अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल

Spread the love

सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आपल्या सुंदर स्वभावासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमधील चर्चांनुसार अथियाचं नाव स्टार क्रिकेटर के.एल. राहुल याच्यासोबत जोडले जात आहे. दोघेही बर्‍याचदा एकमेकांसोबत वेळ घालवत असताना आणि सोशल मीडियावर आपले फोटो शेअर करताना दिसतात. दोघांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोंमध्ये युजर्सनी एक खास कनेक्शन शोधून काढलं. तसंच काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर या दोघांच्या व्हायरल फोटोंवरही प्रचंड चर्चा देखील सुरू होती.

एकसारख्याच कपड्यांमध्ये दिसले अथिया आणि राहुल
के. एल. राहुलचा मल्टी ह्यूड स्वेटशर्टमधील फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या ओव्हल शेप नेकलाइन असणाऱ्या स्वेटशर्टवरील पीच, पांढरा आणि निळ्या रंगाच्या शेडमुळे त्याचे आउटफिट कूल दिसत होते. त्यावर तुम्ही रिप्ड डिझाइन देखील पाहू शकता.
(सारा अली खान ही गोष्ट करतेय मिस, म्हणून स्वतःचे स्टायलिश थ्रोबॅक फोटो केले शेअर)

​डेनिम जीन्स

के. एल. राहुलने हे स्वेटशर्ट डेनिम जीन्ससह मॅच केले होतं. यावर त्याने कूल गॉगल, चेन आणि घड्याळ यासारख्या अ‍ॅक्सेसरीज कॅरी केल्या होत्या. असेच स्वेटशर्ट अथिया शेट्टीनंही परिधान केल्याचं पाहायला मिळालं. तिचे फोटो देखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. हे स्वेटशर्ट घालून अथिया नारळ पाणी पित असल्याचे व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहे.

(Nita Ambani नीता अंबानींच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी मिळतील या पाच गोष्टी)

​आणखी एक कॉमन टी-शर्ट

याव्यतिरिक्तही आणखी एका कॉमन टी शर्टमध्ये के. एल. राहुल आणि अथिया शेट्टीचे फोटो व्हायरल झाले होते. पांढऱ्या रंगाच्या राउंड नेकलाइन आणि हाफ स्लीव्ह्ज टी शर्टमध्ये राहुलचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते. या टी शर्टवर स्पॅनिश डिझाइनर ब्रँड Balenciaga चे नाव आणि लोगो देखील दिसत आहे. अथियाचा देखील अशाच प्रकारच्या टी शर्टमधील फोटो सोशल मीडियावर आहे. या लुकसह अथियाने डेनिम शॉर्ट्स आणि गोल्डन वॉचसह ब्रेस्लेट्सही घातले होते.

(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

​पांढऱ्या शर्टवरील ‘ती’ कमेंट

अथियाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर पांढऱ्या रंगाच्या शर्टमधील फोटो पोस्ट केले होते. तिचा हा फोटो अतिशय मोहक आणि सुंदर होतो. फोटोमधील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले होते. या लुकसाठी तिनं मेसी बन हेअर स्टाइल केली होती. गळ्यामध्ये गोल्ड चोकर नेकलेस परिधान केलं होतं. यामुळे तिच्या शर्टचं प्लंजिंग इफेक्ट अधिक हायलाइट झाल्याचे दिसतंय. तसं पाहायला गेलं तर पांढऱ्या शर्टचे हे डिझाइन बरेच सामान्य आहे. पण अथियाच्या या फोटोवर के. एल. राहुलने ‘नाइस शर्ट’ असे कमेंट केलं. तेव्हा चाहत्यांनी राहुलच्या या कमेंटवर आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. काही लोकांनी म्हटलं की, ‘असे वाटतंय की हे शर्ट एल राहुलचे असावे’.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​सूत्रांच्या माहितीनुसार पक्कं आहे रिलेशनशिप

अथिया शेट्टी आणि के. एल. राहुल एकमेकांना गेल्या दोन वर्षांपासून ओळखत आहेत. पण या दोघांच्या रिलेशनशिपबाबतची माहिती जानेवारी २०२० मध्ये सूत्रांनी पक्की केली होती. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ एका रिपोर्टनुसार दोघंही एकमेकांचे चांगले मित्र होते आणि त्यांच्यातील ट्युनिंग देखील शानदार होतं.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

​दोघांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया नाही

यावरूनच दोघांमधील मैत्रीचे रुपांतर प्रेमाच्या नात्यात होईल, असा अंदाज त्यांच्या आसपास असणाऱ्या लोकांनी आधीपासूनच वर्तवला होता, अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, के. एल. राहुलला अथियाचे आई वडील आणि भाऊ देखील भरपूर पसंत आहेत. दरम्यान अद्याप या दोन्ही सेलिब्रिटींकडून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही प्रतिक्रिया किंवा माहिती देण्यात आलेली नाही.

(जुन्या कपड्यांचा असा करा वापर आणि घराला द्या नवा लुक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *