ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या लग्नसोहळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. बच्चन कुटुंबातील मुलगा अभिषेक आणि जगभरात आपल्या सौंदर्य व प्रतिभेसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय या दोघांनी २० एप्रिल २००७ साली लग्नगाठ बांधली. यामुळे या शाही विवाहाची चर्चा होणं तर स्वाभाविकच होतं. आयुष्यातील या सर्वात खास क्षणासाठी ऐश्वर्याने अतिशय सुंदर आणि मोहक ब्राइडल साडीची निवड केली होती.

या साडीमध्ये ती एखाद्या राजकुमारी प्रमाणेच दिसत होती. या विवाह सोहळ्याव्यतिरिक्त ऐश्वर्याचा महागडा लेहंगा आणि सुंदर साडीचीही सर्वाधिक चर्चा झाली होती. ऐश्वर्याच्या डिझाइनर साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं.
(Aishwarya Rai ऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो)

​लग्नासाठी साउथ इंडियन लुकची केली होती निवड

ऐश्वर्या राय साउथ इंडियन आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. या गोष्टीचा तिला खूप अभिमान देखील आहे. आपल्या लग्नसोहळ्यासाठी तिनं साउथ इंडियन ब्रायडल लुकचीच निवड केली होती. साडी, दागिन्यांपासून ते हेअर स्टाइलपर्यंत, तिचा पूर्ण लुक साउथ इंडियन होता. ऐश्वर्यानं आपली जुनी मैत्रीण आणि सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर नीता लुल्लाकडून लग्नाची साडी डिझाइन करून घेतली होती.

(ऐश्वर्या राय बच्चनला या कारणामुळे बदलावे लागले आपले ४५ लाखांचे मंगळसूत्र)

​खऱ्या सोन्याचे धागे आणि स्वारोवस्की क्रिस्टल

ऐश्वर्या रायसाठी खास कांजीवरम साडी डिझाइन करण्यात आली होती. अस्सल कांजीवरम साडी तयार करणाऱ्या एम्ब्रॉयडर्सकडूनच ऐश्वर्याच्या साडीचं काम करून घेण्यात आलं होते, असे म्हटले जाते. ही सोनेरी साडी शुद्ध रेशीमपासून तयार करण्यात आली होती. साडीच्या विणकामामध्ये सोन्याच्या धाग्यांचा उपयोग करण्यात आल्याचेही म्हटलं जाते. सोबतच जगातील सर्वात महागडी कंपनी ‘स्वारोवस्की’कडून मौल्यवान क्रिस्टल घेण्यात आले होते. हे खडे तुम्ही तिच्या साडी आणि ब्लाउजवर पाहू शकता. या ब्रायडल साडीची किंमत ७५ लाख रुपये एवढी होती, असे सांगितलं जातं.

(जेव्हा ऐश्वर्या रायनं नेसली होती अशी साडी, तिला पाहण्यासाठी झाली होती गर्दी)

​२२ कॅरेट सोन्याचे दागिने

ऐश्वर्या रायने तिचे लग्नाचे दागिने मंगलोरियन पद्धतीनुसार डिझाइन करून घेतले होते. यामध्ये पारंपरिकपासून ते मॉर्डन स्टाइलच्या दागिन्यांचाही समावेश होता. मिळालेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचे सर्व दागिने २२ कॅरेट सोन्यापासून तयार करण्यात आले होते. यामध्ये हिरे आणि अन्य मौल्यवान खड्यांचाही उपयोग करण्यात आला होता. तसंच ऐश्वर्याने केसांमध्ये फुलांसह सोन्याचे पिन लावले होते. आपल्या लग्नामध्ये ऐश्वर्या डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याच्या दागिन्यांनी सजली होती, हे तुम्ही फोटोच्या माध्यमातून पाहू शकता.

(आराध्याने आई ऐश्वर्या रायला अशी केली होती मदत, फोटो पाहून चाहते म्हणाले…)

​लाखो रुपयांची अंगठी आणि मंगळसूत्र

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या या अभिनेत्रीचं मंगळसूत्र आणि साखरपुड्याची अंगठी हे दागिने देखील प्रचंड महाग होते. तिची ५३ कॅरेट हिऱ्यांची अंगठी जवळपास ५० लाख रुपयांची होती. तर तिचे ट्रेंडी डिझाइनर मंगळसूत्र ४५ लाख रुपयांचे असल्याचे म्हटलं जाते. या मंगळसूत्रामध्ये सोने आणि काळ्या मण्यांच्या मध्ये पेंडेंटच्या स्वरुपात तीन डायमंड्स तुम्ही पाहू शकता. या मंगळसूत्राचं डिझाइन आजही ट्रेंडमध्ये आहे.

(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

​अभिषेक बच्चनचा पोषाख

बिग बी अमिताभ बच्चन यांनी अभिषेक आणि ऐश्वर्याच्या शाही विवाहसोहळ्यामध्ये कोणतीही गोष्ट कमी पडू दिली नाही. दरम्यान अभिषेकने लग्नामध्ये अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाइन केलेली शेरवानी परिधान केली होती.

(Wedding Traditions: लग्नामध्ये ऐश्वर्या रायला सासूकडे मिळाली होती मौल्यवान दागिन्यांची भेट)

या दोघांच्याही लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *