अंडे की पनीर, कोणता पदार्थ आहे प्रोटीनचा उत्तम स्रोत? जाणून घ्या माहिती

Spread the love

कोणत्या पदार्थामध्ये ​प्रोटीनचे प्रमाण सर्वाधिक आहे?

– दोन प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थाची तुलना केली जाते, त्यावेळेस आपल्या मनात पहिला प्रश्न असा उपस्थित होतो की ‘पनीर’ आणि ‘अंडे’ यापैकी कोणत्या पदार्थांद्वारे शरीराला सर्वाधिक प्रोटीनचा पुरवठा होतो?

– दोन मोठ्या आकाराच्या अंड्यांचे वजन जवळपास १०० ग्रॅम एवढे असते. यामध्ये अंदाजे प्रोटीनची मात्रा १४ ग्रॅम इतकी असते. तर १०० ग्रॅम पनीरमध्येही प्रोटीनचे प्रमाण १४ ग्रॅम एवढंच असते. अशा प्रकारे या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीनची मात्रा जवळपास समानच आहे.

(Health Care Tips अपचनाची समस्या दूर करण्यासाठी हिरडा खाणे योग्य ठरेल का?)

​पनीर आणि अंड्याची तुलना

अंडे (Health Benefits Of Egg in Marathi) आणि पनीर दोन्हींमधील पोषक तत्त्वांमुळे आपले स्नायू निरोगी व मजबूत राहतात. या दोन्ही पदार्थामध्ये पुरेशा प्रमाणात पोषक घटकांचा समावेश असतो. ज्यामुळे आपल्या शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या पेशींना पुरेसा ओलावा मिळतो तसंच ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. यामुळे स्नायूंचे आरोग्य निरोगी राहते.

(मधुमेह होण्याची नवी कारणे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)

​हाडे बळकट होतात

– पनीर आणि अंड्याद्वारेही आपल्या शरीराला कॅल्शिअमचा पुरवठा होतो. जेव्हा आपल्या शरीरात कॅल्शिअमची कमतरता निर्माण होते तेव्हा ही झीज भरून काढण्यासाठी शरीर हाडांमधील कॅल्शिअम शोषून घेते.

– या अवस्थेत हाडे कमकुवत होऊ लागतात. परिणामी हाडांशी संबंधित गंभीर समस्यांचा सामना करावा लागण्याची शक्यता असते. शरीराचे हे नुकसान टाळण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पनीर किंवा अंड्याचा योग्य प्रमाणात आहारामध्ये समावेश करावा. अंड्यामुळे आपल्या हाडांना व्हिटॅमिन डीचा देखील पुरवठा होतो.

(Knee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या घरगुती उपाय)

​स्नायूंच्या निर्मितीसाठी

अंड्याच्या सेवनामुळे आपल्या स्नायूंना भरपूर लाभ मिळतात. अंड्यातील पांढऱ्या भागामध्ये प्रोटीन आणि अमिनो अ‍ॅसिडचे प्रमाण जास्त असते. या पोषक तत्त्वामुळे शरीरात स्नायूंची निर्मिती होण्यास मदत मिळते. सोबत अंड्याच्या सेवनामुळे स्नायू मजबूत देखील होतात. याच कारणामुळे व्यायाम करणारे, जिममध्ये जाणाऱ्या व्यक्ती आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंडे खाल्ल्याने दिवसभरासाठी शरीराला योग्य प्रमाणात ऊर्जा मिळते.

(कंबरदुखी दूर करण्यासाठी व कमरेच्या स्नायूंसाठी उपयुक्त आसन, वाचा तज्ज्ञांनी दिलेली माहिती)

त्वचेसाठी पनीर व अंड्याचे फायदे

त्वचा निरोगी राहण्यास उपयुक्त असलेले पोषक घटक अंडे आणि पनीरमध्ये आहेत. या घटकांमुळे चेहऱ्यावरील सुरकुत्यांची समस्या दूर होण्यास मदत मिळते. पनीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आहे. त्वचा निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन ए पोषक असते. नितळ त्वचेसाठी आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए युक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा.

(Evening Exercise And Yoga संध्याकाळी योगासने किंवा व्यायाम करण्याचे फायदे)

NOTE आपल्या आहारामध्ये कोणतेही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्यानुसारच डाएट फॉलो करावा. दुसऱ्या व्यक्तीचे डाएट प्लान फॉलो करण्याची चूक करू नये.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *