अशी बनवा घरगुती बाळगुटी! बाळाला बद्धकोष्ठता, गॅस व अ‍ॅसिडिटीपासून मिळेल मुक्ती

Spread the love

लहान बाळाला सतत अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या सतावत असतात. यावर उपाय म्हणून बाळाला बाळगुटी (benefits of balguti) दिली जाते. लहान असताना तुम्हालाही तुमच्या पालकांनी आवर्जून बाळगुटी दिली असेल आणि तुम्ही आसपास ज्या घरात बाळ आहे तिथे जाऊन विचारलं तर तिथे सुद्धा ‘आम्ही आमच्या बाळाला बाळगुटी पाजतो’ असचं उत्तर तुम्हाला मिळेल.

सध्याच्या युगातले आधुनिक पालक घरातील वडीलधारी मंडळी सांगतात म्हणून बाजारातून बाळगुटी आणून आपल्या बाळाला पाजतात. पण पूर्वी असं नव्हतं, पूर्वी घरातच बाळगुटी बनवली जायची. आज या लेखातून आम्ही तुम्हाला ही बाळगुटी कशी बनवावी तेच सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही सुद्धा अस्सल, घरच्या घरी सुरक्षित अशी बाळगुटी बनवून बाळाला पाजू शकता. आणि त्याचा नक्कीच फायदा बाळाला होईल.

विविध औषधांनी युक्त

बाळगुटी म्हणजे विविध आयुर्वेदिक औषधांचे एक आगळेवेगळे मिश्रण असते. यात विविध प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश असतो आणि त्यातील औषधी तत्वे बाळाच्या शरीराला सक्षम करतील असं त्यामागाचा हेतू असतो. या प्रामुख्याने अश्वगंधा, अतिविष, मुरुडशेंग, बाळ हिरडा, जायफल, हळदीचे मूळ, सुंठ, खारीक, बदाम, जेष्‍ठमध, डिकेमाळी, वेखंड आणि काकड शिंगी या औषधी वनस्पतींचा समावेश असतो. या सर्व वनस्पती एकत्र करून त्यांच्यापासून तयार होते बाळगुटी. बाजारात रेडीमेड बाळगुटी सुद्धा उपलब्ध होते.

(वाचा :- मुलांची दृष्टी तेज करण्यासाठी असं बनवा घरच्या घरी बदामाचं काजळ!)

घरच्या घरी बाळगुटी कशी बनवावी?

बाळगुटी बनवण्याच्या तशा विविध पद्धती आहेत. मात्र आज आपण घरच्या घरी सहज तयार केली जाऊ शकते अशी बाळगुटीची पद्धत पाहूया. सर्वप्रथम गॅस वर एक भांडे ठेवावे. ते भांडे अर्धे भरले जाईल एवढे दूध त्यात घालावे. त्यानंतर यात जायफळ टाकावी. आता जायफळी सोबतच हे दूध उकळू द्यावे. दूध उकळले की मग ते थंड होऊ द्यावे . थंड झाल्यावर या दुधाचे दही होऊ द्यावे. जेव्हा दही तयार होईल तेव्हा त्यातून जायफळ बाजूला करावे. जायफळ उगाळा आणि त्यात एक एक थेंब पाणी टाकत राहा. यातून जो द्रव पदार्थ निर्माण होईल तीच बाळगुटी होय. हीच बाळगुटी बाळाला चाटायला द्या.

(वाचा :- मुलांचे केस सुंदर, हेल्दी, काळेभोर व चमकदार बनवण्यासाठी बनवा ‘हे’ घरगुती आयुर्वेदिक तेल!)

बाळगुटीचे फायदे काय?

तुम्ही जन्मगुटी हा शब्द ऐकला आहे का? तर मग जन्मगुटी हीच बाळगुटी आहे. हा एक पारंपारिक भारतीय आयुर्वेदिक काढा आहे, हा काढा आईच्या दुधामध्ये किंवा पाण्यात मिसळून बाळाला पाजला जातो. बाळगुटीमध्ये असणाऱ्या विविध औषधी वनस्पतींमुळे त्यात विविध प्रकारचे औषधी गुणधर्म आढळून येतात. काही पालक बाळ जन्मताच पहिल्या दिवसापासून त्याला बाळगुटी पाजायला सुरुवात करतात. असं म्हणतात कि बाळगुटी पाजल्याने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि दात येताना किंवा अतिसार व बद्धकोष्ठता झाल्यावर त्याला ज्या वेदना होतात त्या बाळगुटीच्या सेवनाने कमी होतात.

(वाचा :-मुलांना जडलेलं फोन किंवा टिव्हीचं व्यसन सोडवण्यासाठी चक्क बालरोगतज्ज्ञच सांगतायत साधेसोपे उपाय!)

बाळाला बाळगुटी कधी द्यावी?

बाळ जर वारंवार रडत असेल तर त्याला शांत करण्यासाठी तुम्ही बाळगुटी पाजू शकता. दात आल्यावर हिरड्यांमधील सूज आणि बाळाला होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा बाळगुटी बाळाला देऊ शकता. याशिवाय बाळाचे पोट फुगले वा त्याला अपचन होत असेल तर बाळगुटी दिली जाते, जेणेकरून त्याच्या पचनक्रियेत सुधारणा होईल. याशिवाय बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आणि बाळाचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणूनही बाळाला बाळगुटी देण्याचा सल्ला दिला जातो.

(वाचा :- मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी असे बनवा हेल्दी व टेस्टी ओट्सचे लाडू!)

डॉक्टरांचे मत काय आहे?

WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार नवजात बाळाला जन्माच्या सहा महिन्यांपर्यंत आईचे दूध आणि फॉर्म्युला मिल्क याशिवाय काहीही देऊ नये. हा काळ त्याच्या शरीरासाठी अतिशय नाजूक असतो. या काळात बाळाला सर्वात जास्त आपल्या आईंच्या दुधाची गरज असते. डॉक्टर सुद्धा वैज्ञानिक दृष्टीकोनानुसार बाळगुटी न पाजण्याचा सल्ला देतात. बाजारात मिळणाऱ्या बाळगुटी मध्ये प्रिजर्वेटिव्‍स असतात जे बाळासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. पण तुम्ही आयुर्वेदिक जाणकारांच्या सल्ल्यानुसार बाळाला योग्य प्रमाणात बाळगुटी पाजू शकता. जर बाळाला बाळगूटीचा त्रास होतोय असे दिसून आले किंवा बाळगुटी पाजल्यावर बाळाला काहीही शारीरिक त्रास सुरु झाले तर मात्र बाळाला बाळगुटी न पाजता अन्य उपचार सुरु करावे.

(वाचा :- वायू प्रदूषणामुळे लहान मुलांच्या फुफ्फुसांचं होतंय खूप नुकसान, घ्या ‘ही’ काळजी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *