अक्षय-ट्विंकलच्या घराला दिलेली डिंपल यांची पहिली भेट ‘या’ पदार्थामुळे चांगलीच राहिली आठवणीत

Spread the love

लोकांचे पोट आणि मूड, दोन्ही कधी आणि कोणत्या गोष्टीमुळे खराब होतील; हे सांगता येणे कठीण आहे. अपचन, जुलाब, गॅस इत्यादी पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी सोपा आणि रामबाण उपाय म्हणजे खिचडी. पोटाशी संबंधित समस्या निर्माण झाल्यानंतर डॉक्टर देखील खिचडी खाण्याचा सल्ला जातो. कारण हा पौष्टिक पदार्थ पचण्यास अतिशय हलका असतो. अक्षय कुमार आणि डिंपल कपाडिया यांच्यासाठीही खिचडी हा पदार्थ अतिशय खास आहे. कारण खिचडीशी संबंधित त्यांची एक मजेशीर आठवण आहे.

पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी खिचडी जितकी प्रसिद्ध आहे, तितकेच अक्षय कुमार आणि त्याची सासू डिंपल कपाडिया यांचं बाँडिंगही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. एका कार्यक्रमादरम्यान डिंपल कपाडिया यांनी अक्षय-ट्विंकल आणि खिचडीशी संबंधित मजेशीर एक किस्सा सांगितला होता. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न झाल्यानंतर डिंपल यांनी पहिल्यांदा त्यांच्या घराला भेट दिली, त्यावेळेस खिचडीवरून एक मजेशीर घटना घडली. हा किस्सा त्यांच्यासाठी संस्मरणीय असल्याचंही डिंपल यांनी सांगितलं.
(इंटरव्ह्यू आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तुम्हालाही ‘हा’ त्रास होतो का? जाणून घ्या कारण)

​डिंपल आणि अक्षय- ट्विंकलचा मजेशीर किस्सा

आई आपल्या मुलीच्या सासरी पहिल्यांदा भेट देते त्यावेळेस सोबत गोडधोड, स्वादिष्ट पदार्थ घेऊन जाते; तशी परंपराच असते. तसंच सासरची मंडळीही सूनेच्या माहेरच्या सदस्यांचा खास पाहुणचार करतात. पण अक्षय आणि ट्विंकलच्या लग्नानंतर असे काहीही घडले नाही, हे स्वतः डिंपल यांनीच सांगितले. अक्षय- ट्विंकलच्या घराला डिंपल यांनी पहिल्यांदा भेट दिली त्यावेळेस खिचडीचा बेत आखण्यात आला होता. कारण अक्षय कुमारचं पोट खराब होते.

(Shardiya Navratri 2020 व्रत करणाऱ्यांसाठी आरोग्यवर्धक आहे कुट्टूचे पीठ, जाणून घ्या ६ महत्त्वपूर्ण लाभ)

​खिचडीची आठवण

या दोघांच्या घरातील डिंपल यांची पहिली भेट खिचडीमुळे संस्मरणीय ठरली. अक्षयचं पोट खराब असल्याने घरात खिचडी तयार करण्यात आली आणि यावरून ट्विंकल वारंवार विनोद करत होती. हा मजेशीर किस्सा डिंपल यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितला होता.

(Global Hand Washing Day शेकडो वर्षांपूर्वी सुरू झाली होती स्वच्छतेची मोहीम, आजही ठरतेय प्रभावी)

दरम्यान पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी खिचडीमुळे कशी मदत मिळते. जाणून घेऊया सविस्तर माहिती…

​कोणकोणत्या समस्या दूर करण्यासाठी खिचडी खाल्ली जाते?

  • खिचडी खाण्यासंदर्भात कोणतेही नियम नाहीत. इच्छा झाल्यानंतरही तुम्ही खिचडीचा आस्वाद घेऊ शकता. पण पोटाशी संबंधित समस्या उदाहरणार्थ अपचन, जुलाब, अ‍ॅसिडिटी, गॅस यासारखा त्रास कमी करण्यासाठी खिचडीचे सेवन केलं जातं. या पदार्थामुळे पोटाला आराम मिळतो.
  • खिचडी तयार करण्यासाठी तांदूळ आणि अख्ख्या मुगाचा वापर केला जातो. याव्यतिरिक्त पाककृतीमध्ये कोथिंबीर आणि हंगामानुसार मिळणाऱ्या हिरव्या भाज्यांचाही समावेश केला जातो.

(Navratri Fasting नवरात्रीच्या उपवासादरम्यान शिंगाड्याच्या पिठाचं सेवन का करावे?)

​पचण्यास हलके पदार्थ खावेत

पण जुलाबाचा त्रास होत असल्यास हिरव्या मुगाच्या खिचडीचं सेवन करावे. तसंच ही खिचडी तयार करण्यासाठी पाण्याचा वापर अधिक प्रमाणात केला जातो. जुलाबाच्या त्रासामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतात. अशा परिस्थितीत पचण्यास हलके असणाऱ्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

(Navratri Fasting Benefits उपवास आणि आरोग्याशी संबंधित या गोष्टी माहीत आहेत का?)

​खिचडीमुळे शरीराला कसा मिळतो आराम?

  • खिचडी तयार करण्यासाठी केवळ तांदूळ आणि अख्ख्या मुगाचाच उपयोग केला जातो, हे तुम्हाला माहितीच आहे. या पदार्थामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट आणि पाणी या तिन्ही गोष्टी पुरेशा प्रमाणात असतात.
  • कार्बोहायड्रेट आपले शरीर आतून मजबूत ठेवण्याचे कार्य करतात. फायबरमुळे अन्नपदार्थांचे हळू-हळू पचन होते. यामुळे शरीरामध्ये ऊर्जा दीर्घकाळासाठी टिकून राहते.
  • खिचडीतील पाण्यामुळे शरीरात डिहाइड्रेशनची समस्या निर्माण होत नाही.
  • जुलाबाच्या समस्येमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होणे सामान्य बाब आहे.
  • एखादा हलका-फुलका पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास किंवा पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवल्यास तुम्ही खिचडीचं सेवन करू शकता.

(Navratri 2020 उपवासाच्या फराळामध्ये ‘या’ खिरीचा करा समावेश, जाणून घ्या मोठे फायदे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *