आरोग्यासाठी अंड खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या अंड शिजवण्याची योग्य पद्धत

Spread the love

प्रोटीनचा सर्वात उत्तम स्त्रोत म्हणजे अंड. आकर्षक शरीरयष्टी मिळवण्यासाठी बहुतांश जण आवर्जून आपल्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करतात. अंड्यामध्ये कित्येक प्रकारच्या पोषक घटकांचा समावेश आहे. जे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात आणि शरीर फिट ठेवण्याचेही कार्य करतात. महत्त्वाचे म्हणजे अंड शिजवणे खूप सोपे आहे, यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही या पदार्थाचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश करू शकता.

फिटनेससाठी बहुतांश जण उकडलेले अंड ब्रेड टोस्ट, शिमला मिरची आणि पालक यासारख्या वेगवेगळ्या भाज्यांसोबतही खातात. दरम्यान अन्य खाद्यपदार्थाच्या खाण्या- पिण्याच्या वेळेप्रमाणेच अंड्याचंही सेवन योग्य वेळेतच होणे आवश्यक आहे. निरोगी आरोग्यासाठी अंड योग्य वेळेतच खाण्याची सवय लावून घ्यावी. अंड खाण्याची बेस्ट वेळ कोणती? जाणून घेऊया सविस्तर माहिती
(तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी?)

​पौष्टिक नाश्ता

शरीर निरोगी राहण्यासाठी कित्येक प्रकारच्या पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. या पोषण तत्त्वांची आवश्यकता आपण आहाराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. अंड्याच्या सेवनामुळे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड खाणे अतिशय लाभदायक असते. अंड शिजवण्यासाठी पाच ते १० मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजे तुमचा नाश्ता अगदी झटपट तयार होतो. अंड्यामध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह आणि प्रोटीन यासारखे पोषक तत्त्व मुबलक प्रमाणात असतात. महत्त्वाचे म्हणजे प्रोटीनयुक्त नाश्ता केल्यास आपल्याला वारंवार भूक लागत नाही.

(Health Care Tips अपचनाची समस्या दूर करण्यासाठी हिरडा खाणे योग्य ठरेल का?)

​वर्कआउट केल्यानंतर

वर्कआउट केल्यानंतर खूप भूक लागते. अशा वेळेस अंड खाणे शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. भूक शांत करण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायू -पेशी दुरुस्त करण्यासाठी अंड्यातील पोषक घटकांची भरपूर मदत मिळते. आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात पोषण तत्त्वांंचा पूर्तता होणं आवश्यक आहे, यासाठी अंड हा पर्याय उत्तम आहे. आहारतज्ज्ञ देखील अंडी खाण्याचा सल्ला देतात. वर्कआउट केल्यानंतर दोन उकडलेली अंडी किंवा टोमॅटो, शिमला मिरची, पालक मिक्स करून अंड्याची पोळी तयार करा आणि त्याचा आस्वाद घ्या. या पदार्थांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

(Herbal Tea चहाप्रेमींनो तुम्हाला या पाच हर्बल टी माहीत आहेत का?)

​रात्रीच्या जेवणानंतर

काही अभ्यासातील माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर अंड खाणे हा एक पौष्टिक पर्याय आहे. तर दुसरीकडे रात्रीच्या जेवणानंतर अंड खाल्ल्याने झोपेवर परिणाम होतो, अशीही माहिती काही अभ्यासांमध्ये आढळली आहे. रात्रीच्या जेवणानंतर अंड खाल्ल्यास शरीरात आम्ल वाढल्यास काही जणांना निद्रानाशेच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, असे म्हणतात. अंड्याच्या पिवळ्या बलकामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते, यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो. दरम्यान रात्रीच्या जेवणानंतर अंडे खाल्ल्यास चांगली झोपे येते, अशीही माहिती काही अभ्यासांमध्ये नमूद करण्यात आलीय.

(Health Care Tips इवल्याशा पारिजात फुलाचे मोठे फायदे माहिती आहेत का?)

​अंड शिजवण्याची पद्धत

नेहमी पौष्टिक तेलामध्ये अंड्याचे पदार्थ तयार करावेत. अंड शिजवण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करावा. अंड जास्त शिजवू नये, अन्यथा यातील पोषक तत्त्व घटण्याची शक्यता असते. योग्य वेळेत अंड्याचे सेवन केल्यास शरीराला पोषण तत्त्वांचा योग्य प्रमाणात पुरवठा होतो. सकाळी नाश्त्यामध्ये, रात्रीच्या जेवणानंतर किंवा वर्कआउट नंतर उकडलेले अंड किंवा ऑम्लेटचं सेवन करू शकता.

(मधुमेह होण्याची नवी कारणे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती)

​ऊर्जा वाढवण्यासाठी

सकाळच्या नाश्त्यामध्ये अंड खाल्ल्यास संपूर्ण दिवसभर तुमच्या शरीरात ऊर्जा कायम टिकून राहू शकते. शरीरासाठी पोषक असणाऱ्या व्हिटॅमिन आणि खनिजांचा अंड्यामध्ये प्रचंड प्रमाणात समावेश आहे. हे घटक शरीराच्या पेशींना ऊर्जा देण्याचे कार्य करतात.

(Knee Pain Home Remedy गुडघेदुखीमुळे त्रस्त आहात का? जाणून घ्या घरगुती उपाय)

NOTE आपल्या आहारामध्ये अंड्याचा किती प्रमाणात आणि कसा समावेश करावा, याची योग्य माहिती जाणून घेण्यासाठी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *