करीना कपूरचे शूटिंगमधील फोटो केले शेअर, सुंदर फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान (Kareen Kapoor) कोणत्या- न्- कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिनं चाहत्यांसोबत स्वतःच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची माहिती शेअर केली होती. यानंतर पुढील काही दिवस सोशल मीडियावर केवळ तिची आणि सैफ अली खानची चर्चा सुरू होती. आता बेबोचे शूटिंग सेटवरील काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. काही फोटो स्वतः बेबोने शेअर केले आहेत.

करीनाने आपल्या कामातून ब्रेक न घेता शूटिंगशी संबंधित असलेले काम सुरूच ठेवले आहे. पहिल्या प्रेग्नेंसीमध्येही तिनं वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम केलं होतं. आता दुसऱ्या गरोदरपणातही तिनं कामाच्याबाबतीत हाच दृष्टिकोन कायम ठेवल्याचं दिसतंय. यादरम्यान तिचा एकापेक्षा एक स्टायलिश लुक चाहत्यांना पाहायला मिळत आहे. तिच्या स्टायलिश आणि ग्लॅमरस फोटोंवर चाहत्यांकडून लाइक आणि कमेंट्सचा पाउस पाडला जात आहे.
(सचिन तेंडुलकरची लाडकी लेक साराचा फॅशनेबल अंदाज, तिच्या स्टाइलला कोणीही देऊ शकत नाही टक्कर)

​शूटिंगसाठी परिधान केला होता हा ड्रेस

सेलिब्रिटी स्टायलिस्ट तान्या घावरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर करीना कपूरचे काही थ्रोबॅक फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये करीना कपूरनं (Kareena Kapoor) केशरी रंगाचे शानदार आउटफिट परिधान केल्याचे तुम्ही पाहू शकता. करीनाचा हा लुक एकदम परफेक्ट असा होता. एका डान्स रिअ‍ॅलिटी शोच्या एपिसोड शूटिंगसाठी तिनं हा ड्रेस परिधान केला होता. या डान्स रिअ‍ॅलिटी शोची ती परीक्षक होती.

(करीनापासून ते रायमापर्यंत, या अभिनेत्रींनी फोटोशूटसाठी घेतला असा बोल्ड निर्णय)

​सुपर स्टायलिश होता करीनाचा ड्रेस

करीना कपूर खानचा हा ड्रेस न्यू यॉर्कमधील AMUR या ब्रँडचा होता. हे ब्रँड सस्टेनेबल फॅशन आउटफिटसाठी प्रसिद्ध आहे. ग्लॅमरस लुकसाठी बेबोने केशरी रंगाचे बस्टियर आणि त्यासोबत हाय वेस्ट स्कर्ट परिधान केला होता. या दोन्ही आउटफिटचे रंग आणि डिझाइन एकसारखं होते. वर्टिकल प्लीट्ससह बस्टियरला स्वीटहार्ट नेकलाइन डिझाइन देण्यात आली होती. या ड्रेसचे ऑफ शोल्डर डिझाइन होतं. ज्यामुळे करीनाला ग्लॅमरस लुक मिळाला आहे.

(मलायका अरोरा ते करीना कपूर, प्रेग्नेंट असताना या अभिनेत्रींनी केलं शानदार रॅम्प वॉक)

​अकॉर्डियन प्लीट्स आणि फ्रंट स्लिट

तिनं परिधान केलेल्या स्कर्टवर लेअर्ड डिझाइन दिसत आहे. या डिझाइनर ड्रेसमध्येही करीना नेहमी प्रमाणे सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर तुम्ही अकॉर्डियन प्लीट्स डिझाइन देखील पाहू शकता. या स्कर्टला अधिक स्टायलिश लुक देण्यासाठी फ्रंट स्लिट डिझाइन करण्यात आलं होतं. या ड्रेसवर करीनाने काळ्या रंगाचे हाय हील्स मॅच केले होते. तिचा संपूर्ण लुक स्टायलिश दिसत आहे.

(करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक)

​लेअर्ड चेन आणि बीच हेअर स्टाइल

करीनाने (Kareena Kapoor Fashion) आपला मेकअप पूर्णतः न्यूड टोन ठेवला होता. तिनं हाय चीकबोन्स ब्लशरच्या मदतीने हायलाइट केले होते. तसंच बीच वेव्ह हेअर स्टाइल केली होती. या मेसी टचमुळे तिच्या ग्लॅमरस लुक अधिक सुंदर दिसत आहे. करीनाने या आउटफिटसह लेअर्ड चेन नेकलेस परिधान केलं होतं. तसंच मॅचिंग पॅटर्न रिंग देखील घातली होती. (फोटो क्रेडिट : योगेन शाह आणि इन्स्टाग्राम@tanyagharvi)

(जेव्हा करीना कपूरवर भारी पडली होती या टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल, पाहा फोटो)

​कफ्तान ड्रेस

करीना कपूर खानला आपल्या फॅशन स्टाइलसोबत कोणत्याही प्रकारे तडजोड करायला आवडत नाही. तिची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरम्यान, प्रेग्नेंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केल्यापासून करीना कपूर (Kareena Kapoor Pregnancy) बऱ्याचदा कफ्तान ड्रेसमध्येच दिसत आहे. अशाच प्रकारच्या ड्रेसमध्ये तिचे काही फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळाले आहेत. या फोटोंमध्ये करीनाचा लुक अतिशय कम्फर्टेबल आणि साधा दिसत आहे.

(करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *