ऑफिसमध्ये किंवा कमी जागेत पवनमुक्तासन कसे करावे? जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेली पद्धत

Spread the love

डॉ. प्रांजली फडणवीस
कंबरदुखीमध्ये पुढे वाकणे टाळले पाहिजे असे सर्व तज्ज्ञ सांगतात. त्यामागचे कारण आपण समजून घेऊ. उभे राहून पटकन आपण खालची वस्तू घेण्यासाठी वाकतो तेव्हा पोटाचे स्नायू आणि अवयव गुरुत्वाकर्षणामुळे खाली खेचले जातात, जे पर्यायाने मणक्‍यांना पुढे खेचतात. पाय गुडघ्यात सरळ ठेवून खाली वाकल्यामुळे कमरेपासून माकडहाडापर्यंत स्नायू ताणलेले असतात. त्याचा परिणाम कमरेचा मणक्यांवर होतो आणि कंबरदुखी वाढू शकते.

अनेकदा असे पाहिले जाते, की खुर्चीवरची बैठक, खूप गाडी चालवणे या परिस्थितीमध्ये कंबरेच्या स्नायूंना ताण तर हवा असतो; पण फॉरवर्ड करता येत नाही. अशा वेळी पवनमुक्तासन हे आसन उपयुक्त ठरते. पवनमुक्तासन यामध्ये फॉरवर्ड बेंडही आहे; पण पोटाचे स्नायू आणि मणके पुढे खेचले जात नाहीत. पाठ जमिनीला (Health Care Tips) टेकलेली असल्याने गुरुत्वाकर्षण हे मागच्या बाजूने कार्यान्वित होते. पाठीचा कणा पुढे झुकण्याऐवजी आपण पाय पोटाशी घेतो. त्यामुळे पोटाचे स्नायू आणि अवयव दाबले जातात. या स्थितीमध्ये कंबरेच्या स्नायूंपासून नितंबाच्या स्नायूपर्यंत व्यवस्थित ताण मिळतो; परंतु त्यांना त्रास होत नाही.
(पत्नी जेनेलियासह रितेश देशमुखने फिटनेस व अवयवदानासाठी केला ‘हा’ मोठा संकल्प)

पारंपरिक पवनमुक्तासनामध्ये पाठीवर उताणे झोपून एक पाय गुडघ्यात दुमडलेला असतो. दोन्ही हातांनी दुमडलेला गुडघा छातीपर्यंत दाबणे. श्वास सोडत गुडघ्याला नाक लावणे अशी क्रिया केली जाते. जेव्हा कंबर दुखत असते तेव्हा दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जमिनीवर ठेवणे. एक दुमडलेला गुडघा छातीपर्यंत आणणे. दोन्ही हातांनी धरून गुडघा अजून घट्ट छातीवर दाबणे. मान मात्र उचलू नये. अशा पद्धतीने केलेले पवन मुक्तासन हे कंबरदुखी आणि मानदुखीचे पेशंटही आरामात करू शकतात. फॉरवर्ड बेंडचा अपाय न होता चांगला फायदा मिळतो.
(आरोग्यासाठी अंडे खाण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या अंडे शिजवण्याची योग्य पद्धत)

ऑफिसमध्ये किंवा कमी जागेमध्ये करावयाचे पवनमुक्तासन
जेव्हा झोपून पवनमुक्तासन शक्य नसते (जागेअभावी किंवा काम करत असताना) अशा वेळी…
१. उभे राहून कमरेच्या उंचीच्या टेबलवर अथवा खिडकीच्या कठड्यावर पाय ठेवून दुमडलेला गुडघा खांद्यापर्यंत वर उचलणे आणि पोटावर दाबणे.
२. किंवा भिंतीला पाठ टेकवून उभे राहणे. एक पाय गुडघ्यात दुमडून हाताने घट्ट धरून पोटावर दाबणे.
३. वयस्क व्यक्तींना अथवा सरळ उभे राहून असणाऱ्या व्यक्तींसाठी खुर्चीवर बसून एक पाय गुडघ्यात दुमडून पाऊल खुर्चीवर ठेवणे. दोन्ही हातांनी गुडघा घट्ट धरून कमरेपर्यंत ताठ होणे.
(तास-न्-तास एकाच जागी बसून काम करताय का, हृदयाची काळजी कशी घ्यावी?)

जेव्हा पवनमुक्तासन या आसनाची कंबरदुखीमध्ये उपयुक्तता पाहतो, तेव्हा एकपाद पवनमुक्तासन उपयुक्त आहे, कारण गुडघ्यात दुमडलेल्या पायाव्यतिरिक्त जमिनीवर सरळ असलेल्या पायामुळे पेल्व्हिसचे पूर्णपणे फॉरवर्ड बेंड होत नाही आणि कमरेचे मणके पूर्णपणे पुढे झुकत नाहीत, त्यामुळे मणक्‍यांमधील चकतीवर (डिस्क) जास्त दाब निर्माण होत नाही. कमरेचे स्नायू मात्र ताणले जातात, त्यामुळे कंबरदुखीमध्ये दोन्ही पाय पोटाशी न घेता, मान न उचलता, एका पायाने पवनमुक्तासन जरूर करावे.

आरोग्यासंबंधित विविध लाभ मिळवण्यासाठी नियमित करा पवनमुक्तासन


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *