‘कबीर सिंह’फेम कियारा अडवाणीचे ब्युटी सीक्रेट, त्वचेसाठी करते आजीने सांगितलेला नैसर्गिक उपाय

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीचे ‘कबीर सिंह’ सिनेमातील भूमिकेचे आणि नो-मेकअप लुकचे प्रचंड कौतुक करण्यात आले होते. कियाराने आपल्या मोहक सौंदर्याने सिनेरसिकांचे हृदय जिंकलं. आपल्या शानदार अभिनयाने आणि सौंदर्याने कियाराने चाहत्यांना अक्षरशः वेड लावलंय. आपल्या ब्युटी केअर रुटीनमध्ये कियारा आजीने सांगितलेल्या नैसर्गिक उपचारांचाही समावेश करते. चला जाणून घेऊया तिच्या मोहक सौंदर्याचे रहस्य…
(Skin Care या बियांच्या तेलामध्ये आहे नॅचरल अँटी-एजिंंग फार्म्युला, त्वचेला मिळतात ‘हे’ लाभ)

घरगुती उपचारांवर कियाराचा आहे विश्वास

सौंदर्य नैसर्गिक पद्धतीने खुलवण्यासाठी कियारा अडवाणीचा घरगुती उपचारांवर अधिक विश्वास आहे. याच कारणामुळे ती त्वचेशी संबंधित बहुतांश समस्या दूर करण्यासाठी ब्युटी प्रोडक्टऐवजी घरगुती उपचारांची मदत घेते.
(चेहऱ्यावरील अनावश्यक केसांच्या समस्येतून हवीय सुटका? थ्रेडिंग-वॅक्सिंगऐवजी करा हा नैसर्गिक उपाय)

​कमीत कमी ब्युटी प्रोडक्टचा करते उपयोग

कियाला अडवाणीला सुंदर दिसण्यासह साध्या अवतारात राहणं अधिक पसंत आहे. याच कारणामुळे तिचे रूप अधिक मोहक व सुंदर दिसते. शूटिंग किंवा एखादा खास कार्यक्रम असल्यासच मेकअप करते, असे कियाराने सांगितलं. अन्यथा ती कमीत-कमीत ब्युटी प्रोडक्ट्सची मदत घेऊन केवळ टच अप करणं पसंत करते.

(Skin Care ब्युटी फेस मास्क लावून आलिया भट उन्हात का बसली? जाणून घ्या त्वचेला मिळणारे फायदे)

​कियाराच्या आजीने सांगितला तिला घरगुती उपाय

त्वचेची देखभाल करण्यासाठी कियारा आपल्या आजीने सांगितलेल्या नैसर्गिक उपचारांची मदत घेते. हे उपाय ती नियमित फॉलो करते. चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी तयार केलेले फेस पॅक आणि स्किन मास्कचा कियारा उपयोग करते.

(त्वचेच्या आरोग्यासाठी पोषक आहे मसूर डाळ, घरच्या घरी असे तयार करा नॅचरल फेस पॅक)

​कियारा असे तयार करते फेस मास्क

मध, बेसन, क्रीम दूध आणि लिंबाचा रस ही सर्व सामग्री एकत्र करून कियारा घरच्या घरी नैसर्गिक फेस मास्क तयार करते. या सर्व सामग्री नैसर्गिक आहेत आणि योग्य पद्धतीने यांचा उपयोग केल्यास आपल्या त्वचेवर कोणत्याही प्रकारे दुष्परिणाम होत नाहीत. पण हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचाही सल्ला घेणे आवश्यक आहे.

(मेकअपविनाही मौनी रॉयचा चेहरा दिसतो चमकदार, डागविरहित त्वचेसाठी करते हा सोपा उपाय)

​कसा करावा या फेस पॅकचा उपयोग?

कियारा अडवाणी उपयोग करत असलेले फेस पॅक तुम्ही देखील सहजरित्या तयार करू शकता.

सामग्री : दोन चमचे बेसन, एक चमचा मध, अर्धा चमचा दुधाची क्रीम, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस

वरील सर्व सामग्री एकत्र घ्या आणि जाडसर पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर २० मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या. फेस वॉश किंवा साबणाचा उपयोग करू नये.

(Natural Skin Care हिवाळ्यात चेहऱ्यावर हवाय नॅचरल ग्लो, त्वचेसाठी करा हे ७ नैसर्गिक उपचार)

​बेसनचे फायदे

  • बेसनमुळे चेहऱ्यावरील टॅन दूर होण्यासाठी मदत मिळते. यातील पोषक घटकांमुळे त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा चमकदारही होते. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी बेसनचा उपयोग फायदेशीर ठरू शकतो. यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होण्यास मदत मिळते.
  • मुरुम आणि मुरुमांच्या डागांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? तर ब्युटी केअर रुटीनमध्ये बेसनचा समावेश करावा.
  • बेसनमध्ये एक्सफोलिएटिंग गुणधर्म आहेत. महत्त्वाचे म्हणजे यातील गुणधर्म त्वचेसाठी नैसर्गिक स्क्रबच्या स्वरुपात कार्य करतात.

(चेहऱ्याचंच नव्हे तर अंडरआर्म्‍स-पोट व शरीराच्या या भागांवरही फेशिअल करणं आवश्यक)

NOTE त्वचेशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *