ईशा अंबानीने लग्नासाठी फॉलो केला होता आईसारखा ब्रायडल लुक, पाहा ३५ वर्षांपूर्वींचे नीता अंबानींचे फोटो

Spread the love

ईशा अंबानीच्या विवासोहळ्याची चर्चा केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात झाली होती. या भव्यदिव्य लग्नसमारंभामध्ये देशभरासह परदेशातीलही कित्येक दिग्गज मंडळी सहभागी झाले होते. दरम्यान ईशाने लग्नामध्ये आपल्या आईचा ३५ वर्षांपूर्वीचा लुक फॉलो करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटलं जात आहे. नीता अंबानी यांच्या लग्नसोहळ्यातील काही फोटो पाहिले तर तुम्हालाही हिच बाब दिसेल. ईशानं ब्रायडल लेहंग्यासह मेकअपही हुबेहूब आपल्या आईप्रमाणेच केला होता.

मुकेश अंबानींचं थाटामाटात झाले होते लग्न
धीरूभाई अंबानी यांनी आपला मोठा मुलगा मुकेश अंबानी यांचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात रचला होता. नीता आपल्या घराची सून व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. ही इच्छा पूर्ण झाल्याने धीरूभाई यांचा आनंद द्विगुणित झाला होता. गुजराती रीतीरिवाजांप्रमाणे हे लग्न थाटामाटामध्ये पार पडले. दरम्यान नीता आणि ईशा यांच्या लग्नाच्या पोषाखामध्ये बरेच साम्य होते.
(लग्नासाठी लेहंगा, साडी खरेदी करण्यावरून आहे गोंधळ? मग हे नक्की वाचा)

​सिल्क पॅटर्न साडी

लग्नासाठी नीता यांनी सिल्क पॅटर्न साडीची निवड केली होती. लाल आणि पांढरा अशी रंगसंगती असलेल्या या साडीवर सुंदर बांधनी प्रिंट होते. तर पदराच्या बॉर्डरवर सोनेरी धाग्यांनी नक्षीकाम करण्यात आले होते. या साडीवर नीता यांनी मॅचिंग बांधनी प्रिंटचे ब्लाउज परिधान केले होते. यावर तुम्हाला सोनेरी रंगाच्या घुंगरूंची डिझाइन पाहायला मिळेल. घुंगरूंचे हे वर्क सुंदर दिसत आहे.

(पूजेसाठी नीता अंबानी लाल रंगाचेच कपडे करतात परिधान, यामागे काय आहे कारण?)

​पारंपरिक दागिने

नीता यांनी चोकर नेकलेस, मॅचिंग ईअररिंग्स, मांगटिका आणि नथ असे दागिने परिधान केले होते. त्यांनी साडीला मॅचिंग अशा बांगड्या देखील घातल्या होत्या. त्यांच्या हातांमध्ये तुम्हाला अगदी मोजक्याच बांगड्या दिसतील. साधा मेकअप आणि पोषाखामुळे नीता अंबानी सुंदर आणि मोहक दिसत होत्या. तर मुकेश अंबानी यांनी शेरवानी परिधान केली होती आणि त्याला मॅचिंग असा फेटा डोक्यावर घातला होता.

(नीता अंबानींनी सूनेसाठी डिझाइन केला होता खास लेहंगा, पाहा फोटो)

​ईशाने कॉपी केला लुक?

आपणही आपल्या आईप्रमाणे दिसावे, अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते. ईशा अंबानीने देखील स्वतःच्या लग्नातील एक वेगळी आठवण जपून ठेवण्यासाठी आपल्या आईचा ३५ वर्षांपूर्वीचा लुक फॉलो करण्याचा प्रयत्न केला. यासाठी केवळ आपल्या ब्रायडल लेहंग्याचे डिझाइनच नव्हे तर आईनं स्वतःच्या लग्नासाठी ज्या प्रकारे मेकअप-दागिन्यांची निवड केली होती, त्या सर्व गोष्टी ईशानं काही प्रमाणात फॉलो केल्याचे म्हटले जात आहे.

(नीता अंबानींनी लाडक्या सूनेला लग्नामध्ये दिलं होतं जगातलं सर्वात महागडं गिफ्ट)

​दागिन्यांची निवड

ईशा अंबानीने आयव्हरी (Ivory Color) आणि सोनेरी रंगाच्या लेहंग्यासह मॅचिंग चोकर नेकलेस आणि ईअररिंग्स परिधान केले होते. ईशाने देखील आईच्या ब्रायडल लुक प्रमाणेच मांगटिका आणि नथ हे दागिने देखील परिधान केले होते. शिवाय तिच्या हातांमध्ये तुम्हाला सुंदर डिझाइनर बांगड्या देखील दिसतील. नीता अंबानी यांच्या प्रमाणेच ईशानंही कमीत कमी संख्येत बांगड्यांची निवड केली होती. एवढंच नव्हे तर तिचा मेक अप सुद्धा आईच्या ३५ वर्षांपूर्वीच्या रूपासह मिळताजुळता दिसत होता.

(ऐश्वर्या राय बच्चनला या कारणामुळे बदलावे लागले आपले ४५ लाखांचे मंगळसूत्र)

​दिग्गज मंडळींची हजेरी

दरम्यान, ईशा अंबानीनं आणि आनंद पीरामल यांचेही लग्न धुमधडाक्यात पार पडले. या शाही विवाह सोहळ्यासाठी कित्येक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आले होते. बॉलिवूड, राजकीय तसंच उद्योग क्षेत्रातील मंडळींनी या लग्न सोहळ्यास उपस्थिती दर्शवली होती.

( Fashion Tips जुन्या कपड्यांना नवा लुक द्यायचाय? जाणून घ्या या सोप्या टिप्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *