ऐश्वर्यापासून ते करीनापर्यंत; अभिनेत्रींच्या या ५ अतरंगी लुकवर चाहत्यांनी दर्शवली नापसंती

Spread the love

बॉलिवूड सिनेमे आणि अभिनेत्रींमुळे फॅशनमध्ये (Fashion Tips) नवनवीन ट्रेंड्स पाहायला मिळतात. बॉलिवूड अभिनेत्री काय करतात? काय परिधान करतात? अशा कित्येक प्रश्नांची उत्तरे त्यांच्या चाहत्यांना जाणून घ्यायची असतात. बी-टाउनमधील कित्येक अभिनेत्री ग्लॅमरस स्टाइल देखील सहजरित्या कॅरी करतात. रेड कार्पेट लुक असो किंवा कॅज्युअल लुक; सेलिब्रिटींची फॅशन अप्रतिमच असते.

पण कधी-कधी अतरंगी स्टाइलमुळे या अभिनेत्रींवर ट्रोल होण्याचीही वेळ येते. देश-परदेशातील कार्यक्रम, निरनिराळे स्टायलिस्ट आणि प्रसिद्ध फॅशन डिझाइनर्सच्या जास्तीत-जास्त संपर्कात असणाऱ्या या अभिनेत्री कधी-कधी कळत-नकळत चित्रविचित्र आउटफिट परिधान करतात, ज्यामुळे त्यांचे कौतुक कमी आणि टीकेचा भडिमारच जास्त प्रमाणात होतो. बी-टाउनमधील हिरोईन्सच्या काही हटके स्टाइलने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं पण काही वेळा त्यांची फॅशनच सर्वसामान्यांसह फॅशन एक्सपर्ट्सना समजण्यापलिकडील असते. पाहुया असेच काही फोटो…
(अनुष्का शर्माचे हे ५ स्टायलिश ड्रेस प्रेग्नेंट महिलांसाठी आहेत परफेक्ट, पाहा फोटो)

​ऐश्वर्या राय-बच्चन

ऐश्वर्या राय-बच्चन आपल्या मोहक स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. पण तिचीही फॅशन अनेकदा फसली आहे. असेच काहीसे परदेशात पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान पाहायला मिळालं. या अभिनेत्रीनं लंडनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या यूके प्रीमियर Bride & Prejudice इव्हेंटसाठी निळ्या रंगाचं सेक्विन लाँग आउटफिट परिधान केलं होतं. ग्लॅमरस लुक मिळावा, यासाठी ऐश्वर्यानं या गाउनची निवड केली होती. या ड्रेसवर फर डिझाइन तुम्ही पाहू शकता. चमचमणाऱ्या या बॉडीकॉन गाउनवरील फरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण या लुकमुळे ऐश्वर्याला फॅशन एक्सपर्टच्याही टीकेला सामोरे जावे लागले.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)

​मलायका अरोरा

मलायका अरोरानं जेव्हा जपानमधील फॅशन डिझाइनर Yumi Katsuraने डिझाइन केलेलं आउटफिट्स परिधान केलं होतं तेव्हा तिचा लुक पाहून चाहते गोंधळात पडले होते. कदाचित मलायका बीचवेअर आणि रेड कार्पेट लुक यातील फरक विसरली असावी, असंही लोकांना वाटलं. एका कार्यक्रमासाठी मलायकाने हा नूडल्स स्ट्रॅपी डिझाइन मल्टी कलर्ड लाँग गाउन परिधान केला होता. या ड्रेसमध्ये मागील बाजूस रफल स्टाइलमध्ये रंगीबेरंगी लाँग टेल डिझाइन जोडण्यात आलं होतं. ड्रेसवरील काळ्या आणि पिवळ्या रंगाच्या बो पॅटर्नमुळे आउटफिटचा संपूर्ण लुक बिघडला.

(आलिया भटचा ‘हा’ लुक पाहून नेटकऱ्यांना दीपिका पादुकोणची आली आठवण, म्हणाले…)

​करीना कपूर- खान

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर करीनाने फ्लेअर्ड पँट आणि हॅल्टर्नेक्स यासारखे आउटफिट परिधान करून सर्वाचं लक्ष स्वतःचे आकर्षित केलं होतं. २००८मध्ये बेबोचा ‘टशन’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता. यावेळेस ती साइज झीरोमुळेही प्रचंड चर्चेत होती. यानंतर तिच्या वॉर्डरोबमध्ये Sultry Dresses आणि फुल शिमर आउटफिटचे कलेक्शन वाढलं होतं. दरम्यान २००६ मध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्ससाठी करीनाने V नेकलाइन असणारा इलेक्ट्रिक ब्लू कटआउट पॅटर्न ड्रेस परिधान केला होता. तिचा हा लुक चाहत्यांना आवडला नव्हता.

(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)

​काजोल

काजोल शानदार अभिनयाव्यतिरिक्त आपल्या पारंपरिक स्टाइलसाठी ओळखली जाते. कधी-कधी तिचा वेस्टर्न लुक देखील पाहायला मिळतो. पण चाहत्यांना तिला पारंपरिक वेशभूषेमध्येच पाहणं पसंत आहे. दरम्यान काजोलने GQ awards साठी फॅशन डिझाइनर Prabal Gurungने डिझाइन केलेला गडद राखाडी रंगाचा Asymmetrical सिल्क ड्रेस परिधान केला होता. या लुकसाठी काजोलने मोहक मेकअप केला होता. पण ड्रेसमुळे तिचा लुक खराब दिसत होता.

(सारा अली खानने परिधान केला होता ‘हा’ वजनदार लेहंगा, नेटकऱ्यांनी म्हटलं…)

​दीपिका पादुकोण

२००९ मध्ये दीपिका पादुकोणचा ‘चांदनी चौक टू चाइना’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता. या सिनेमाच्या यूके प्रीमियरसाठी दीपिकाने चमचमत्या गुलाबी रंगाच्या बॉलरूम गाउनची निवड केली होती. या वेस्टर्न लुकसाठी दीपिकाने चंकी मेकअप, टिकली, लाइट टोन लिपस्टिक आणि साइड पार्टेड हेअर स्टाइल केली होती. दरम्यान दीपिकाच्या चाहत्यांना तिचा हा लुक अजिबात आवडला नव्हता.

(कांजीवरमपासून ते गोल्ड जरीपर्यंत, रेखा यांच्या ‘या’ सुंदर साड्यांसमोर फिके पडतील महागडे लेहंगे)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *