आलिया भटने बहिणीच्या वाढदिवशी या महागड्या ड्रेसची केली निवड, पाहा स्टायलिश फोटो

Spread the love

​आलियाचा क्युट लुक

आलिया भटने बहिणीच्या वाढदिवसासाठी ग्लॅमरसऐवजी क्युट लुकची निवड केली होती. या लुकमध्ये आलिया भट नेहमी प्रमाणे सुंदर दिसत होती. या अभिनेत्रीनं नी लेंथ समर ड्रेस परिधान केला होता. हिरव्या रंगाचा ड्रेस पोपलिन फॅब्रिकपासून तयार करण्यात आला होता. या आउटफिटवर आपण क्रॉस स्ट्रॅप, सेमी स्वीटहार्ट नेकलाइनसह फ्लेअर्ड डिझाइन पाहू शकता. आउटफिटचा रंग आणि डिझाइन आलियावर परफेक्ट शोभून दिसत आहे.

(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

​आलियाचा महागडा ड्रेस

आलिया भटने या नी-लेंथ ड्रेसवर डेनिमचे क्रॉप्ड जॅकेट मॅच केले होते. ज्यावर फ्रिंज, पॉकेट, कॉलर डिझाइनसह एल्बो लेंथ स्लीव्ह्ज आपण पाहू शकता. हिरव्या रंगाच्या या ड्रेसवर पांढऱ्या रंगाचे प्रिंट आहे. या ड्रेसवर आलियाने पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते. तिचं फेस मास्क देखील आउटफिटशी मॅच असणाऱ्या फॅब्रिकपासून तयार करण्यात आले होते. आलियानं हाफ पोनी व हाफ ओपन हेअर स्टाइल केली होती. आलिया भटचा हा अ‍ॅब्सट्रॅक्ट फ्लोरल प्रिंट ड्रेस Saaksha & Kinni ब्रँडचा आहे. डिझाइनर्सच्या वेबसाइटवर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार, या ड्रेसची किंमत तब्बल १६ हजार रुपये एवढी आहे. तर आलियाच्या स्नीकर्सची किमत जवळपास ५ हजार रुपये एवढी असल्याचं सांगितलं जातंय.

(दीपिका पादुकोणचा ‘हा’ ग्लॅमरस अवतार पाहुन नेटकऱ्यांनी व्यक्त केल्या होत्या अशा प्रतिक्रिया, म्हणाले…)

​सोनी राजदानचा मोहक लुक

आपल्या मुलींसोबत सोनी राजदान देखील लंच डेटवर गेल्या होत्या. यावेळेस त्यांनी अतिशय साध्या आणि मोहक लुकची निवड केली होती. सोनी राजदान यांनी करड्या रंगाचा अँकल लेंथ ड्रेस परिधान केला होता. यावर प्लीटेड डिझाइन आपण पाहू शकता. फुल स्लीव्ह्जच्या या ड्रेसमध्ये व्ही कट नेकलाइन होतं. ड्रेसवर पूर्णतः गुलाबी रंगाचे फ्लोरल प्रिंट होते. ज्यामुळे ड्रेसला ट्रेंडी लुक मिळाला होता. सोनी राजदान यांनी या आउटफिटवर सोनेरी रंगाचे फ्लॅट सँडल्स मॅच केल्या होत्या.

(आलिया भटचा मोहक लुक, ३५ शाळकरी मुलांनी या लेहंग्यावर काढले आहेत असे सुंदर डिझाइन)

​शाहीनचा क्युट लुक

तर दुसरीकडे बर्थ-डे गर्ल शाहीन भटने देखील सुपर क्युट लुकची निवड केली होती. स्टार फॅमिलीची लाडकी लेक शाहीननं रंगीबेरंगी स्वेटशर्ट परिधान केला होता. ज्यावर रॅम्बो आणि टेडीचे प्रिंट आपण पाहू शकता.

(रब ने बना दी जोडी! विराटच्या वाढदिवशी अनुष्काने परिधान केला होता ‘हा’ सर्वात सुंदर ड्रेस)

यावर शाहीनने मॅचिंग रंगाची पिन लाइनिंग पॅटर्न पँट परिधान केली होती. तिचा हा लुक स्टायलिश आणि कम्फर्टेबल होता. यावर तिनं पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स मॅच केले होते. तिची हेअरस्टाइल देखील साधी होती.

(अनुष्का शर्मा व मीरा राजपूतने परिधान केले एकसारखेच कपडे? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *