होती.
(Ankita Lokhande सुंदर साडीतील अंकिता लोखंडेच्या मोहक अदा, पाहा फोटो)
Source link
Recent Comments