उतारवयापर्यंत निरोगी व सुदृढ आरोग्य हवंय? मग बहुगुणी कडुलिंबाचा असा वापर करुन बघाच!

Spread the love

आता सहा महिने होत आले तरी अजूनही करोनावर रामबाण असा उपचार कोणालाही शोधून काढता आलेला नाही. रशियाने लस शोधण्याचा दावा केला खरा पण तो केवळ पोकळ दावा असल्याचे आणि जरी तो दावा खरा असेल तरी त्यावर अनेक चाचण्या करणे बाकी असल्याचे अनेकांचे मत आहे. म्हणजे एकंदरीत काय तर अजूनही करोना विरुद्धची लढाई संपलेली नाही. दिवसरात्र जगभरातील संशोधक या महामारी विरोधातील अस्त्र शोधून काढण्यासाठी झटत आहेत. त्यात आपले भारतीय संशोधक सुद्धा मागे नाहीत. काही संशोधक हे आधुनिक विज्ञानाचा आधार घेत आहेत तर असेही अनेक संशोधक आहेत जे आयुर्वेदाचा आसरा घेत आहेत.

याच दृष्टीने विचार करत एका फार्म कंपनीने ऑल इंडिया इंस्टीट्यूट ऑफ आयुर्वेदाच्या सहयोगाने कडुलिंबावर अभ्यास करणे सुरु केले आहे. कडुलिंबाचा वापर ताप, सर्दी यांसारख्या वायरल आजारावर केला जातो. कडुलिंबाचे असंख्य फायदे तुम्ही आजवर ऐकले असतीलच पण प्रत्यक्षात मात्र त्याचा वापर कधी केला नसेल. पण जर तुम्हाला खरंच उतारवयापर्यंतचे आयुष्य निरोगी आणि सुदृढ आरोग्यासोबत जगायचं असेल तर आजपासूनच या बहुगुणी, औषधी, आयुर्वेदिक अशा कडुलिंबाचा वापर करणं सुरु करा.

कडुलिंबाचे काय परिणाम होऊ शकतात

कडुलिंब ही एक भारतीय औषधी वनस्पती आहे. औषधी वनस्पती क्षेत्रातील कडुलिंबाचे वाढते महत्त्व पाहून खूप वर्षांपूर्वीच भारताने या वनस्पतीचे पेटेंट आपल्या नावावर करून घेतले. म्हणून भारतीय वनस्पतीचा दर्जा कडुलिंबाला मिळाला. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कडुलिंबाचा उपचार केल्यास रक्त, पचन आणि त्वचेशी निगडीत कित्येक असाध्य रोग दूर होऊ शकतात. शिवाय साधा ताप, खाज-खरुज, मच्छर चावणे, इन्फेक्शन आणि जुन्या जखमा भरणे यांसारख्या गोष्टींत सुद्धा कडुलिंब रामबाण ठरते.

(वाचा :- विडाल टेस्ट कोणत्या आजारासाठी व कशी केली जाते?)

त्वचेवर गुणकारी

जर तुमच्या त्वचेवर कोणते इन्फेक्शन झाले आहे आणि तुम्हाला त्यावर योग्य उपाय माहित नसेल वा ते नक्की कोणते इन्फेक्शन आहे हे कळत नसेल तर त्वरित कडुलिंबाची पाने घेऊन त्यावर चोळल्यास फायदा होऊ शकतो. काही दिवसांतच तुम्हाला त्या जागेवर फरक जाणवू लागेल आणि ती जागा इन्फेक्शन मुक्त होईल. अनेकदा केवळ कडुलिंब चोळून फायदा होत नाही तर त्याचे योग्य उपचार घेतल्यास जलद परिणाम दिसू शकतात. अशावेळी तुम्ही आयुर्वेदातील जाणकारांशी अवश्य संपर्क साधायला हवा.

(वाचा :- लघुशंकेवेळी होणा-या जळजळ-वेदनांची कारणे आणि रामबाण घरगुती उपचार!)

दातदुखीपासून मुक्तता

तुम्ही अनेक लोकांना कडुलिंबाच्या काडीने दात घासताना पाहिले असेल. ते यासाठीच करतात जेणेकरून दाताच्या समस्या दूर राहाव्यात. जे लोक नियमित कडुलिंबाच्या काडीने दात घासतात त्यांना आयुष्यात कधीही दातदुखी वा हिरडेदुखी सारखी समस्या सतावत नाही. जर तुम्हाला दाताशी वा हिरड्यांशी निगडीत कोणताही त्रास जाणवला तरी सुद्धा तुम्ही कडुलिंबाच्या काडीने दात घासण्यास सुरुवात करू शकता. तुम्हाला फरक नक्की दिसेल. कडुलिंबाच्या याच उपयुक्ततेमुळे सर्व टूथपेस्ट मध्ये हमखास कडुलिंब आढळते.

(वाचा :- मृत्युनंतर कोणत्या अवयवात किती तास जीव असतो?)

कडुलिंबाच्या पानांची अंघोळ

कडुलिंबाच्या पानांची अंघोळ करणे हे सर्वांसाठीच लाभदायी आहे. जे लोक आपल्या अंघोळीच्या पाण्यात नेहमी कडुलिंबाची पाने टाकतात वा त्या पानांसकट पाणी गरम करतात आणि मग अंघोळ करतात त्यांच्या त्वचेत कधीच संक्रमण होत नाही. काही लोकांची त्वचा खूप संवेदनशील असते आणि वारंवार त्यांना विविध प्रकारचे आजार होत असतात अशांनी तर आवर्जून कडुलिंबाच्या पानांची अंघोळ करावी. असे कल्यास त्यांना कधीच त्वचेच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही आणि ज्या समस्या आहेत त्या सुद्धा दूर होतील.

(वाचा :- बॉडी बनवण्याच्या नादात घेऊ नका प्रोटीनचे ओव्हरडोस नाहीतर…)

विविध व्हायरसवर खरंच प्रभावी ठरेल का?

कडूनिंबाचा अजून एक मोठा फायदा म्हणजे कडूनिंब हे ताप आणि सर्दी खोकल्यावर सुद्धा गुणकारी समजले जाते आणि जगभर घरगुती उपचार म्हणून कडूनिंबाचा वापर होतो. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवून कडूनिंबातील गुणधर्मांचा अभ्यास डॉक्टर करत आहेत. जर हे गुणधर्म विविध व्हायरसविरोधात लढा देण्यात यशस्वी ठरले तर डॉक्टरांच्या या प्रयत्नाला अर्धे यश आलेच असे समजा. आपण आशा करुया की डॉक्टरांना या संशोधनामध्ये यश येईल.

(वाचा :- ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश अन्यथा भोगावे लागतील दुष्परिणाम!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *