अंबानींची लाडकी लेक ईशाच्या या स्टायलिश गोल्डन ड्रेसची किंमत माहीत आहे का?

Spread the love

बॉलिवूडमध्ये ट्रेंडी फॅशनची चर्चा केली जाते तेव्हा अंबानी कुटुंबातील महिला सदस्यांंच्या नावाचाही आवर्जून उल्लेख केला जातो. नीता अंबानी यांच्या प्रमाणेच त्यांची लाडकी लेक ईशा अंबानी देखील स्टायलिश आहे. दरम्यान संपूर्ण अंबानी कुटुंबीयांप्रमाणे ईशा अंबानीचा (Isha Ambani) स्वभाव सुद्धा विनम्र आहे. त्यांच्याकडे संपत्तीची कमतरता नाही, पण या श्रीमंतीचा देखावा करताना ईशा कधीही दिसत नाहीत.

याच कारणामुळे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या लाडक्या लेकीचा स्वभाव सर्वांना आवडतो. ईशा अंबानी शांत आणि मैत्रीपूर्ण स्वभावासहीत आपल्या हटके स्टाइलसाठीही प्रसिद्ध आहे. तिच्या आउटफिटशी संबंधित तपशील देखील अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो. अशीच काहीशी चर्चा तिच्या गोल्डन ड्रेससंदर्भातही झाली होती. जाणून घेऊया याबाबतची माहिती. (फोटो क्रेडिट : इन्स्टाग्राम)
(Radhika Merchant नीता अंबानींच्या होणाऱ्या सूनेचे हे पाच डिझाइनर लेहंगे पाहिले का?)

​अ‍ॅमी पटेलने केलं होतं स्टाइल

सुप्रसिद्ध सेलिब्रिटी स्टायलिस्ट अ‍ॅमी पटेलने (Ami Patel) एका कार्यक्रमासाठी ईशा अंबानीला स्टायलिश लुक दिला होता. अ‍ॅमी पटेलने ईशा अंबानीसाठी सोनेरी पिवळ्या रंगाच्या ड्रेसची निवड केली होती. या ड्रेसवर संपूर्णतः फ्लोरल प्रिंट डिझाइन तुम्ही पाहू शकता. गडद सोनेरी आणि चॉकलेटी रंगाच्या छटेचं मिश्रण यामध्ये दिसत आहे. तसंच ड्रेसच्या फॅब्रिकवर चमक दिसत होती. ज्यामुळे आउटफिटचा लुक अधिक आकर्षक वाटत होता.

(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)

​ड्रेसमध्ये होतं रफल आणि स्लिट डिझाइन

सोनेरी रंगाच्या या रॅप ड्रेसमध्ये व्ही- कट नेकलाइन होतं. ज्यामुळे ड्रेसला ग्लॅमरस टच मिळाला आहे.या ड्रेसवर तुम्ही रफल डिझाइन देखील पाहू शकता. हे डिझाइन नेकलाइनपासून ते कमरेचा भाग आणि स्ट्रेट फॉलसह पायांपर्यंत असल्याचे दिसत आहे. यामुळे हे रफल आउटफिट अधिक सुंदर दिसत आहे. स्टायलिश फुल स्लीव्ह्ज, टेल डिझाइन आणि यासह ड्रेसवर स्लिट डिझाइन देखील होतं.

(ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक,पाहा ३५ वर्षांपूर्वीचे हे फोटो)

​कमीत कमी ज्वेलरीचा समावेश

ईशा अंबानीचा लुक संपूर्णतः मोहक आणि सुंदर ठेवण्यासाठी तिचा मेकअप न्यूड टोन ठेवण्यात आला होता. सिल्क लायनिंगच्या या ड्रेसवर मुळातच इतकी चमक होती की ईशा अंबानीला कमीत कमी ज्वेलरी देण्यात आली होती. या लुकसाठी तिनं केवळ स्टेटमेंट हुप्स आणि फोर फिंगर रिंग परिधान केल्याचे तुम्ही पाहू शकता. केसांना स्ट्रेट पण नॅचरल लुक देण्यात आला होता. या ड्रेस आणि लुकमध्ये ईशा अंबानी खरंच फार सुंदर दिसत होती.

(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)

​Monique Lhuillier डिझाइनर ड्रेस

monique-lhuillier-

अ‍ॅमी पटेलने ईशा अंबानीसाठी सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय डिझाइनर Monique Lhuillier च्या स्प्रिंग २०२० (Spring 2020) कलेक्शनमधील ड्रेसची निवड केली होती. हा अँटीक गोल्डन ड्रेस आताही डिझाइनरच्या अधिकृत संकेतस्थळावर ग्राहकांसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे. आता आपण या ड्रेसच्या किंमतीबाबत माहिती जाणून घेऊया. संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीनुसार ड्रेसची किंमत ३ लाख २६ हजार रुपये एवढी आहे.

(नीता अंबानींनी सूनेसाठी डिझाइन केला होता खास लेहंगा, पाहा फोटो)

​स्टायलिश ईशा अंबानी

दरम्यान ईशा अंबानी पारंपरिक पोषाखापासून ते वेस्टर्न आउटफिटपर्यंत प्रत्येक प्रकारची स्टाइल सहजरित्या कॅरी करते. पण ईशाच्या या ड्रेसिंग स्टाइलपासून ते ड्रेसच्या किंमतीची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. मॅटालिक सिल्क लुक असणाऱ्या या गोल्डन रॅप ड्रेसमध्ये ईशा प्रचंड स्टायलिश दिसत आहे, यात शंकाच नाही.

(नीता अंबानींनी लाडक्या सूनेला लग्नामध्ये दिलं होतं जगातलं सर्वात महागडं गिफ्ट)

(टापटीप राहण्याचे ६ आश्चर्यकारक मानसिक आणि शारीरिक फायदे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *