इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’

Spread the love

बॉलिवूडची ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षित आजही आपल्या स्टायलिश लुक, अप्रतिम फॅशन सेन्स आणि शानदार अभिनयासाठी ओळखली जाते. ९०च्या दशकातील ती एकमेव अशी अभिनेत्री होती की, जिच्या स्टाइलची केवळ देशातच नव्हे तर परदेशातही भरपूर चर्चा होत असे. साडीतील तिच्या मोहक – घायाळ करणाऱ्या अदा असोत किंवा मराठमोळा लुक असो… माधुरीची प्रत्येक स्टाइल पाहण्यासारखीच असते. माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर क्वचितच दिसत असली तरी चाहत्यांमधील तिची क्रेझ आजही कायम आहे.

माधुरी दीक्षितच्या करिअरमधील एक काळ असा होता की लोक केवळ तिची झलक पाहण्यासाठी सेटच्या आसपास गर्दी करत असत. माधुरीचा एखादा सिनेमा बॉक्स ऑफिसवर झळकल्यानंतर चित्रपटातील तिच्या आउटफिटचा ट्रेंड लगेचच बाजारात पाहायला मिळत असे. यावरून आपण माधुरीच्या आयकॉनिक लुकचा अंदाज बांधू शकता. यापैकीच तिने परिधान केलेलं एक ओव्हर जेकेटचं स्टाइल त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं.
(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​ब्लॉकबस्टर ‘राजा’ सिनेमातील लुक

माधुरी दीक्षित आणि संजय कपूर या जोडीचा ब्लॉकबस्टर सिनेमा ‘राजा’ तुम्हाला लक्षात असेलच. ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ सिनेमानंतर सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा म्हणजे ‘राजा’. हा सिनेमा २५ वर्षांपूर्वी बॉक्सऑफिसवर झळकला होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका पेजने या सिनेमातील लोकप्रिय ठरलेलं आउटफिट डिझाइन एका ब्रँडचे कॉपी असल्याचे म्हटलं होतं.

(स्टायलिश ड्रेसवरून नेटिझन्सनी अभिनेत्री मौनी रॉयला केलं होतं ट्रोल, म्हणाले… )

​स्टायलिश जॅकेटचे डिझाइन कॉपी केलेले होतं?

‘राजा’ सिनेमामध्ये ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’ गाण्यामध्ये माधुरीने एक स्टायलिश जॅकेट परिधान होते. सोशल मीडियावरील एका पेजने या जॅकेटचे डिझाइन कॉपी असल्याचं म्हटलं होतं. सिनेरसिकांमध्ये आजही लोकप्रिय असलेल्या या गाण्यासाठी माधुरी दीक्षितने मल्टी शेड क्रॉप टॉपसह फुल स्लिव्ह्जचे जॅकेट आणि काळ्या रंगाची पँट परिधान केली होती. यावर तिनं एक चंकी बेल्ट सुद्धा मॅच केलं होतं.

(‘सबसे खतरनाक होता है हमारे सपनों का मर जाना’, अली फजलच्या टी-शर्टनं वेधून घेतलं)

​माधुरी दीक्षितचा मेकअप

या आउटफिटसह तिनं कमीत कमी पण आकर्षक मेकअप केला होता. स्मोकी आईज आणि बँग्स हेअरस्टाइलमुळे तिचा लुक अतिशय आकर्षक दिसत होता. माधुरी दीक्षितचा हा अवतार समोर आल्यानंतर चाहते तिच्यावर अधिकच फिदा झाले होते. या लुकमध्ये माधुरी अतिशय सुंदर आणि मोहक दिसत होती.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग)

​कोणत्या ब्रँडचं डिझाइन केलं कॉपी?

दरम्यान आता इतक्या वर्षांनंतर सोशल मीडियावरील फॅशन पेजचे या आउटफिटकडे लक्ष गेले. संबंधित ड्रेस इटालियन लक्झरी ब्रँड ‘वर्साचे’ च्या कलेक्शनमधील कॉपी असल्याचे या फॅशन पेजचे म्हणणं आहे. इन्स्टाग्रामवर #GandiCopies या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या ‘डाएट सब्या’ या फॅशन पेजनं माधुरीच्या डिझाइनवर देखील निशाणा साधला. तसंच सुपरमॉडल क्रिस्टी टर्लिंगटन स्टायलिश जॅकेट घालून रॅम्प वॉक केल्याचा व्हिडीओ देखील शेअर केला होता.

(Bollywood Fashion अनुष्का शर्माच नव्हे तर या अभिनेत्रींनीही प्रेग्नेंसीमध्ये परिधान केले होते स्विमसूट)

सुपरमॉडल क्रिस्टी टर्लिंगटनचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

​डिझाइनरने पोस्टवर केली कमेंट

गंमतीशीर भाग म्हणजे चित्रपटाच्या डिझाइनरने (Costume Designer) डाएट सब्यच्या या पोस्टवर कमेंट देखील केली. त्यांनी म्हटलं की ‘दिग्दर्शकानं ड्रेसच्या डिझाइनची माहिती पाठवली होती, त्यामुळे हा निर्णय माझा नव्हता. सिनेमाची आवश्यकता पूर्ण करणे गरजेचं होते’. असो, पण माधुरी दीक्षितच्या या जॅकेटचे डिझाइन कायम सिनेरसिकांच्या लक्षात राहील.

(सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराचा फॅशनेबल लुक, तिच्या स्टाइलला कोणीही देऊ शकत नाही टक्कर)




Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *