ऐश्वर्या ते अनुष्कासह यांनीही परिधान केले होते ग्लॅमरस बॅकलेस ड्रेस, फोटोंमुळे उडाला धुरळा

Spread the love

बॉलिवूडमधील कित्येक अभिनेत्री बोल्ड लुक सहजरित्या कॅरी करतात. त्यांच्या ग्लॅमरस आउटफिट्सच्या यादीमध्ये बॅकलेस डिझाइन ड्रेसचाही समावेश असतो. करीना कपूर- खानपासून ते ऐश्वर्या राय-बच्चन, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, दीपिका पादुकोण यासारख्या टॉपच्या अभिनेत्रींनी देखील अनेकदा बॅकलेस ड्रेस परिधान केले आहेत.

त्यांच्या या लुकची सोशल मीडियावर भरपूर चर्चा सुद्धा झाली होती. या अभिनेत्रींनी परिधान केलेले बॅकलेस ड्रेस आणि त्यांचा सुपर ग्लॅमरस अवतार देखील पाहुया.
(करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश)

​दीपिका पादुकोण

दीपिका पादुकोण आपल्या आकर्षक फिगरसाठीही प्रसिद्ध आहे. ही अभिनेत्री आपली बॅक (पाठ) टोंड ठेवण्यासाठी नियमित वर्कआउट करते. आता इतके कष्ट घेतल्यानंतर सुंदर पाठ फ्लॉन्ट का करू नये? याच कारणामुळे रेड कार्पेटवर दीपिका पादुकोणचा अनेकदा बॅकलेस गाउन लुक पाहायला मिळाला आहे. देशातील कार्यक्रम असो किंवा परदेशातील कान फिल्म फेस्टिव्हल; या अभिनेत्रीनं आतापर्यंत कित्येकदा सुपर ग्लॅमरस बॅकलेस ड्रेस परिधान केले आहेत.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

​करीना कपूर

करीना कपूरला ग्लॅमरस फॅशन कॅरी करणं अतिशय पसंत आहे. प्लंजिंग नेकलाइनपासून ते बॅकलेस गाउनपर्यंत; करीना सहजरित्या बोल्ड स्टाइल कॅरी करते. दरम्यान तिच्या हिरव्या रंगाच्या बॅकलेस गाउनची सर्वाधिक चर्चा झाली होती. हा गाउन तिनं दीपिका – रणवीरच्या रिसेप्शन पार्टीमध्ये परिधान केला होता. तिच्या या सुपर ग्लॅमरस अवताराचे चाहत्यांपासून ते फॅशन क्रिटिक्सकडून कौतुक करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे परदेशातील एका कार्यक्रमासाठी बेबोने शिमरी बॅकलेस गाउन घातला होता. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या चंदेरी रंगाच्या गाउनमध्ये कफ्तान स्लीव्ह्जसह बॅकलेस डिझाइन जोडण्यात आलं होतं. ज्यामुळे करीनाला स्टायलिश लुक मिळाला होता.

​कतरिना कैफ

कतरिना कैफ रेड कार्पेट इव्हेंट व्यतिरिक्त पार्टीमध्येही बॅकलेस आउटफिट परिधान करते. एका अवॉर्ड शोसाठी या अभिनेत्रीने लाल रंगाचा शिमरी स्लिट आणि बॅकलेस गाउन परिधान केला होता. यावेळेस उपस्थितांची नजर तिच्यावरच खिळली होती. दुसरीकडे एका पार्टीसाठीही कतरिनाने बॉडीकॉन बॅकलेस शॉर्ट ड्रेस घातला होता, तिच्या या फोटोंमुळे सोशल मीडियावर धुरळा उडाल्याचे पाहायला मिळालं होतं.

(करीना कपूरला ‘या’ ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल, म्हणाले…)

​मानुषी छिल्लर

मानुषी छिल्लर लवकरच अभिनेत्रीच्या रूपात मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. मानुषी आपल्या बोल्ड फॅशनमुळे चर्चेत असते. मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने एका कार्यक्रमासाठी गोल्डन गाउनची निवड केली होती. या आउटफिटमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. तिचा हा स्टायलिश लुक आतापर्यंतचा सर्वात बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार असल्याचे म्हटलं जातंय.

(श्रीदेवींच्या लेकींची चर्चा! जान्हवी-खुशीने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष)

​ऐश्वर्या राय

ऐश्वर्या राय-बच्चन सध्या अधिकतर पारंपरिक अवतारातच दिसते. पण बच्चन कुटुंबाची सून होण्यापूर्वी ऐश्वर्या अनेकदा बोल्ड वेस्टर्न लुक कॅरी करत असे. कान फिल्म फेस्टिव्हलदरम्यान तिचा सुपर स्टायलिश अवतार चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. या फेस्टिव्हलसाठी तिनं बॅकलेस डिझाइनचा ड्रेस देखील परिधान केला होता. ऐश्वर्याच्या फ्लोरल प्रिंट बॅकलेस गाउन लुकचं चाहत्यांकडून प्रचंड कौतुक करण्यात आलं होतं. पण या चंदेरी रंगाच्या बॅकलेस गाउनमुळे लोकांनी तिच्यावर टीका देखील केली. ऐश्वर्याच्या सिल्व्हर बॅकलेस गाउनमध्ये प्लंजिंग नेकलाइन आणि कट आउट डिझाइन सुद्धा होतं. ज्यामुळे ड्रेसला अतिशय बोल्ड लुक मिळाला होता. तिचा हा अवतार चाहत्यांना अजिबात आवडला नव्हता.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा आपल्या मोहक आणि कम्फर्टेबल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तिच्या वॉर्डरोबमध्ये बॅकलेस ड्रेसचाही समावेश आहे. अनुष्काने एका फोटोशूटसाठी शियर शॉर्ट ड्रेस परिधान केला होता. यामध्ये ओव्हल शेपमध्ये बॅकलेस डिझाइन आपण पाहू शकता. तिच्या या स्टायलिश अवतारावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. तर दुसरीकडे एका कार्यक्रमासाठी अनुष्काने निळ्या रंगाचं आउटफिट परिधान केलं होतं. यामध्येही ती प्रचंड मोहक दिसत होती.

(अनुष्का शर्माचे हे ५ स्टायलिश ड्रेस प्रेग्नेंट महिलांसाठी आहेत परफेक्ट, पाहा फोटो)

​मलायका अरोरा

बोल्ड फॅशनच्या यादीमध्ये मलायका अरोराचे नाव सर्वात अव्वल स्थानी असते, हे आपणा सर्वांनाच माहिती आहे. मिनी ड्रेसपासून ते प्लंजिंग नेकलाइनपर्यंत; सर्व प्रकारचे आउटफिट मलायका अतिशय सहजरित्या कॅरी करते. तिच्या फॅशनेबल कपड्यांच्या यादीमध्ये बॅकलेस आउटफिट्सचाही समावेश आहे. या फोटोमध्ये आपण तिचा पांढऱ्या रंगाचं बॅकलेस पँट-सूट आणि शिमरी मिनी ड्रेस लुक पाहू शकता. ज्यामध्ये ती नेहमीप्रमाणेच सुंदर दिसत आहे.

(Malaika Arora Style मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)

​अलाया फर्नीचरवाला

अलाया फर्नीचरवाला आपल्या बोल्ड फॅशनसाठी ओळखली जाते. नुकतेच तिने काही ग्लॅमरस अवतारातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एका फोटोमध्ये अभिनेत्रीनं कोट आणि सायकिल शॉर्ट्स असा पोषाख परिधान केलाय तर दुसरीकडे तिनं बॅकलेस जॅकेट व शॉर्ट्स असा स्टायलिश अवतार कॅरी केल्याचं आपण पाहू शकता.

(अपूर्वा नेमळेकरचा मोहक पारंपरिक अवतार, पाहा हे ५ फोटो)

​प्रियंका चोप्रा

बॅकलेस ड्रेसची चर्चा करताना प्रियंका चोप्राच्या नावाचा उल्लेख न करून कसं चालेल. या अभिनेत्रीनं परदेशातील कार्यक्रमांसाठी आतापर्यंत कित्येकदा बॅकलेस आउटफिट परिधान केले आहेत. पण तिच्या या दोन लुकची सर्वाधिक चर्चा झाली होती. अ‍ॅनिमल प्रिंटच्या सिल्व्हर शेड बॅकलेस गाउनमध्ये प्रियंका सुंदर दिसतेय. तर दुसऱ्या फोटोमधील गाउन तिनं कान फिल्म फेस्टिव्हलसाठी परिधान केला होता.

(Winter Fashion स्टायलिंगचा हिवाळी मोड ऑन! ग्लॅमरस लुकसाठी ट्राय करा हे फॅशन ट्रेंड)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *