अनुष्का शर्मा आणि कियाराचे एकसारखेच जम्पसूट, कोणी कोणाला केलंय कॉपी?

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)आणि कियारा आडवाणी (Kiara Advani), या दोघीही स्टाइलच्या बाबतीत कधीही मागे नसतात. एका अभिनेत्रीला आपल्या स्टाइलमध्ये मोहकता पसंत आहे तर दुसऱ्या अभिनेत्रीच्या स्टाइलमध्ये बोल्ड लुक पाहायला मिळतो. पण आपण कित्येकदा पाहिलं असेल की बी- टाउनमधील अभिनेत्री स्टाइलच्या बाबतीतही एकमेकांपासून प्रेरणा घेत असतात. अशाच प्रकारे अनुष्का देखील कियाराच्या फॅशन स्टाइलमुळे प्रेरित झाल्याचे पाहायला मिळाले.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. या थ्रोबॅक फोटोंमध्ये अनुष्काने ‘Esse’चे डेनिम जम्पसूट परिधान केल्याचे दिसत आहे. या गडद निळ्या रंगाच्या आउटफिटवर गडद चॉकलेटी धाग्याने विणकाम करण्यात आले आहे. यामुळे अभिनेत्रीला शानदार लुक मिळाला आहे.


(शिल्पा शेट्टीनं आपल्या ६ महिन्यांच्या लेकीसाठी तयार करून घेतला स्पेशल ड्रेस)

कटआउट डिझाइनमुळे हा ड्रेस अधिक हायलाइट झाला आहे. या स्लीव्हलेस जम्पसूटमध्ये नेकलाइनवर झिप डिझाइन दिसत आहे. तर चॉकलेटी रंगाच्या धाग्याशी मॅचिंग बेल्ट देखील अनुष्काने यावर घातला आहे. ज्यामुळे तिचा जम्पसूटला स्टायलिश लुक मिळाला आहे. या ड्रेसवर देखील अनुष्काने आपला नॅचरल मेक अप लुकच कॅरी केला आहे. तसंच तिने मिडिल पार्टिशन हेअर स्टाइल केली होती. अनुष्काने या जम्पसूटवर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी परिधान केलेली नव्हती.


(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

डिसेंबर २०१९ मध्ये अशाच प्रकारचा जम्पसूट कियाराने केला होता परिधान
डिसेंबर २०१९मध्ये अशाच प्रकारच्या फ्लेअर्ड जम्पसूटमध्ये कियारा आडवाणी दिसली होती. ‘गुड न्यूज’ सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमात तिने हा जम्पसूट परिधान केला होता. कियाराने अनुष्का प्रमाणेच हा लुक कॅरी केला होता.


(समुद्रकिनाऱ्यावर अनुष्का शर्माचं बोल्ड फोटोशूट, विराट कोहलीनं दिली ‘ही’ प्रतिक्रिया)

केवळ ज्वेलरी आणि हेअर स्टाइलमध्ये फरक होता. कियाराने जम्पसूटवर गोल्डन हुप्स मॅच केल्याचे दिसत आहे. तर मेसी पोनी हेअर स्टाइल केली होती. या लुकमध्ये कियारा प्रचंड सुंदर दिसत होती. दरम्यान चाहत्यांना अनुष्का शर्मा आणि कियारा आडवाणी, दोघींचाही लुक आवडला. तुम्हाला कोणाचा लुक बेस्ट वाटत आहे?
(Anushka Sharma या बिकिनी लुकमुळे ट्रोल झाली होती अनुष्का शर्मा)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *