आलिया भटचे डिझाइनर कपड्यांवरील प्रेम तिच्या बॉलिवूडमधील पदार्पणापासूनच सिनेरसिकांना पाहायला मिळत आहे. २०१२ मध्ये बॉक्सऑफिसवर झळकलेल्या ‘स्टुडंट ऑफ द इअर’ सिनेमासाठीचे सर्व आउटफिट सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केले होते. तेव्हापासून आलियाच्या वॉर्डरोबमध्ये सब्यसाची, अबू जानी संदीप खोसला, अनामिका खन्ना, अनीता डोंगरे आणि मनीष मल्होत्रा यांच्या शानदार कपड्यांचे कलेक्शन पाहायला मिळते. दुसरीकडे आलिया तिच्या स्टाइलमध्ये नेहमीच काही-न्-काही प्रयोग करताना दिसतेच.
प्रिंसेस बॉलगाउन, ट्युल ड्रेस आणि चंकी सँडल, डिझाइनर लेहंगे, फ्लोरल कुर्ता, कुल अँड कम्फर्टेबल मिनी ड्रेस आणि ऑफ शोल्डर पार्टी गाउन अशा आउटफिटमध्ये दिसणारी आलिया महागड्या ब्रँड्सव्यतिरिक्त कमी किंमतीतील कपडे देखील परिधान करते. याचेच उदाहरण म्हणजे आलियाने दिवाळीसाठी हजारो- लाखो रुपयांच्या कपड्यांऐवजी एक असा लेहंगा घातला होता, ज्याबाबत कोणी कधी विचारही केला नसेल. तिचा हा लेहंगा अतिशय खास होता. जाणून घेऊया सविस्तर माहिती…
Source link
Recent Comments