अनुष्का शर्माच्या सौंदर्याचं सीक्रेट, फॉलो करतेय ‘या’ स्किन केअर टिप्स

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आपल्या त्वचेची आणि केसांची योग्य पद्धतीने देखभाल करते. प्रेग्नेंसीमध्येही अनुष्का आपल्या आरोग्यासह त्वचेची विशेष काळजी घेते. त्वचा मऊ आणि चमकदार दिसावी, यासाठी ती नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करते. अनुष्का शर्माच्या सौंदर्याचे सीक्रेट जाणून घेऊया…

मेकअप करण्यापूर्वी चेहऱ्याचा मसाज

अनुष्का शर्मा मेकअप करण्यापूर्वी आपल्या चेहऱ्याचा मसाज करते. या प्रक्रियेमुळे त्वचेवरील रोमछिद्रे खुली होतात आणि चेहऱ्याच्या भागातील रक्तप्रवाह देखील वाढतो. महत्त्वाचे म्हणजे मेकअप केल्यानंतर घाम येत नाही आणि चेहऱ्यावर मेकअप अधिक काळ टिकून राहतो. याव्यतिरिक्त मसाज केल्याने त्वचा मॉइश्चराइझ राहते. तसंच ब्युटी प्रोडक्टमुळे त्वचेवर होणाऱ्या संसर्गाचा धोकाही कमी होतो.
(सॅनिटायझरचे त्वचेवरील दुष्परिणाम, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेले ‘हे’ उपाय)

चेहऱ्याचा मसाज करण्याची पद्धत

​ऑइल पुलिंगचे फायदे

अनुष्का शर्माने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ऑइल पुलिंग करतानाचा फोटो शेअर केला होता. आपल्या चाहत्यांना तिनं हा उपाय करण्याची पद्धत देखील सांगितली होती. पोस्टमध्ये तिनं लिहिलं होतं की,‘दात मजबूत ठेवण्यासाठी ऑइल पुलिंग करणं खूप लाभदायक असते. सोबतच यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते’. ही अभिनेत्री नारळाच्या किंवा तिळाच्या तेलाने ऑइल पुलिंग करते. ही प्रक्रिया हिरड्यांसाठी आणि पचनसंस्थेसाठीही फायदेशीर असते.

(Natural Skin Care हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, त्वचेसाठी करा हे ७ नैसर्गिक उपचार)

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी एल्डरफ्लावर ज्युस

आपण या अभिनेत्रीच्या कित्येक फोटोंमध्ये तिच्या हातात एल्डरफ्लावर (Elderflower) ज्युसचा ग्लास पाहिला असेलच. अनुष्काचे हे आवडते पेय आहे. एल्डरफ्लावरमध्ये अँटी- बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. हे घटक अ‍ॅलर्जी कमी करण्याचे कार्य करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवतात. यामुळेच अनुष्का शर्मा आपल्या आहारामध्ये या पेयाचा समावेश करते. हे पेय रक्ताभिसरण आणि श्वसन प्रणालीचे कार्य सुरळीत सुरू राहण्यासाठीही लाभदायक आहे.

​वर्कआउट

नियमित वर्कआउट केल्यास आरोग्य निरोगी राहण्याव्यतिरिक्त आपली त्वचा आणि केसांनाही भरपूर लाभ मिळतात, असे अनुष्का शर्माचे म्हणणे आहे. म्युझिकसह व्यायाम केल्यास चयापचयाची क्षमता सुधारते आणि हृदयाचे आरोग्यही निरोगी राहते, असे अनुष्का मानते. सोबतच मानसिक तणाव देखील दूर होतो आणि आपली स्मरणशक्ती सुद्धा चांगली राहते. याव्यतिरिक्त संगीतामुळे आपले मन सुद्धा प्रसन्न राहते.

(फेस मास्कमुळे त्वचेचं नुकसान होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी? डॉक्टरांकडून जाणून घ्या)

​जाड भुवयांमुळे चेहरा दिसतो सुंदर

ब्युटी टिप्सबाबत अनुष्काने सांगितलं की, जर तुम्ही मेकअप करत नसाल तर भुवयांचा बोल्ड आणि स्टायलिश मेकअप करा. ज्यामुळे डोळे आणि चेहरा सुंदर दिसतील. यासाठीच अनुष्का आपल्या भुवया बोल्ड ठेवणं पसंत करते. आपण आयब्रो पेन्सिलची मदत घेऊ शकता.

(फेस स्टीमरने पोअर्समधील दुर्गंध काढणं आहे सोपं, चेहऱ्यावर येतो नॅचरल ग्लो)

​वेगवेगळ्या हेअरस्टाइल करणं आहे पसंत

अनुष्का शर्माला वेगवेगळ्या हेअरस्टाइल करणं पसंत आहे. मोठ्या पडद्यावर ती कधी लाँग बीच वेव्ह्ज, पोनीटेल, पर्पल स्ट्रीक्स, स्लीक बॅक बन्स आणि ज्वेलरी हायलाइट्स अशा प्रकारच्या हेअरस्टाइलमध्ये दिसते. पण अनुष्काला लॉब हेअरकट अतिशय आवडते. या हेअरकटमुळे तिला परफेक्ट लुक मिळतो आणि केसांची अधिक प्रमाणात देखभालही करावी लागत नाही.

(हिना खानने शेअर केलं ब्युटी सीक्रेट, चमकदार त्वचेसाठी लावते स्‍ट्रॉबेरी फेस पॅक)

​लिपस्टिक

लाइट टोन लिपस्टिक लावण्याऐवजी अनुष्का एखाद्या गडद रंगाचं लिपस्टिक लावणं पसंत करते. यामुळे चेहरा चमकदार दिसतो. अनुष्काच्या बॅगमध्ये नेहमीच अशा शेड्सचं लिपस्टिक पाहायला मिळतील.

(Skin Care Tips पिंपलमुळे आहात त्रस्त? अशा पद्धतीने चेहरा ठेवा स्वच्छ व मॉइश्चराइझ)

​मस्काऱ्यामुळे डोळे दिसतात सुंदर

पापण्यांवर मस्कारा लावल्यास केस घनदाट आणि सुंदर दिसतात. डोळे आकर्षक दिसण्यासाठी अनुष्का शर्माही मस्कारा वापरते. तसंच डिओडरंट, लिपबाम आणि मस्कारा स्वतःसोबत घेतल्याशिवाय ती घरातून बाहेर पडत नाही.

(त्वचेचा कर्करोग, जाणून घ्या मुख्य लक्षणे व उपचार)

​चमकादार त्वचेसाठी अनुष्काचे रूटीन

मेकअपविनाच सुंदर दिसण्यासाठी अनुष्का शर्मा नियमित स्किन केअर रुटीन फॉलो करते. चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर ती सर्वप्रथम मॉइश्चराइझर लावते. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करते. ओठ आणि डोळ्यांचे विशेष काळजी घेते.

(थंडीत बॉडी मसाज का करावा, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ? जाणून घ्या)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *