‘असं वाटतं सैफ अली खानला सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करावं’, करीनाच्या वक्तव्यामागील नेमका अर्थ काय?

Spread the love

करीना कपूर (kareena kapoor) जितकी आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तितकीच की आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील प्रसिद्ध आहे. ती जे काही मत मांडते ते मनापासून मांडते आणि अगदी बिनधास्त होऊन मांडते, कोणाला खुश करण्यासाठी व मुद्दाम प्रसिद्धीसाठी केलेले ते मत नसतं. याचा प्रत्यय पुन्हा आला जेव्हा तिने आपला पती सैफ अली खान (saif ali khan) बद्दल एक वक्तव्य केल आणि ते ऐकुन अनेकांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या.

पण या वक्तव्याला एक कारण होतं. तिने सैफ बाबत विचारल्या गेलेल्या एका प्रश्नाला धरून हे विधान केलं आणि सामान्य स्त्री सुद्धा तिच्या या विधानाला लगेच संमती देईल इतकं ते विधान योग्य होतं. चला तर जाणून घेऊया काय केलं करीना कपूरने विधान आणि सैफ बाबत कोणता प्रश्न विचारण्यात आला होता?

रिपोर्टरचा प्रश्न आणि बेबोचे उत्तर

ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा करीना कपूर आणि अर्जुन कपूरचा ‘की अँड का’ हा चित्रपट रिलीज होणार होता. या चित्रपटात वर्किंग वूमन आणि हाऊस हसबंड यांची एक वेगळी स्टोरी दाखवण्यात आली होती. याच्याशी निगडीत एका इव्हेंट मध्ये एका रिपोर्टरने करीना कपूरला तिचा ऑन स्क्रीन पती अर्जुन कपूर आणि तिचा रियल लाईफ पती सैफ अली खान यांच्यात तुलना करत एक वेगळाच प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना करीना म्हणाली, “अर्जुन एवढी मेहनत करतो कि कधी कधी वाटतं सैफला सोडून अर्जुनशी लग्न करावं.” तिचं हे उत्तर ऐकुन आगळेच अचंबित झाले पण तिने घेतलेली फिरकी पाहून सगळ्यांनी टाळ्या देखील वाजवल्या. करीनाने पुढे हे सुद्धा सुनावले की,”दोघांना कम्पेअर करणे चुकीचे आहे कारण दोघांची तुलना कधीच होऊ शकत नाही.”

(वाचा :- का आली हरयाणवी क्वीन सपना चौधरीवर फरशी पुसण्याची वेळ? डान्सप्रमाणे हा व्हिडिओही तुफान व्हायरल!)

तुलना करणे हे लोकांचे कामच

दोन व्यक्तींमध्ये तुलना करणे एक अशी गोष्ट आहे ज्यातून प्रत्येकजण जातो किंवा प्रत्येकाला कधी न कधी तुलनात्मक प्रश्नांना सामोरे जावे लागते. मार्क्स असो, मुलांचे गुण असो, नोकरी असो किंवा पगार असो, प्रत्येक बाबतीत लोकांना तुलना करायला आवडते. या गोष्टीला वैवाहिक जीवन देखील अपवाद नाही. दुसऱ्यांच्या वैवाहिक आयुष्यात सतत डोकावणारे लोक कोणाच्याही पार्टनर बाबतीत आपली जजमेंट सहज पास करून जातात आणि त्यांची अपेक्षा असते कि समोरच्याने ती जजमेंट हलक्यात घ्यावी. मात्र अशावेळी हजरजबाबीपणे उत्तर देता आले पाहिजे.

(वाचा :- लॉकडाऊनमुळे रिलेशनशीप संबंधित ‘या’ 3 गंभीर समस्या पुन्हा झाल्यात सुरू, कसा करावा सामना?)

बायकांना या गोष्टी आवडत नाहीत

‘अरे तिचा नवरा तिला रोज फिरायला घेऊन जातो’, ‘तिचा नवरा घरातील सगळी कामे करतो’, ‘तिचा नवरा असं करतो, दुसरीचा नवरा तसं करतो.’ अशा कित्येक तुलना लोकं सहज करतात. पण जिच्या नवऱ्याची तुलना केली जाते त्या बायकोला मात्र अशा गोष्टी अजिबात आवडत नाहीत. कारण तुलना करणे म्हणजेच काय तर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा कमी कर्तुत्ववान कसा आहे किंवा वाईट कसा आहे हे दाखवणे होय. त्यामुळे साहजिकच कोणत्याही बायकोला आपल्या नवऱ्या बाबतीत केलेली वाईट तुलना आवडणारच नाही.

(वाचा :- करीना की प्रियांका, शाहिदची कोणती एक्स मीरा राजपूतला पसंत नाही? उत्तर ऐकून म्हणाल ‘बिवी नंबर वन’!)

नात्यावर होतो परिणाम

रिलेशनशिप थेरपिस्ट केट मोय्ले यांनी आपल्या लेखात एका गोष्टीचा उल्लेख केला की, सतत आपल्या जोडीदारची इतरांनी तुलना करणे किंवा तो कमी गुणवत्तापूर्ण आहे हे दाखवून देणे एखाद्याच्या मनावर मोठा परिणाम करू शकते आणि पुढे त्या बद्दल सतत विचार येऊन त्या गोष्टीचा थेट परिणाम नात्यावर व्हायला देखील वेळ लागत नाही. त्यांनी सांगितले की जेव्हा व्यक्ती सतत तुलना ऐकते किंवा त्याबद्दल विचार करते तेव्हा ती मनात त्या गोष्टी खऱ्या मानु लागते आणि आपल्या जोडीदारा बाबतचे तिचे विचार बदलू लागतात. अशावेळी हळूहळू नकारात्मकता त्या नात्यात प्रवेश करते आणि चांगले हसते खेळते नाते बिघडू लागते.

(वाचा :- शार्दुलसोबत विवाहबंधनात अडकताना नेहा पेंडसे झाली ट्रोल! मग तिने केला व्हर्जिनिटीबाबत ‘हा’ खुलासा!)

कसा करावा सामना?

आता तुमच्याही मनात प्रश्न आलाच असेल की या गोष्टीशी मग सामना तरी कसा करावा? जर कोणी तुमच्या पतीची इतरांच्या पतीशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे तुलना करत असेल तर अशावेळी करीना सारखा सडेतोडपणा आणि स्पष्टवक्तेपणा असायला हवा. तुम्ही जेव्हा समोरच्याला ठोस उत्तर द्याल आणि त्यांची बोलती बंद कराल तेव्हा समोरचा व्यक्ती पुन्हा कधीही तुमच्या पतीची तुलना करण्यास धजावणार नाही. कितीही काही झाले तरी आपल्या जोडीदारा वरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि नाते सांभाळण्यावर भर द्या.

(वाचा :- बॉस तुमचा टोकाचा तिरस्कार करतो याचा पुरावा देतात ‘या’ ५ गोष्टी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *