अनुष्का शर्मा आणि करीना कपूरच्या मॅटर्निटी फॅशनची रंगली चर्चा

Spread the love

​अनुष्काने पुन्हा लक्ष वेधले

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हटके ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. रेड कार्पेट लुक असो किंवा कॅज्युअल फॅशन, लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोणत्या प्रकारचे आउटफिट कॅरी करायचे हे अनुष्काला चांगलेच ठाऊक आहे. ऑफ-शोल्डर ड्रेस असो किंवा डिझाइनर साडी; अनुष्का आपल्या मोहक स्टाइलने चाहत्यांची मने जिंकतेच. या अभिनेत्रीची मॅटर्निटी फॅशन देखील सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

(प्रेग्नेंसीमध्ये अनुष्का शर्मा परिधान करतेय अशा प्रकारचे स्टायलिश आउटफिट)

​स्टेडिअमवर दिसतोय फॅशनचा जलवा

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मा पती विराट कोहली आणि त्याच्या संपूर्ण टीमला प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट स्टेडिअमवर पोहोचली होती. यावेळेस तिनं केशरी रंगाचा व्ही शेप ड्रेस परिधान केला होता. यानंतर तिचे पांढऱ्या ड्रेसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनुष्काने परिधान केलेला हा पांढरा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझाइनर Shruti Sancheti ने डिझाइन केला आहे. या ड्रेसमध्ये स्क्वेअर नेकलाइन आणि पफी स्लीव्ह्ज डिझाइन तुम्ही पाहू शकता. या लुकसाठी अनुष्काने लाइट टोन मेकअप केला होता. तर मिडल पार्टेड हेअर स्टाइलमुळे तिचा लुक अधिक मोहक दिसत आहे.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)

​हॅलोवीन पार्टीमधील करीनाचा हटके लुक

करीना कपूरनं दुसऱ्या प्रेग्नेंसीमधील स्टाइल पूर्णतः बदलल्याचे दिसत आहे. सध्या करीना स्टायलिश अवतारासह कम्फर्टेबल लुक कॅरी करताना दिसत आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये डिझाइनर कफ्तान ड्रेसचे आकर्षक कलेक्शन पाहायला मिळत आहे. नुकतेच करीनानं हॅलोवीन पार्टीचे आयोजन केलं होतं. या पार्टीमध्येही करीनाने साधा पण अतिशय आकर्षक लुक कॅरी केला होता. या पार्टीसाठी करीनानं सुद्धा Shruti Sancheti ने डिझाइन केलेला ट्युनिक ड्रेस घातला होता.

(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​करीनाचे महागडे फुटवेअर

बेबोने आपल्या साध्या आउटफिटला स्टायलिश लुक देण्यासाठी इटलीतील लक्झरी ब्रँड Bottega Veneta ने डिझाइन केलेलं पिवळ्या रंगाचं फुटवेअर मॅच केलं होतं. करीनाचे हे महागडे फुटवेअर लेदरपासून तयार करण्यात आले आहे. करीनाच्या या हील्सची देखील प्रचंड चर्चा झाली.

(Kareena Kapoor करीना कपूरने पार्टी लुकसाठी ‘या’ लाख रुपयांच्या फुटवेअर केली निवड)

​कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश?

एकीकडे बेबोचा साधा पण हटके अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला तर दुसरीकडे काही दिवसांपासून क्रिकेटच्या स्टेडिअमवर अनुष्का शर्माच्या मॅटर्निटी फॅशनचीच चर्चा सर्वाधिक रंगत आहे. या दोन्ही अभिनेत्रींचा स्टायलिश लुक चाहत्यांना अधूनमधून पाहायला मिळतोच.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

पण तुम्हाला या दोघींपैकी कोणाचा लुक सुपर स्टायलिश वाटला?

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *