ऋतिक व सुझेन घटस्फोटानंतरही मुलांची जबाबदारी पाडतायत चोखपणे पार, आदर्श पती-पत्नी नाही पण माता-पिता झाले!

Spread the love

एकत्र वेळ घालवायचा

नातं संपलं असलं तरी मनापासून नातं कधीही तोडू नये. पती आणि पत्नीने सगळं विसरून हा एक चांगला निर्णय आपल्या आणि कुटुंबाच्या भल्यासाठी घेतला असे मानून मैत्रीचे नाते कायम ठेवावे आणि हीच गोष्ट हृतिक आणि सुझेनने केली. आपली दोन मुले रेहान आणि रीदान यांच्या काळजीसाठी दोघे अनेकदा एकाच छताखाली येऊन राहतात. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा दोघांनी एकत्र राहण्याचाच निर्णय घेतला. यामुळे मुलांना जरी आपले आई वडील विभक्त असल्याचे कळत असले तरी ते आपल्यासाठी एकत्र येतात ही गोष्ट त्यांना सुखावते.

(वाचा :- मुलांनी आत्मसात केलेल्या ‘या’ चांगल्या सवयी शिक्षक व पालकांना का देतात सुखद अनुभव?)

हृतिकचा मोलाचा सल्ला

हृतिक आणि सुझेनच्या विभक्त होण्यामुळे डोक्यात येत असले नकारात्मक विचार काढून टाकण्यासाठी हृतिकने सुझेन आणि मुलांना एक मोलाचा सल्ला दिला. त्याने एक नियम बनवला की आठवड्यातले 5 दिवस दरोरोज 1 तास सर्वजण शांतपणे पुस्तक वाचतील. त्यामुळे रोज 5 दिवस त्यांच्या घरात एकाच खोलीत सर्वजण आपल्याला हवं असलेलं आवडतं पुस्तक घेऊन ते शांतपणे वाचताना दिसतात. यामुळे डोक्यातील विचार निघून जातात आणि आपण फ्रेश होतो असे हृतिकचे मत आहे. याशिवाय अजून एक नियम आहे तो म्हणजे रोज संध्याकाळी 6 वाजता संपूर्ण कुटुंब व्यायाम करतं. हृतिक सारखा बेस्ट फिटनेस ट्रेनर घरात असल्याने पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होतो. हे सगळं कुटुंब सुखी राहावं म्हणून!

(वाचा :- हिवाळ्यात बाळाला अंघोळ घालण्याआधी जाणून घ्या ‘या’ गोष्टी अन्यथा उद्भवू शकतात समस्या!)

नेहमी मुलांच्या पाठीशी

कितीही वाईट परिस्थिती आली आणि मुलांना आपली गरज असेल तेव्हा नेहमी त्यांच्या सोबत उभे राहायचे आणि त्यांना आधार द्यायला यायचेच असे हृतिक आणि सुझेन दोघांनी ठरवले आहे. तसेच मुलांना ज्या गोष्टी आवडतात त्या करायला त्यांना नेहमी प्रोत्साहन द्यायचे त्यांनी ठरवले आहे. आपले आई वडील वेगळे झाले आहेत पण त्यांनी आपल्याला मोठे करण्यात कुठेच दुर्लक्षपणा केला नाही ही गोष्ट हृतिक आणि सुझेन यांना आपल्या मुलांच्या मनावर बिंबवायची आहे आणि कोणत्याही आई वडिलांनी जर ते विभक्त होत असतील तर हेच करणे अपेक्षित आहे.

(वाचा :- करीना कपूरची डाएटिशियन ऋजुता दिवेकरने दिल्या लहान मुलांच्या डिनरविषयी महत्त्वपूर्ण टिप्स!)

वाद न घालणे

आता दोघांनी आपापला मार्ग वेगळा निवडला आहे त्यामुळे शक्य तितके कमी वाद घालून आनंदी राहण्याचा दोघांचा प्रयत्न असतो. तसेच दोघांनी एक नियम एकमेकांच्या संमतीने ठरवला आहे की कितीही काही झाले तरी मुलांसमोर भांडणे करायची नाहीत. विभक्त झाल्यानंतर अनेक पती पत्नी ही गोष्ट ठरवतात पण प्रत्येक जण ते पाळतातच असे नाही. हृतिक आणि सुझेनने मात्र अतिशय कटाक्षाने ही गोष्ट पाळली आहे. एखाद्या गोष्टीवरून बिनसलं तरी ते आता पूर्वी सारखे न भांडता समजूतदारपणा दाखवतात आणि मुलांसमोर असताना सतत आनंदी राहतात.

(वाचा :- दूध प्यायल्यानंतर बाळाला उलटी होण्यामागची कारणे आणि घरगुती उपचार!)

यातून काय धडा घ्यावा?

सध्या घटस्फोटांचे प्रमाण अतिशय वाढले आहे. असे अनेक पती पत्नी आहेत जे स्वत:चा निर्णय घेतात पण त्यात मुलांची फरफट होऊ शकते. अशावेळी स्वत:च्या भविष्यासोबत मुलांचा विचार सुद्धा जोडप्यांनी करणे गरजेचे आहे. मुलाचा हक्क माझ्याकडेच हवा असा हट्ट करण्यापेक्षा वेगळे राहून सुद्धा आपण मुलाला त्याला हवं ते प्रेम देऊ हा विचार विभक्त होणाऱ्या प्रत्येक जोडप्याने घ्यायला हवा. हृतिक आणि सुझेनची जोडी हाच संदेश विभक्त होणाऱ्या आजच्या प्रत्येक जोडप्याला देत आहे.

(वाचा :- बाळाच्या शरीरावर पुरळ आल्यास करा ‘हे’ साधेसोपे घरगुती उपाय!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *