आनंदी नात्याचे ५ खास पैलू!

Spread the love

रिलेशनशीप एक अशी गोष्ट आहे ज्याचे विविध पैलू पाहायला मिळतात. तेव्हा कुठे एक आनंदी व सुखी नातं बनतं. काही जोडपी खूप खुश आयुष्य जगत असतात पण त्यांना हे माहितच नसतं की हा आनंद जोडीदारामुळे दरवळतो आहे. आनंदाचे योग्य कारणच न समजल्याने काही कालावधी नंतर दोघेही नात्याला हलक्यात घेऊ लागतात आणि यामुळे नातं कमजोर पडत जातं.

म्हणूनच वेळीच नात्यातील सकारात्मकता ओळखून ती दुप्पट करण्यासाठी एकमेकांना प्रोत्साहित करत राहा. जर तुम्हालाही नात्याला कमजोर होऊ द्यायचं नसेल तर वेळीच नात्यातील आनंद ओळखा व त्याची किंमत काय आहे हे जाणून एकमेकांच्या प्रयत्नांचा मान राखा.

हसतं-खेळतं वातावरण

स्क्रिन किंवा नोटीफिकेशनमध्ये नाव पाहून आनंद होणं, भेटल्या भेटल्या एकमेकांना मिठी मारुन आनंद व प्रेम दाखवणं, भेटल्यानंतर पुन्हा घरी जाण्याची किंवा वेगळं न होण्याची इच्छा होणं या सर्व गोष्टी दाखवून देतात की तुम्ही आपल्या जोडीदारासोबत किती खुश आहात. हसू ही एकदम छोटीशी गोष्ट आहे पण प्रेमात पडल्यावर सर्वात आधी चेह-यावर येतं ते हसू आणि प्रेम कमजोर होताच लोप पावतं ते देखील हसू असतं. त्यामुळे एक आनंदी नातं यावरुनही आपल्याला जाणवू शकतं की तो माणूस किती हसतो आहे किंवा किती समाधानी आहे.

(वाचा :- लग्नाला होकार देण्याआधी प्रत्येक मुलीने जोडीदाराला आवर्जून विचारावेत ‘हे’ ५ प्रश्न!)

भरपूर संवाद

कित्येक नाती क्षणार्धात उद्धवस्त करणारी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन गॅप म्हणजेच आटलेला संवाद. रिलेशनशीप एक्सपर्ट्सचं म्हणणं देखील हेच आहे की प्रियकर-प्रेयसी असो वा पती-पत्नी, त्यांचं एकमेकांशी कनेक्ट राहणं, संवाद साधणं, भावनिकरित्या जोडलेलं राहणं, एकमेकांची परिस्थिती जाणून घेणं खूप गरजेचं असतं. संवाद आटला नाही तर नात्यात ना दुरावा येईल ना गैरसमजाला जागा राहिल. खूप संवाद व शुन्य गैरसमज हे एका खुश नात्याची लक्षणे आहेत.

(वाचा :- ‘या’ ५ इच्छा पूर्ण करणा-या पुरुषांची पत्नी असते कायम खुश!)

आदर

जर तुमच्या नात्यात प्रेमासोबतच आदर देखील असेल तर विश्वास ठेवा तुम्हा एका आनंदी नात्यात आहात. नात्यात एकमेकांप्रती जेव्हा आदर असतो तेव्हा जोडपी एकमेकांचा मजबूत सपोर्ट सिस्टम बनण्यासोबतच एकमेकांना चांगली व्यक्ती बनवण्यास देखील मदत करतात. अशा नात्यात कधीच एकमेकांना ठेच पोहचवण्याची स्थिती येत नाही. मनातील आदर समाजात देखील जोडीदाराला मानाचं स्थान मिळवून देतो. तसंच जोडीदाराला कुठे अपमानास्पद वागणुक मिळाल्यास मनातील आदर समोरच्या व्यक्तीस चोख उत्तर देण्यास भाग पाडतो.

(वाचा :- ‘या’ ५ गोष्टी दर्शवतात वाईट पतीची लक्षणे!)

एकमेकांची साथ एन्जॉय करणं

आपण कायमच अशा लोकांसोबत राहू इच्छितो ज्यांसोबत आपल्याला कम्फर्टेबल वाटेल, ज्यांच्यासोबत आपण मनातील गोष्टी मनमोकळीपणे शेअर करु शकतो, ज्यांच्यासोबत वाद होऊनही मनात तिरस्कार निर्माण होत नाही, जो नेहमी व कोणत्याही परिस्थितीत आपल्यासोबत उभा राहतो व आपल्यााल लगेच जज करत नाही. जर तुम्हाला जोडीदाराकडून या गोष्टी मिळत असतील तर तुम्ही फक्त एका आनंदी नात्यातच नाही तर एखा सुरक्षित व्यक्तीसोबत आहात हेच सिद्ध होतं.

(वाचा :- प्रेमात पडण्याआधी स्विकारा नात्याबाबतची ‘ही’ ५ सत्य!)

भावनांची कदर

हल्लीचं जग हे भरपूर प्रॅक्टिल असून इथे भावनांना फारशी किंमत नाही. प्रत्येकजण आपल्या गोष्टीत इतकं व्यस्त असतं की दुस-याचं सुख-दु:ख पाहण्यासाठी त्याला वेळच नसतो. अशा या प्रॅक्टिकल जगात तुमच्या हसण्याने, रडण्याने, उदास होण्याने, चिंतीत असण्याने कोणाला फरक पडत असेल तर खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. कारण भावनांची कदर करणारा जोडीदार नातं सुखी व हसरं ठेवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न करत राहतो. जर तुम्हाला एका हॅपी नात्याचे पैलू पारखायचे असतील तर वरील ५ लक्षणं एकदम उत्तम पर्याय आहेत. या महत्त्वाच्या गोष्टी जरी नात्यात दिसल्या तरी तुमचं नातं शेवटच्या श्वासापर्यंत घट्ट व आनंदी राहू शकतं.

(वाचा :- लग्नानंतरची दोन वर्षे प्रत्येक जोडप्यासाठी असतात खूप महत्त्वपूर्ण, या गोष्टींची घ्या आवर्जून काळजी!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *