उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करावी? जाणून घ्या

Spread the love

How to make: उपवासासाठी साबुदाण्याची खीर कशी तयार करावी? जाणून घ्या

Step 1: साबुदाणे भिजत ठेवा

एका बाउलमध्ये साबुदाणे घ्या आणि स्टार्च निघेपर्यंत साबुदाणे पाण्याने स्वच्छ धुवा. यानंतर साबुदाणे तासाभरासाठी पाण्यात भिजत ठेवा.

Step 2: दूध उकळत ठेवा

यानंतर पॅनमध्ये थोडेसे पाणी उकळत ठेवा. पाणी उकळू लागल्याबरोबर त्यात अर्धा लिटर दूध ओता. दूध घट्ट होईपर्यंत ढवळत राहा.

दूध उकळून घ्या

Step 3: दुधामध्ये साबुदाणे मिक्स करा

दुधामध्ये १/४ कप साबुदाणे घालावे. गॅसच्या मध्यम आचेवर मिश्रण ढवळत राहा. पाच मिनिटे सामग्री शिजू द्यावी. साबुदाणे मऊ झाले आहेत की नाहीत, याची खात्री करून घ्या.

दुधासोबत साबुदाणे शिजवून घ्या

Step 4: मिश्रणात वेलची पावडर – साखर घालावी

दोन ते तीन मिनिटांनंतर साखर मिक्स करा. यानंतर वेलची पावडर आणि केशरच्या दोन ते तीन काड्या देखील मिश्रणात मिक्स कराव्यात.

खीरमध्ये साखर मिक्स करावी

Step 5: गरमागरम खिरीचा आस्वाद घ्या

खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. गरमागरम किंवा फ्रिजमध्ये थंड करूनही खीर सर्व्ह करू शकता.

साबुदाण्याची खीर

Step 6: साबुदाणा खीर : पाहा संपूर्ण पाककृती

टीप : खिरीची पाककृती स्वादिष्ट होण्यासाठी चांगल्या दर्जाच्या साबुदाण्याचा वापर करावा.

नवरात्र उपवास रेसिपी साबुदाण्याची खीर


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *