ऐश्वर्या राय आणि मलायका अरोराचा स्टायलिश ‘बटरफ्लाय’ रेड कार्पेट लुक

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मलायका अरोरा (Malaika Arora) या दोघींनी वयाची पंचेचाळिशी ओलांडली आहे. या वयातही त्यांचा जबरदस्त स्टायलिश (Fashion Tips) अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळतो. कधी – कधी या दोघींची स्टाइल त्यांच्या वयाच्या अभिनेत्रींसह तरुण अभिनेत्रींवर भारी पडताना दिसते. दरम्यान ऐश्वर्या आणि मलायकाच्या ‘बटरफ्लाय लुक’ची (Butterfly Gowns Fashion) मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

‘फुलपाखरू’ होऊन जेव्हा या दोन्ही अभिनेत्री रेड कार्पेटवर पोहोचल्या होत्या, त्यावेळेस यांनी आपल्या आकर्षक अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. या दोघींचीही स्टाइल शानदार आणि ग्लॅमरस असते .
(सर्व फोटो क्रेडिट : इंडिया टाइम्स आणि योगेन शाह)
(मायलेकीची जोडी! मिशापासून ते आराध्याने परिधान केला होता आईसारखाच पोषाख)

​फिल्म फेस्टिव्हलसाठी केली या गाउनची निवड

कान फिल्म फेस्टिव्हल (२०१८) मध्ये सहभागी झालेल्या ऐश्वर्या रायने ग्लॅमरस ड्रेस परिधान करून सर्वाचं लक्ष वेधून घेतले होतं. या फेस्टिव्हलसाठी तिनं बटरफ्लाय डिझाइन गाउन परिधान केला होता. हा स्टायलिश ड्रेस Michael Cinco यांनी डिझाइन केला होता. नेहमी प्रमाणे यावेळेसही ऐश्वर्याने आपल्या फॅशन आणि स्टाइलने उपस्थितांची मने जिंकली. तिचा हा सुंदर ड्रेस तयार करण्यासाठी तीन हजार तासांचा कालावधी लागला होता, अशी माहिती आहे.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​३ मीटर लांब ट्रेन आणि स्वारोवस्की क्रिस्टल

कान फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्याने परिधान केलेल्या आकर्षक गाउनचे डिझाइन फुलपाखराप्रमाणे दिसत होते. बॉडीकॉन फिटिंगसह यामध्ये 3 मीटर लांब ट्रेन जोडण्याचे आले होते. ज्यावर फुलपाखराच्या पंखाप्रमाणे डिझाइन तुम्ही पाहू शकता. गाउन तयार करण्यासाठी अल्ट्रा वायलेट, निळ्या, लाल आणि पांढऱ्या रंगांच्या धाग्यांचा वापर करण्यात आला होता. या ड्रेसवर स्वारोवस्की क्रिस्टल्स देखील लावण्यात आले होते. डीप कट नेकलाइन डिझाइनमुळे ड्रेसला ग्लॅमरस लुक मिळाला होता.

(Aishwarya Rai ऐश्वर्या राय -बच्चनचे सुंदर आणि मोहक साड्यांचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो)

ऐश्वर्या रायचा मेकअप

ऐश्वर्या राय – बच्चनने या बटरफ्लाय डिझाइन गाउनवर मॅचिंग ईअररिंग घातले होते. याचे डिझाइन अतिशय सुंदर होते. स्मोकी आइज, मॅट लिपस्टिक आणि कमीत – कमी ज्वेलरी लुकमध्ये ऐश्वर्या मोहक दिसत होती.

​मलायकाचा बटरफ्लाय ड्रेस

मलायका अरोराने जेव्हा ‘Miss Diva’च्या स्पर्धेमध्ये उपस्थिती दर्शवली होती, तेव्हा सर्वांच्या नजर तिच्यावरच खिळल्या होत्या. या कार्यक्रमासाठी तिनं पिवळा आणि पांढऱ्या शेड्सचा गाउन परिधान केला होता. लेबनानी डिझाइनर GEORGES CHAKRA ने हा गाउन डिझाइन केला होता. बोल्ड आणि युनिक पॅटर्न असा या गाउनचा लुक होता.

(मलायका अरोराचा ग्लॅमरस अवतार, पाहा पारंपरिक ते वेस्टर्न लुकमधील स्टायलिश फोटो)

स्टायलिश मलायका

​सुंदर गाउन आणि मलायकाचा मोहक लुक

मलायका अरोराने परिधान केलेल्या या वन शोल्डर गाउनमध्ये डीप कट नेकलाइन डिझाइन होतं. यामुळे ड्रेसला स्टायलिश लुक मिळाला होता. एका बाजूला फुलाची मोठी डिझाइन देखील तुम्ही पाहू शकता, ज्यामुळे ड्रेसचे डिझाइन आकर्षक दिसत आहे.

(सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी किंमत)

या ड्रेसवर मलायकाने सोनेरी रंगाचे स्ट्रॅप हील्स घातले होते. तसंच ईयररिंग्स आणि फोर फिंगर रिंग मॅच केली होती.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

फॅशनिस्ता मलायका अरोरा
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *