How to make: आकर्षक चॉकलेट केक पॉप्स
मऊ मऊ चॉकलेट केकचा चुरा करा. या चु-यात फेटलेली क्रिम आणि बिस्किटांचा चुरा घाला. सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करुन त्याचा गोळा बनवा. जर मिश्रण कोरडं असेल तर तुम्ही त्यामध्ये अजून थोडी फेटलेली क्रिम घालू शकता जेणे करुन मिश्रणाचा नरम गोळा तयार होईल.
Step 2: चॉकलेटचे गोळे लॉलीपॉपसारखे स्टिकवर लावा
पीठाचे छोटे छोटे गोळे बनवा आणि २ ते ३ मिनिटांसाठी ते बाजूला ठेवा. आता लॉलीपॉप स्टिक घ्या आणि ते वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा आणि लॉलीपॉपच्या स्वरुपात केकच्या गोळ्यांवर लावा.

Step 3: चॉकलेट केक पॉप्स फ्रिजमध्ये ठेऊन सेट करा
आता हे लॉलीपॉप १ तास फ्रिजमध्ये ठेवा आणि व्यवस्थित सेट करा.

Step 4: केक पॉप्स अधिक आकर्षक दिसण्यासाठी त्यावर स्प्रिंक्लर्स भुरभूरा
आता केक पॉप्स फ्रिजमधून बाहेर काढा आणि वितळवलेल्या चॉकलेटमध्ये बुडवा. त्यावर स्प्रिंक्लर्स भुरभूरा आणि आपल्या प्रियजनांना खाऊ घाला किंवा एखाद्या वाढदिवसाच्या पार्टीत लहान मुलांना हे चॉकलेट केक पॉप्सचं सरप्राईज देऊन खुश करा.

Step 5: तयार झालेत यम्मी यम्मी चॉकलेट केक पॉप्स
लहान मुलांचे विशेष आकर्षण केक पॉप्स!

Step 6: चॉकलेट केक पॉप्स रेसिपी :- पाहा VIDEO
व्हिडीओमध्ये दिलेली पद्धत फॉलो करुन बनवा केक पॉप्स!

Source link
Recent Comments