करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री रायमा सेनने (Raima Sen) नुकतंच आपले थ्रो-बॅक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिचा जबरदस्त बोल्ड अंदाज पाहायला मिळाला. रायमाच्या या जुन्या फोटोशूटवर तिच्या चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडला जात आहे. दरम्यान यापूर्वीही अनेकदा रायमा सेनने आपले बोल्ड अंदाजातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसंच हॉट आणि ग्लॅमरस दिसण्यासाठी आतापर्यंत बॉलिवूडमधील बऱ्याच अभिनेत्रींनीही पँटलेस (Bollywood Photoshoot) फोटोशूट केलं आहे. असा बोल्ड निर्णय घेणारी रायमा सेन ही एकमेव अभिनेत्री नाही. बॉलिवूडमधील कोणकोणत्या अभिनेत्रींनी पँटलेस फोटोशूट केले आहेत,जाणून घेऊया माहिती
(Aishwarya Rai केवळ आराध्याच नव्हे तर या ५ गोष्टींपासूनही दूर राहू शकत नाही ऐश्वर्या राय-बच्चन)

​रायमाने शेअर केले बोल्ड फोटो

रायमा आपल्या बोल्ड लुकसाठी इंडस्ट्रीमध्ये ओळखली जाते. रायमाने इन्स्टाग्रामवर जे फोटो शेअर केले आहेत, त्यामध्ये तिनं जॉर्जेटचा आकाशी रंगाचा कुर्ता परिधान केल्याचे दिसत आहे. या सी-थ्रु फॅब्रिकवर पांढऱ्या रंगाच्या धाग्याने विणकाम करण्यात आले आहे, ज्यामुळे रायमाला सुंदर लुक मिळाला आहे. या फोटोमध्ये रायमा ग्लॅमरस दिसत आहे.

(डेनिम है ना! नव्या आणि ट्रेंडिंग फॅशनची माहिती)

​करीनाने देखील केलं असं फोटोशूट

काही दिवसांपूर्वी करीना कपूर खानने (Kareena Kapoor) स्वतःचे नव्या अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. करीनाने आपल्या घरामध्येच हे फोटोशूट केलं होतं. बेबोचे हे फोटो पती सैफ अली खानने काढले होते. एवढंच नव्हे तर बेबोने जे शर्ट परिधान केलं होतं, ते देखील सैफचेच होतं. या फोटोमध्ये करीनाचा सुपर बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. तिनं देखील हे पँटलेस फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटवर करीनाच्या चाहत्यांनी लाइकचा पाऊस पाडला.

(जुन्या कपड्यांचा असा करा वापर आणि घराला द्या नवा लुक)

​उर्वशी रौतेला

उर्वशी रौतेलाने (Urvashi Rautela) देखील इन्स्टाग्रामवर निळ्या रंगाच्या शर्टमधील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत. तिनं शीयर पॅटर्नचे शर्ट परिधान केलं आहे. या शर्टचे स्लीव्ह्ज बिशप डिझाइनमध्ये दिसत आहेत. शर्टच्या सी थ्रु पॅटर्नमुळे उर्वशीचा लुक अतिशय बोल्ड दिसत आहे. या फोटोशूटसाठी तिने मेकअप देखील बोल्ड केल्याचे दिसत आहे. तसंच तिनं वेव्ही हेअर स्टाइल केली होती.

(KBC १२च्या सेटवरील बिग बी अमिताभ बच्चन यांचा कूल लुक)

​आलिया भट

आलिया भटने (Alia Bhatt) एका फोटोशूटसाठी शर्ट आणि जॅकेटसह टू-पीस बिकिनी व स्विमसूट परिधान केलं होतं. या फोटोंमध्ये आलिया प्रचंड बोल्ड आणि सुंदर दिसत होती. फोटोमध्ये आलिया डेनिम जॅकेटसह काळ्या रंगाच्या स्टायलिश बिकिनीमध्ये दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोसाठी तिने निळ्या रंगाचा स्विमसूट स्वेटशर्टसह परिधान केला होता. या दोन्ही फोटोंमध्ये आलियाचा ग्लॅमरस लुक चाहत्यांना पाहायला मिळाला.

(Ankita Lokhande सुंदर साडीतील अंकिता लोखंडेच्या मोहक अदा, पाहा फोटो)

​दीपिका पादुकोण

काही महिन्यांपूर्वी दीपिका पादुकोणने (Deepika Padukone) देखील सोशल मीडियावर स्वतःचे हॉट अंदाजातील फोटो शेअर केले होते. तिचे हे बोल्ड लुकमधील फोटोशूट चाहत्यांना भरपूर आवडले. दीपिकाने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप परिधान केला होता. ज्यावर तिनं मॅचिंग रंगाची हाय वेस्ट ब्रीफ्स परिधान केली होती. तसंच तिनं हाय हील्स देखील घातले होते. केसांना वेट लुक दिला होता. काही जणांनी तिच्या या फोटोशूटवर पसंती दर्शवली तर काहींनी प्रचंड टीका देखील केली.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​प्रियंका चोप्रा

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने (Priyanka Chopra) आतापर्यंत कित्येक बोल्ड फोटोशूट केले आहेत. यातील काही फोटोशूट पँटलेस अवतारातील देखील आहेत. काही फोटोंमध्ये ती मोहक दिसत आहे तर काही फोटोशूटमधील तिच्या सुपर हॉट लुकवर चाहत्यांनी लाइक आणि कमेट्सचा वर्षाव केला आहे. तिच्या या फोटोंचे फॅन्सकडून जास्त प्रमाणात कौतुक करण्यात आलं आहे. तसंच सोशल मीडियावरही हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.

(ड्रेस पाहिल्यानंतर लोक म्हणाले, अनुष्का शर्मानंतर आता पक्का प्रियंका चोप्राचा नंबर)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *