आलिया भटचा ‘हा’ लुक पाहून नेटकऱ्यांना दीपिका पादुकोणची आली आठवण, म्हणाले…

Spread the love

प्रिंसेस बॉलगाउन, चंकी सँडल आणि ट्युल ड्रेस अशी स्टायलिश वेशभूषा परिधान करून आलिया भटने (Alia Bhatt) बॉलिवूडमध्ये दमदार एंट्री केली होती. आलियाची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या भली मोठी आहे. बॉलिवूडमधील स्टायलिश अभिनेत्रींच्या यादीमध्येही आलियाच्या नावाचा समावेश आहे. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत आलियाला चमकदार रंगांच्या पँट आणि ग्राफिक-प्रिंटेड टी-शर्ट परिधान करणं भरपूर पसंत होते. दुसरीकडे तिच्या वॉर्डरोबमध्ये तुम्हाला फ्लोरल कुर्ता, मिनी ड्रेस, ऑफ शोल्डर पार्टी गाउन, डिझाइन साड्या, कसाटा ड्रेस, मोनोक्रोमॅटिक को-ओर्ड, गिंगम पॅटर्न कपडे यासारख्या फॅशनेबल कपड्यांचे कलेक्शन पाहायला मिळेल.

पारंपरिक लुकसाठी आलिया भट सब्यसाची यांनी डिझाइन केलेले आउटफिट परिधान करणं पसंत करते. तर वेस्टर्न लुकसाठी ती Lovebirds, Prabal Gurung, Silvia Tcherassi आणि Georges Hobeika यासारख्या प्रसिद्ध फॅशन डिझाइनर्सनी तयार केलेलेच कपडे निवडते. सध्या आलियाला कलर्ड ब्लॉक स्टाइलचे कपडे घालणे आवडत असल्याचं दिसतंय. असाच काहीसा तिचा कम्फर्टेबल लुक नुकताच सोशल मीडियावर पाहायला मिळाला. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा आगामी सिनेमा ‘आरआरआर’च्या शूटिंगसाठी ही अभिनेत्री रविवारी (६ डिसेंबर) मुंबईहून हैदराबादकडे रवाना झाली. यादरम्यान आलियाचा हटके लुक तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला.
(रणवीर सिंह विचित्र फॅशनमुळे पुन्हा चर्चेत, गळ्यात मोत्यांची माळ घातलेला फोटो केला शेअर)

​आलियाची स्टाइल फर्स्ट क्लास

आलिया भट कम्फर्टेबल आणि फॅशनेबल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिची बोल्ड स्टाइल देखील कोणीही सहजरित्या फॉलो करू शकतात. नुकतेच आलियाचे कम्फर्टेबल लुकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. स्टायलिश अवतार कॅरी करण्याऐवजी आलियाने आपल्या साध्या लुकनंच चाहत्यांचं मन जिंकलं.

(बोल्ड ड्रेसमुळे आलिया भटला करावा लागला असता या घटनेचा सामना,थोडक्यात बचावली)

​आलियाचं हटके स्टायलिंग

मुंबईहून हैदराबादला जाण्यासाठी विमान प्रवास करताना आलिया भटने अतिशय कूल आणि कम्फर्टेबल कपड्यांची निवड केली होती. अभिनेत्रीचं डबल शेडचं जॅकेट तिच्या चाहत्यांना भरपूर आवडलं. आलियानं हैदराबादला जाताना डिझाइनर पलक शहाचं फॅशन लेबल Exhale Labelच्या मोनोटोन ब्लॅक Fragile स्वेटसेट्स आणि इटॅलियन फॅशन लेबल Dieselच्या हायब्रिड जॅकेट घातलं होतं . यामध्ये आलिया नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत होती.

(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

​कसा होता लुक?

आलिया भटचा Fragile स्वेटसूट पूर्णतः कॉटन फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. यास ओवरसाइझ्ड लुक देण्यात आला आहे. टी-शर्टच्या स्लीव्ह्जवरील बारकोड स्कॅन प्रिंटमुळे आउटफिटला आकर्षक लुक मिळाला आहे. तुम्हाला आलिया भटची ही स्टाइल आवडली का? तिचा हा लुक तुम्ही सहजरित्या फॉलो करू शकता. हा Fragile सेट तुम्हाला ३ हजार ३०० रुपयांमध्ये मिळेल. ज्यामध्ये टी-शर्टची किंमत दीड हजार रुपये आणि पँटची किंमत एक हजार ८०० रुपये एवढी आहे.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)

​स्टायलिश जॅकेट

मोनोटोन सेटला स्टायलिश लुक देण्यासाठी आलियाने Diesel ब्रँडचं ‘Neon X Denim Hybrid Jacket’ परिधान केलं होतं. यामध्ये साइड पॉकेट्ससह मागील बाजूस कंपनीचा लोगो देखील प्रिंट करण्यात आला आहे. तसंच या जॅकेटला समोरील बाजूस झिप पॅटर्न डिझाइन जोडण्यात आलंय. आलियाच्या या जॅकेटची किंमत २८ हजार ५७९ रुपये एवढी आहे.

(आलिया भटचा मोहक लुक, ३५ शाळकरी मुलांनी या लेहंग्यावर काढले आहेत असे सुंदर डिझाइन)

​नेटकऱ्यांना आठवली दीपिका पादुकोण

आलियाचे या स्टायलिश अवतारातील फोटो समोर आल्यानंतर काही जणांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला तर काही जणांनी तिला ट्रोल देखील केलं. तर आलियानं दीपिका पादुकोणची स्टाइल कॉपी केल्याचंही नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण आलियाचा हा लुक अतिशय हटके होता. तुम्ही देखील सहजरित्या तिची ही स्टाइल फॉलो करू शकता.

(आलिया भटने बहिणीच्या वाढदिवशी हा महागडा ड्रेस केला होता परिधान, पाहा स्टायलिश फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *