ऐन करोनामध्ये आपल्या मुलांचा नाताळ सण असा बनवा खास!

Spread the love

म्युझिकल इंस्ट्रूमेंट

तुम्ही हटके गिफ्ट म्हणून आपल्या मुलाला म्युजीकल इंस्ट्रुमेंट देण्याचा विचार नक्की करू शकता. मुल केवळ अभ्यासात हुशार असून चालत नाही. त्याच्या अंगी एखादी तरी कला असावी. अनेक मुलांच्या अंगात जन्मत: कला असतात. पण अनेक मुलांच्या अंगी कला तयार देखील करता येऊ शकतात. यासाठी तुम्ही त्या मुलाला सतत त्या कलेचा सराव करण्यास सागितले पाहिजे. सध्या संगीत क्षेत्र जोरावर आहे आणि या क्षेत्रात उत्तम करियर देखील घडू शकतं. त्यामुळे तुमच्या मुलात थोडी जरी तुम्हाला संगीताची आवड दिसून येत असेल तर आवर्जून त्याला या ख्रिसमसला म्युजीकल इंस्ट्रुमेंट भेट म्हणून द्या.

(वाचा :- मुलांचं सर्दी-पडसं व खोकला दूर करण्यासाठी असा बनवा घरगुती काढा!)

पझल्स

पझल्स म्हणजेच कोड्यांचे खेळ होय. याचे विविध प्रकार असतात आणि सर्वच प्रकार रंजक असतात. यामुळे बुद्धिला सुद्धा चालना मिळते. सध्या करोनामुळे मुल घरीच बसून असेल, बाहेरचे खेळ कमी खेळत असेल तर त्याला टीव्ही वा मोबाईलचा नाद लागण्यापेक्षा पझल्सचा नाद लावा. अनेक संशोधनातून सुद्धा सिद्ध झाले आहे की मुलांनी अधिकाधिक पझल्स खेळल्याने त्यांची बुद्धी प्रगल्भ होते आणि अर्थातच आपण स्वत: काहीतरी सोडवतोय याचा आनंद मुलांना देखील मिळतो.

(वाचा :- मुलांना जंक फुड खाऊ घालण्याआधी जाणून घ्या त्याचे गंभीर दुष्परिणाम!)

डायरी

मुल थोडे मोठे असेल आणि आजवर तुम्ही त्याला त्याच्या आवडीची हर एक प्रकारची भेटवस्तू दिली असेल आणि आयता काय द्यावं हा विचार करत असाल तर त्याला एक झक्कास डायरी द्या. मुलाला कार्टून मधलं एखाद पात्र आवडत असेल वा एखादा सुपरहिरो आवडत असेल तर त्यांच्या थीमच्या डायऱ्या सुद्धा बाजारात उपलब्ध आहेत. पण या डायऱ्यांचा खरा उद्देश मुलाला लिखाणासाठी प्रवृत्त करणे हा असावं. त्याच्या दैनंदिन घडामोडी लिहिण्यासाठी त्याला प्रेरित करा. त्याचे पुढील प्लान्स त्याला डायरीत लिहून ठेवायला सांगा. ही डायरी खास त्याच्यासाठी आहे व तो यात हवं ते लिहू शकतो हे सांगून त्याला या डायरीचे महत्त्व पटवून द्या.

(वाचा :- काही मुलं आईच्या गर्भातच पडतात ‘या’ हृदय रोगाला बळी! बचावासाठी काय काळजी घ्यावी?)

गोष्टींची पुस्तकं

पुस्तक ही कधीही मुलांसाठी सर्वात भारी भेट ठरते. सध्या वाचन संस्कृती लोप पावत् चालली आहे. आपली आजचीच पिढी वाचनापासून दूर पळते आहे. साहजिकच यामुळे जी लहान पिढी आहे त्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व माहित नाही. हे महत्त्व तुम्ही आपल्या मुलाला पटवून द्या आणि यासाठी पहिलं पाऊल म्हणजे त्याला आवडेल असे पुस्तक त्याला भेट द्या. मग भले ते कॉमिक का असेना. एकदा का त्याला वाचण्याची आवड लागली आणि तो सतत नवीन पुस्तकांचा हट्ट धरू लागला की मुलाला चांगले व्यसन लागले आहे असे समजू शकता.

(वाचा :- मुलांना प्लास्टिकच्या भांड्यात खाऊ घालताय जेवण? मग आरोग्यास होतील ‘हे’ दुष्परिणाम!)

ऑनलाईन कोर्स

अशा प्रकारचे गिफ्ट फार कमी पालक आपल्या मुलाला देतात आणि हे गिफ्ट देण्याचा विचार तुम्हीही करू शकता अर्थात जर तुमचे मुल एखाद्या ऑनलाईन कोर्स बाबत उत्सुक असेल. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मुलाची आवड ओळखावी लागेल आणि त्याला काय आवडते हे जाणून घ्यावे लागेल. त्यानुसार मुलाला उपयोगी पडेल असा ऑनलाईन कोर्स तुम्ही त्याला देऊ शकता. तर मंडळी अशा या विविध आयडियाज मधून निवडा तुमची आयडिया आणि या ख्रिसमसला आपल्या मुलाला खुश करा.

(वाचा :- मुलांच्या मोबाईल व कम्प्युटर ‘स्क्रीन टाइम’चा समतोल साधण्यासाठी साध्यासोप्या टिप्स!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *