ऐश्वर्या राय-बच्चन आणि करीना कपूरने नेसली एकसारखीच साडी? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी

Spread the love

आपली स्टाइल स्टेटमेंट कायम चर्चेत राहावी, यासाठी बॉलिवूडमधील अभिनेत्री महागड्या आउटफिटपासून ते डिझाइनर बॅग, स्टायलिश लुक देणाऱ्या अ‍ॅक्सेसरीज आणि फुटवेअर इत्यादी गोष्टींवर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करतात. बदलत्या ट्रेंडनुसार स्टाइलवर इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यापूर्वी कित्येक अभिनेत्री ही बाब पूर्णतः विसरतात की, जी वेशभूषा परिधान करून आपण चारचौघांमध्ये मिरवणार आहोत; तिच स्टाइल दुसऱ्या हिरोईननं याआधीच कॅरी केलेली आहे.

मग फॅशन कॉपी केल्याने या अभिनेत्रींना सोशल मीडियावर ट्रोल देखील केलं जातं. बॉलिवूडमध्ये कित्येदा फॅशन फेस ऑफ पाहायला मिळते. असेच काहीसे करीना कपूर – खान (Kareena Kapoor Khan) आणि ऐश्वर्या राय – बच्चन (Aishwarya Rai Bachhan) सोबत झाल्याचेही दिसलं होतं. या दोघींनीही एकसारखीच वेशभूषा कॅरी केली होती. पाहुया फोटो… (Photos- India Times)
(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)

​ऐश्वर्या रायने स्टाइल केलं कॉपी?

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय – बच्चन आपल्या हटके स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. अ‍ॅली साब, गुच्ची, ऑस्कर डे ला रेंटा (Oscar de la Renta), मनीष मल्होत्रा, अबू जानी संदीप खोसला, सब्यसाची यासारख्या मोठ-मोठ्या डिझाइनरनं तयार केलेल्या आउटफिटचे भारी कलेक्शन ऐश्वर्याच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळते. दरम्यान ऐश्वर्याने २०१६ मध्ये एका कार्यक्रमासाठी लाल रंगाची चिकनकारी साडी नेसली होती. काही वर्षांपूर्वी करीना कपूर-खाननं देखील अशाच पॅटर्नची साडी नेसली होती. (Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)

​ऐश्वर्या रायचं मोहक रूप

२०१६ मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यामध्ये ऐश्वर्या राय- बच्चन देखील सहभाग झाली होती. या खास कार्यक्रमासाठी ऐश्वर्याने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पांढऱ्या आणि लाल रंगाच्या साडीची निवड केली होती. या साडीच्या बॉर्डरवर हँडवर्क स्टोनचं डिझाइन तुम्ही पाहू शकता. या साडीवर ऐश्वर्यानं स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइनचं ब्लाउज परिधान केले होते. या लुकसाठी ऐश्वर्यानं मेकअप सुद्धा सुंदर केला होता. ऐश्वर्याने लाइट टोन मेकअपसह बीमिंग हायलाइटर, स्मोकी आइज, डार्क आयशॅडो लावलं होतं आणि साइड पार्टेड लुक हेअर स्टाइल केली होती.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

​करीना कपूरची सुंदर साडी

रेड कार्पेट लुक असो किंवा कॅज्युअल ड्रेसिंग स्टाइल; करीना कपूरचा फॅशन सेन्स अप्रतिमच आहे. वेस्टर्न लुक प्रमाणेच करीना पारंपरिक कपड्यांमध्येही सुंदर दिसते. २०१२मध्ये एका कार्यक्रमासाठी करीना कपूरने डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली पांढऱ्या आणि लाल रंगाची चिकनकारी पॅटर्न साडी नेसली होती. यावर तिनं कट-आउट स्लीव्ह्जसह स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइनचं ब्लाउज परिधान केलं होतं. बेबोचा हा अवतार ग्लॅमरस आणि सुंदर होता.

(Kareena Kapoor करीना कपूरने पार्टी लुकसाठी ‘या’ लाख रुपयांच्या फुटवेअर केली निवड)

​चाहत्यांना आवडला बेबोचा अवतार

साडीच्या बॉर्डरवर सोनेरी रंगाच्या धाग्यांनी एम्ब्रॉयडरी करण्यात आली होती. यामुळे साडीला आकर्षक लुक मिळाला होता. या लुकसाठी करीनानं लाइट टोन मेकअप, लाल रंगाची टिकली, हातात बांगड्या आणि कानात झुमके अशी हटके स्टाइल कॅरी केली होती. मिडल पार्टेड बन हेअरस्टाइल करून करीनानं त्यावर गजरा देखील माळला होता. चाहत्यांना करीनाचा हा लुक प्रचंड आवडला होता.

(अनुष्का शर्मा आणि करीना कपूरच्या मॅटर्निटी फॅशनची रंगली चर्चा)

​ऐश्वर्या रायची स्टाइल करीना कपूरवर पडली भारी

एकीकडे करीना कपूर या साडीमध्ये स्टायलिश दिसतेय. तर दुसरीकडे ऐश्वर्या राय – बच्चनचा या साडीतील लुक अतिशय मोहक दिसत होता. पण दोघींची स्टाइल पाहता ऐश्वर्या रायचा लुक करीना कपूरवर भारी पडल्याचे दिसत आहे.

(करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *