ऐश्वर्या रायपासून ते अनुष्का शर्मापर्यंत, ‘या’ दागिन्यांशिवाय राहू शकत नाहीत हे ५ स्टार्स

Spread the love

बॉलिवूडमधील तारेतारकांकडे एकापेक्षा एक हटके आणि महागड्या वस्तू आहेत. या सेलिब्रिटींकडे डिझाइनर आउटफिटपासून ते सँडल -शूजपर्यंत, एवढंच नव्हे तर सुंदर- सुंदर दागिन्यांचेही लई भारी कलेक्शन त्यांच्याकडे असते. वेगवेगळे कार्यक्रम, सोहळ्यादरम्यान बी- टाउनमधील (Bollywood) या सेलिब्रिटींचा स्टायलिश अवतार आपल्याला पाहायला मिळतो.

पण यामध्ये असेही काही नायक- नायिका आहेत, ज्यांना आपल्या ज्वेलरीच्या कलेक्शनमधील एक निवडक दागिना अतिशय प्रिय आणि खास आहे. या दागिन्याशिवाय ते घराबाहेर पडतच नाहीत. अथवा फार क्वचितच तुम्ही या स्टार्सना त्यांच्या स्पेशल दागिन्याशिवाय पाहिले असावे. बॉलिवूडकरांच्या या यादीमध्ये सलमान खानपासून ते ऐश्वर्या राय – बच्चन यांच्या नावाचाही समावेश आहे.
(बॉयफ्रेंडसोबत दिसली सुष्मिता सेन, प्रेमात आकंठ बुडालेल्या या कपलचा स्टायलिश लुक लई भारी)

​सलमान खान

सलमान खानच्या (Salman Khan) आवडत्या दागिन्याबाबत सर्वांनाच माहिती आहे. अगदी बरोबर ओळखलं, आम्ही त्याच्या चेन ब्रेसलेटबाबतच बोलत आहोत. हे ब्रेसलेट सलमान खानला त्याच्या वडिलांनी भेट म्हणून दिले होते. कोणताही कार्यक्रम असो, बाहेर फिरणे असो किंवा एखादा सिनेमा असो…सलमानच्या मनगटावर हे ब्रेसलेट नेहमीच दिसते. या ब्रेसलेटच्या मध्यभागी नीलमणी (Turquoise) तुम्ही पाहू शकता, यास शक्तीचे प्रतीक मानले जाते.

(समंथापासून ते सौंदर्या रजनीकांपर्यंत, या अभिनेत्रींच्या साखरपुड्याच्या अंगठीवर करण्यात आला होता इतका खर्च)

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मा (Anushka Sharma) ट्रेंडी ज्वेलरी परिधान करण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिच्या कलेक्शनमध्ये Juste Un Clouचे सोन्याचे ब्रेसलेट देखील आहे. हा दागिना अनुष्काला अतिशय प्रिय असल्याचे म्हटले जाते. या ब्रेसलेटचे डिझाइन देखील अतिशय हटके आहे. या ब्रेसलेटचा आकार मनगटाच्या आकारानुसार कमी- जास्त करता येऊ शकतो. फ्रान्समधील लग्झरी गुड्स कंपनी Cartier च्या क्लासिक कलेक्शनमधील ही ज्वेलरी आहे. हे ब्रेसलेट सर्वप्रथम १९७० साली तयार करण्यात आले होते, असे म्हटलं जाते. कित्येक दशकांनंतरही या डिझाइनची लोकप्रियता कायम आहे.

(करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

​शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीकडे (Shilpa Shetty) दागिन्यांची कमतरता नाहीय. तिच्याकडे एकापेक्षा एक महागड्या दागिन्यांचे कलेक्शन आहे. पण शिल्पाला तिच्या ट्रेंडी स्टाइल मंगळसूत्रामध्ये सर्वाधिक वेळा पाहिले गेले आहे. शिल्पा मंगळसूत्र ब्रेसलेट परिधान करते. कोणत्याही वेस्टर्न आउटफिटवर हा दागिना ती सहजरित्या मॅच करते. ब्रेसलेट मंगळसूत्र घालणारी बॉलिवूडमधील ही पहिली अभिनेत्री असल्याचे म्हटलं जाते.

(अथिया शेट्टी आणि क्रिकेटर के. एल. राहुलचे एकसारखेच कपडे? फोटो झाले होते व्हायरल)

​सैफ अली खान

सैफ अली खान (Saif Ali Khan) अशा कलाकारांपैकी एक आहे, ज्याच्या अंगावर क्वचितच तुम्हाला दागिने दिसतील. पण त्याची एक खास अंगठी आहे, जी तुम्हाला कायम पाहायला मिळते. सैफ अली खानकडे एक सोन्याची अंगठी आहे. या अंगठीचा वरील भाग अंडाकृतीसमान आहे. जोपर्यंत एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शक अंगठी काढण्याची मागणी करत नाहीत, तोपर्यंत सैफ अली खान ती अंगठी काढत नाही.

(सारा अली खान ही गोष्ट करतेय मिस, म्हणून स्वतःचे स्टायलिश थ्रोबॅक फोटो केले शेअर)

​ऐश्वर्या राय – बच्चन

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाइलसाठी ओळखली जाते. ऐश्वर्याकडेही एक खास अंगठी आहे. व्ही शेपमधील ही अंगठी अतिशय सुंदर आहे. या Vanki रिंगमध्ये कित्येक डायमंड स्टडिड आहेत. दक्षिण भारतातील विवाह परंपरेनुसार मुलीला लग्नामध्ये सोने आणि हिऱ्यांपासून तयार केलेली अंगठी दिली जाते. कित्येक कुटुंबांमध्ये ही अंगठी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवली जाते, असे म्हणतात. यामागे प्रत्येकाच्या आपापल्या प्रथा – परंपरा असतात.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *