अथक प्रयत्नांनंतरही लठ्ठपणा कमी होत नसल्यास डिनरवेळी करा ‘ही’ ५ कामे!

Spread the love

छोट्या प्लेटचा वापर व चांगल्या प्रतीचे तेल

वजन कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला कॅलरीची एक मर्यादा आखली पाहिजे. मोठ्या प्लेट मध्ये खाण्याचा अर्थ आहे जास्त कॅलरीजचे सेवन आणि छोट्या प्लेट मध्ये जेवण्याचा अर्थ म्हणजे कमी कॅलरीजचे सेवन! त्यामुळे ओव्हरइटिंगपासून बचाव करण्यासाठी नेहमी एक छोटी प्लेटच निवडा आणि ती प्लेट हेल्दी आहाराने भरलेली ठेवा. तसंच जेवण बनवताना लोक अगदी साधारण चूका करतात त्यातीलच एक चूक म्हणजे जेवण बनवताना वापरल्या जाणा-या तेलाची कॅलरी दुर्लक्षित करणं. तुम्ही भरपूर तेलात जेवण बनवाल तर तुमचं वजन कधीच कमी होऊ शकत नाही, भले मग ते तेल आलिव्ह ऑइल असो, नारळ तेल किंवा साजूक तूप का असेना. आपल्या अन्नात चरबी वाढवणा-या घटकांचे प्रमाण कमीत कमी असावे.

(वाचा :-सायलेंट किलर असतो हाय बीपी! अशी ओळखा हाय बीपीची सुरुवातीची लक्षणे)

संध्याकाळचा नाश्ता वेळेत खा व डिनरआधी पाणी प्या

रात्रीच्या जेवणाआधी व दुपारच्या जेवणामध्ये तुम्ही काय व किती खाता या गोष्टी देखील तुमच्या वजनावर परिणाम करतात. जर तुम्ही दुपारच्या व रात्रीच्या जेवणामध्ये एक मोठं अंतर राखाल तर रात्री प्रचंड भूक लागल्याने तुम्ही ओव्हरइटिंग कराल. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्याकडे विशेष लक्ष द्या. आपण कायमच पाणी पिण्याचे महत्त्व कमी जाणतो. द्रव पदार्थ फक्त आपल्याला हायड्रेटेडच नाही ठेवत तर पोट भरलेलं असल्याचा अनुभव देतात. ज्यामुळे आपण कमी प्रमाणात खातो. याव्यतिरिक्त जेवणाआधी ३० मिनिटे १ मोठा ग्लास पाणी जरुर प्यावे. जेवताना पाणी प्यायल्यास त्याचा नकारात्मक परिणाम हा पचनक्रियेवर होतो.

(वाचा :- सुदृढ व सडपातळ शरीरासाठी घरबसल्या करा ‘हे’ साधेसोपे व्यायाम!)

रात्री खा बटाटा

एका रिसर्च मध्ये हे समजलं आहे की, इतर कोणत्याही कार्ब्सच्या तुलनेत बटाटा खाल्ल्याने पोट पूर्णपणे भरले जाते. हा एक मोठा व चुकीचा गैरसमज आहे की बटाटा खाल्ल्याने वजन वाढतं. या विरुद्ध बटाट्या मध्ये खूप प्रमाणात फायबर आणि चांगल्या गुणवत्तेचे कार्ब्स समाविष्ट असतात. फक्त बटाटा खाताना एक मर्यादा जरुर पाळा. याव्यतिरिक्त तळलेला बटाटा खाण्यापेक्षा शिजवलेला बटाटा हा कधीही उत्तम असतो.

(वाचा :- ‘हे’ ५ हार्मोन्स करा संतुलित नाहीतर वजन कमी करणं होऊ शकतं कठीण!)

जेवणावेळी लक्ष केंद्रित करुन जेवणे

जेवण कायम शांत चित्तानेच खावे. जेवताना कधीच टिव्ही किंवा मोबाईल पाहू नये. जेवताना इतर टाईमपास केल्यामुळे आपलं पोट कधी भरलं हे आपल्यालाच समजत नाही आणि त्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त प्रमाणात खातो. लक्षपूर्वक जेवल्यामुळे आपण आपल्या कॅलरी इंटेकला आरामात मॅनेज करु शकतो. जेवताना लक्ष भरकटल्यास आपण खात असलेलं अन्न पूर्णपणे शरीराला लाभत नाही म्हणून जीवप्राण एक करुन सर्व लक्ष जेवणाकडे द्यावं कारण अन्न हे पूर्णब्रम्ह असतं.

(वाचा :- कोरडी त्वचा, त्वचा फुटणे व खाज या समस्यांनी त्रस्त असाल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपचार!)

डिनर लवकर करावा

कधीही डिनर हा झोपण्याच्या २ तास आधी उरकून घ्यावा. जर तुम्हाला लवकरात लवकर वजन कमी करायचं असेल तर संध्याकाळी ७ च्या आधी डिनर करुन वेळेत झोपावे व सकाळी वेळेत उठावे. जे लोक उशीरा डिनर करुन लगेचच झोपी जातात त्याचं वजन कधीच कमी होत नाही. तसंच वजन कमी करण्यासाठी घास ३० ते ३५ वेळा चांगला चावून खा. नियमित पौष्टिक व संतुलित आहार घ्या.

(वाचा :-लठ्ठपणा कमी करायचा आहे? मग जाणून घ्या ‘हे’ १० महत्त्वपूर्ण नियम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *