या लुकसाठी अपूर्वाने पारंपरिक चोकर नेकपीस, नथ, बांगड्या आणि सुंदर ईअररिंग्ज घातले आहेत. आकर्षक दागिन्यांमुळे अपूर्वाला मोहक लुक मिळाला आहे. तसंच चंद्रकोरमुळे तिच्या सौंदर्यात अधिक भर पडली आहे. दागिन्यांप्रमाणेच तिचा मेकअप देखील मोहक होता. या लुकसाठी तिनं लाइट टोन मेकअप करण्यावर भर दिलाय. तसंच डोळ्यांचा भाग अधिक हाइलाइट केल्याचे आपण पाहू शकता.
ज्यांना पारंपरिक कपडे, दागिने परिधान करण्याची प्रचंड हौस आहे, त्या महिला तसंच तरुणी अपूर्वाची ही स्टाइल सहजरित्या फॉलो करू शकतात. लग्नसोहळा किंवा कौटुंबिक कार्यक्रमामध्ये तुम्ही देखील हा मराठमोळा लुक कॅरी करू शकता.
(Ankita Lokhande अंकिता लोखंडेचा सुंदर साडी लुक, हे ६ फोटो पाहिले का?)
अपूर्वाचा हा पारंपरिक लुक तिच्या चाहत्यांना भरपूर आवडला. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाइक आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
(Fashion Tips को-ऑर्ड ड्रेसची क्रेझ! का वाढतेय या स्टायलिश पॅटर्नची मागणी?)
अपूर्वाचे पारंपरिक अवतारातील काही फोटो पाहुया
जांभळ्या रंगाची साडी
काही दिवसांपूर्वी या अभिनेत्रीनं जांभळ्या रंगाच्या नऊवारी साडीतील सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. तिच्या या साडीवर गुलाबी आणि केशरी रंगाची बोर्डर होती. हेच कॉम्बिनेशन तिच्या ब्लाउजवरही पाहायला मिळालं. या साडी लुकसाठी अपूर्वाने सिल्व्हर पॅटर्न दागिन्यांची निवड केली होती. यामध्ये नेकलेस, कानातले, नथ आणि बांगड्यांचा समावेश होता. केसांचा अंबाडा बांधून त्यावर तिनं गजरा देखील माळला होता.
लाल रंगाच्या साडीतील मोहक लुक
या लुकसाठी अपूर्वानं कमीत कमी दागिने परिधान केले होते.
(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)
Recent Comments