आयव्हीएफ ट्रिटमेंट घेण्याआधी काय करावं व काय नाही? जाणून घ्या महत्त्वाची माहिती!

Spread the love

आयव्हीएफ ट्रिटमेंट का केली जाते?

आयव्हीएफ म्हणजे इन विट्रो फर्टिलाइजेशन होय. या प्रक्रीये मध्ये महिलेच्या अंडाशयातून बीज घेऊन त्याला विर्यासोबत फर्टिलाइज केले जाते. अनेक स्त्रियांना आई होण्याचे सुख लाभत नाही. स्त्रिया नैसर्गिक रित्या गरोदर न राहण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असतात. जर फेलोपीयान ट्यूब ब्लॉक किंवा डॅमेज असेल, पुरूषामध्ये स्पर्म काउंट कमी असेल, स्त्रीला ओवूलेशनची समस्या असेल, प्रिमेच्युर ओवेरीयन फेल्युअर वा गर्भाशयात समस्या असले तरी गरोदर राहण्यात अडथळा निर्माण होतो. याशिवाय ज्या स्त्रियांच्या फेलोपियन ट्यूब काढून टाकली आहे किंवा त्या कोणत्या अनुवांशिक विकाराने ग्रस्त असतील आणि गरोदर राहत नसतील तर अशावेळी आयव्हीएफ प्रक्रीयेचा वापर केला जातो.

(वाचा :- प्रेग्नेंसीतील लठ्ठपणा कमी करण्यासाठी शिल्पा शेट्टी रोज रिकाम्या पोटी करायची ‘या’ फळाचे सेवन!)

आयव्हीएफचे दुष्परिणाम

आयव्हीएफ हि जरी एक एक क्रांतिकारी प्रक्रिया असली तर याचे काही दुष्परिणाम स्त्रीला भोगावे लागू शकतात आणि आयव्हीएफ प्रक्रिया वापरण्यापूर्वी ते स्त्रीला आणि घरातील मुख्य सदस्याला माहित असायला हवेत जेणेकरून काही त्रास झाला तर त्यासाठी ते तयार राहू शकतात. आयव्हीएफ ट्रिटमेंट मुळे स्त्रीला मोठ्या मानसिक ताण तणावाला सामोरे जावे लागते. आयव्हीएफ ट्रिटमेंट मध्ये एका पेक्षा जास्त प्रेग्नेंसी होऊ शकतात. म्हणजेच स्त्रीला जुळं वा तीळं देखील होऊ शकतं. आयव्हीए ट्रिटमेंटमध्ये हार्मोनल इंजेक्शन घेतली जातात यामुळे शरीरात अनेक बदल घडतात व हे बदल वेदनादायी असू शकतात.

(वाचा :- प्रेग्नेंसीमध्ये का होतात छातीत वेदना? यामागे कोणता गंभीर आजार तर कारणीभूत नाही ना?)

ताण तणावापासून दूर राहावे

आता आपण जाणून घेऊया की आयव्हीएफ ट्रिटमेंट करताना कपल्सने काय करावे आणि काय करू नये. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपल्सने ताण तणावापासून संपूर्णत: दूर राहावे आणि आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा. आपण नैर्सगिकरित्या आई वडील होऊ शकत नाही हा ताण कपल्स वर असू शकतो. याचा प्रभाव त्यांच्या फर्टीलिटी वर पडू शकतो. आयव्हीएफ ट्रिटमेंट सुरु होण्याच्या आधीपासूनच अगदी आनंदी आणि तणावमुक्त आयुष्य जगण्यास सुरुवात करावी. यामुळे आयव्हीएफ ट्रिटमेंट यशस्वी होण्याच्या शक्यता खूप वाढतात.

(वाचा :- अर्जुन रामपालची प्रेयसी गॅब्रिएलाने डिलिव्हरीनंतर ११ दिवसांत केलं तब्बल २१ किलो वजन कमी!)

व्यसन सोडून द्या

जे कपल्स सतत व्यसन करतात अर्थात ज्यांना खूप दारू आणि सिगारेट पिण्याची सवय असते, अश्यांची ही सवय आयव्हीएफ ट्रिटमेंटवर परिणाम करू शकते. आयव्हीएफ ट्रिटमेंट घेण्यापूर्वी कपल्सने आपले व्यसन किमान 5-6 महिने आधी पूर्णपणे सोडणे अपेक्षित असते. आयव्हीएफ ट्रिटमेंट झाल्यानंतर सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या काही काळ व्यसन करू नये. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्या केवळ व्यसनामुळे आयव्हीएफ ट्रिटमेंट अयशस्वी झाली आणि त्याचे दुष्परिणाम स्त्रियांना भोगावे लागले. या शिवाय कॉफी आणि चहाचे व्यसन असल्यास ते देखील कपल्सने कमी करावे असे सांगितले जाते.

(वाचा :- प्रेग्नेंसीमधील पोटदुखी दूर करण्यासाठी ट्राय करा ‘हे’ सुरक्षित घरगुती उपाय!)

योग्य आयव्हीएफ सेंटरची निवड

आयव्हीएफ ट्रिटमेंट आता अनेक ठिकाणी केली जाते पण आपण योग्य ठिकाणी आयव्हीएफ ट्रिटमेंट घेत आहोत याची खात्री कपल्सने करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. कपल्सने जाणून घेतले पाहिजे की त्यांच्याकडे कोणत्या सुविधा आहेत? त्यांच्याकडे आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध आहे का? तेथील डॉक्टर तज्ञ आणि कर्मचारी कुशल आहेत का? डॉक्टरांची कारकीर्द सुद्धा तपासून घेतली पाहिजे. हे यासाठी कारण आयव्हीएफ ट्रिटमेंट हि बऱ्यापैकी खर्चिक देखील ठरू शकते. त्यामुळे आपण योग्य ठिकाणी पैसे गुंतवत आहोत याची खातरजमा करणे उत्तम! तर या काही गोष्टी कपल्सने आयवीएफ ट्रिटमेंट करताना लक्षात ठेवाव्यात.

(वाचा :- नवव्या महिन्यात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, योग्य वेळी उघडेल गर्भाशयाचे तोंड!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *