करीना कपूरचा ड्रेस तर सारा अली खानचा कुर्ता, या अभिनेत्रींच्याही स्टाइलची नुसती चर्चा

Spread the love

​करीना कपूर-खान

करीना कपूरचा रेड कार्पेट लुक असो किंवा मॅटर्निटी फॅशन; बेबोची प्रत्येक स्टाइल अप्रतिम असते. प्रेग्नेंसीमध्येही करीना कपूरला स्टाइलसोबत तडजोड करणं पसंत नाही, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण या दिवसांतही तिचा एकापेक्षा एक स्टायलिश अवतार चाहत्यांना पाहायला मिळत आहे. एका जाहिरातीच्या शूटिंगसाठी बेबोने ‘झारा’ या फॅशन ब्रँडचा लाँग मॅक्सी ड्रेस परिधान केला होता. यामध्ये लाँग स्लीव्ह्जसह राउंड नेकलाइन आणि रफल ट्रिम्स डिझाइन आपण पाहू शकता. या मोनोक्रोमॅटिक ड्रेसला एलास्टिक स्मोक्ड आणि मॅचिंग बेल्टमुळे आकर्षक लुक मिळालाय. लाइट टोन मेकअप, स्मोकी आईज, लाइट टोन लिपस्टिक आणि साइड पार्टेड हेअर स्टाइल अशा लुकमध्ये करीना प्रचंड सुंदर दिसत होती. करीनाच्या या ड्रेसची किंमत ४ हजार ४९० रुपये एवढी आहे. (फोटो- The Bollywood Closet)

(कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या अनन्या पांडेनं परिधान केले इतके स्वस्त कपडे, पाहा फोटो)

​सारा अली खान

एकापेक्षा एक सुंदर ड्रेस-साड्या परिधान करणारी सारा अली खान (Sara Ali Khan) आपल्या मोहक फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. साराने आपली आजी म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्या वाढदिवशी सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले होते. या फोटोतील तिच्या वेशभूषेचं लोकांनी प्रचंड कौतुक केलं. सारा अली खान या मोनोक्रोमॅटिक शरारा सेटमध्ये सुंदर दिसत होती. मायक्रो प्रिंट राउंड नेकलाइन आणि फुल स्लीव्ह्जमुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळालाय. साराने लाइट टोन मेकअप, साधी हेअर स्टाइल केली होती. तसंच ड्रेसवर तिनं चंदेरी रंगाचे ब्रेसलेट देखील मॅच केलं होतं. एकूणच सारा या ड्रेसमध्ये नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती.

(लग्नासाठी ऑनलाइन खरेदी करताय? मग या १४ गोष्टी नक्की ठेवा लक्षात)

​मीरा राजपूत-कपूर

शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत देखील आपल्या हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. मीराने ‘द इंडिया एडिट’ होम मीटिंगसाठी बँडेज टी-शर्ट ड्रेस परिधान केला होता. या मीटिंगसाठी मीराने जयपूरमधील फॅशन ब्रँड Aaproने डिझाइन केलेल्या ड्रेसची निवड केली होती. या जांभळ्या रंगाच्या ड्रेसचं राउंड नेकलाइन डिझाइन होतं. यावर ब्रिक शेडमध्ये माइक्रो बुटी देखील आपण पाहू शकता. या ड्रेसच्या मधोमध मॅचिंग ब्लेटचाही समावेश होता. ड्रेसवर मीराने Bhavya Rameshने डिझाइन केलेल्या स्टड्सची निवड केली होती. बेसिक मेकअपसह आइलाइनर, लाइट टोन लिपस्टिक अशा अवतारात मीरा सुंदर दिसत होती. मीराच्या या ड्रेसची किंमत ९ हजार रुपये एवढी आहे.

(दीपिका पादुकोणच्या ‘या’ स्टायलिश लुकवर लोकांनी व्यक्त केली होती नाराजी, म्हणाले…)

​कियारा आडवाणी

बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीनं देखील आपले सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. अभिनेत्रीने सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर Saaksha आणि Kinniने डिझाइन केलेला मायक्रो प्लीटेड थ्री-टीयर ड्रेसमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते. आगामी सिनेमा ‘इंदू की जवानी’च्या प्रमोशनल इव्हेंटसाठी कियाराने या लाल रंगाच्या ड्रेसची निवड केली होती. यामध्ये कियारा प्रचंड सुंदर दिसत होती. या ड्रेसवर कियाराने लाइट टोन मेकअप केला होता.

(दीपिका पादुकोणच्या वॉर्डरोबमध्ये नेहमी दिसतील ‘या’ फॅशन ब्रँडचे सुंदर आउटफिट्स)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *