आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

Spread the love

​आलियाने परिधान केला लेबनानी फॅशन डिझाइनरचा ड्रेस

आलिया भटने चेस बोर्ड प्रिंट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हा ड्रेस लेबनानी फॅशन डिझाइनर Georges Hobeikaने डिझाइन केला होता. हे आउटफिट त्यांच्या लेटेस्ट स्प्रिंग-समर २०२१ कलेक्शनचा भाग आहे. या ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन डिझाइन तुम्ही पाहू शकता. या बॉडीकॉन मिनी ड्रेसमध्ये खांद्यांना केप देखील जोडण्यात आले आहे, जे एकसारख्याच प्रिंट डिझाइन आणि फॅब्रिकपासून तयार करण्यात आलंय. या ड्रेसवर आलियानं लाइट टोन मेकअप, स्लिक आणि मेसी पोनी असा लुक कॅरी केला आहे.

(Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का)

​आईच्या वाढदिवशी आलियाने या ड्रेसची केली होती निवड

या पोस्टपूर्वी आलियानं आई सोनी राजदान यांच्या वाढदिवसानिमित्त काही फोटो शेअर केले होते. आलियाने आईच्या वाढदिवशी खूप गोंडस ड्रेस परिधान केला होता. हलक्या रंगाचा हा ऑफ शोल्डर ड्रेस सुप्रसिद्ध डिझाइनर Mara Hoffman लेबलचा आहे. या ड्रेसचे स्लीव्ह्ज बलून डिझाइनचे होते. आलियाने (Alia Bhatt) या ड्रेसवर सेंटर पार्टेड स्लीक पोनी हेअरस्टाइल केली होती. मेकअप देखील लाइट टोन ठेवला होता.

(बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?)

​सुंदर रंगीबेरंगी ड्रेस

काही दिवसांपूर्वी आलियानं रंगीबेरंगी ड्रेसमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. तिच्या या लुकची बरीच चर्चा सुद्धा झाली होती. हा ड्रेस Saaksha & Kinni यांनी डिझाइन केला होता. स्पगेटी स्लीव्ह्ज, व्ही कट नेकलाइन, फ्लेअर अँड टायर्ड डिझाइनचे असलेल्या या ड्रेसमध्ये आलिया प्रचंड सुंदर दिसत होती. या ड्रेसवर आलियाने लाइट टोन मेकअप केला होता आणि मेसी हेअरस्टाइल केली होती. ज्यामुळे तिला परफेक्ट लुक मिळाला होता.

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)

​को-ऑर्ड पँट आणि टॉप

जेव्हा फोटोशूटची चर्चा केली जाते तेव्हा पोझ देण्याच्या बाबतीत आलिया भटसोबत स्पर्धा करणं सोपं काम नव्हे. आलियाचा हाच फोटो पाहा ना, यामध्ये अभिनेत्रीने को-ऑर्ड पँट आणि ऑफ शोल्डर क्रॉप टॉप परिधान केल्याचे दिसत आहे. हे आउटफिट घालून आलियानं पायऱ्यांवर पोझ दिली आहे.

(मेटॅलिक लुक ठरतोय हिट! तरुणींमध्ये ‘या’ पॅटर्नची का आहे इतकी क्रेझ)

तिच्या या मोहक अदांमुळे फोटोला ग्लॅमरस टच मिळाला आहे. या लुकसाठी आलियाने लाइट टोन मेकअप केला आहे. यामध्ये तिनं आपले डोळे अधिक हायलाइट केले आहेत. कोणतीही ज्वेलरी मॅच न करता तिनं खांद्यावर केवळ बॅग कॅरी केली आहे.

(वादविवादांव्यतिरिक्त ‘Bigg Boss 14’ अभिनेत्री गौहर खानच्या ‘या’ गोष्टीमुळे आहे चर्चेत)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *