करीना कपूरच्या स्टायलिश लुकवर भारी पडली सारा अली खानची ‘ही’ फॅशन

Spread the love

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये हल्ली काही जणांकडून कळत- नकळत एकमेकांच्या स्टाइलची कॉपी होत असल्याचे अनेकदा पाहायला मिळतं. लेटेस्ट ट्रेंड फॉलो करण्याच्या नादात बी – टाउनमधील कित्येक अभिनेत्री मिळतेजुळते कपडे, मॅचिंग हँडबॅग याव्यतिरिक्त एकसारख्याच दिसणाऱ्या अ‍ॅक्ससेरीज देखील कॅरी करताना दिसतात. पण आपण परिधान केलेला पोषाख इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्रीच्या स्टाइलची कॉपी असल्याचे माहिती असतानाही काही जणी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. कारण प्राधान्य फक्त फॅशनला दिलं जातं.

फॅशनच्या बाबतीत अशीच काहीशी स्पर्धा बॉलिवूडची बेगम करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तिच्याहून १३ वर्षांनी लहान असलेल्या सारा अली खान (Sara Ali Khan) मध्येही पाहायला मिळाली. काही दिवसांपूर्वी या दोघींनीही मिळत्या-जुळत्या डिझाइनचा कुर्ता घातल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामध्ये दोघीचंही स्टाइल स्टेटमेंट एकमेकांवर भारी पडल्याचंही दिसलं.

​करीना दिसत होती सुंदर

फॅशनच्या बाबतीत करीना कपूरला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. चाहत्यांमध्ये तिच्या स्टाइलची प्रचंड क्रेझ पाहायला मिळते. याच कारणामुळे बेबोचा रेड कार्पेट लुक असो किंवा मग कॅज्युअल लुक, तिची स्टाइल सोशल मीडियावर लगेचच व्हायरल होते. २०१८ मध्ये बेबोनं ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाच्या प्रमोशनसाठी गोल्ड ब्रोकेड कुर्ता सेट परिधान केला होता. या पोषाखामध्येही करीना नेहमी प्रमाणे सुंदर दिसत होती.

(श्रीदेवींच्या लेकींची चर्चा! जान्हवी-खुशीने आपल्या स्टाइलने वेधून घेतले सर्वांचं लक्ष)

​कॉपी करणं कठीण

‘वीरे दी वेडिंग’ सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटसाठी करीना कपूरने असे कित्येक आउटफिट्स परिधान केले होते, ज्यांची स्टाइल कॉपी करणं खरंच कठीण आहे. अशाच एका कार्यक्रमासाठी बेबोनं एथनिक फॅशन लेबल ‘रॉ मँगो’ ब्रँडने डिझाइन केलेले ब्रोकेड प्रिंट ड्रेस परिधान केला होता. ड्रेसचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये रेशीम धाग्यांसह सोन्याच्या बारीक तारांच्या मदतीनेही वर्क करण्यात आलं होते. यामुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला होता. या ड्रेसवर करीनाने लाइट टोन मेकअप आणि मिडल पार्टेड पोनी टेल हेअर स्टाइल केली होती.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​सारा अली खानचा मोहक लुक

कॅज्युअल टी-शर्ट, ऑफ शोल्डर ड्रेस, पांढऱ्या रंगाचे चिकनकारी ड्रेस, रंगीबेरंगी बांगड्या अशी साधी आणि मोहक स्टाइल कॅरी करणं सारा अली खानला पसंत आहे. तसंच साराला लेटेस्ट ट्रेंडनुसार एथनिक वेशभूषा परिधान करायलाही भरपूर आवडते. तिचा असाच काहीसा अवतार ‘केदारनाथ’ सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान पाहायला मिळाला. कार्यक्रमासाठी अभिनेत्रीने ब्रोकेड पॅटर्न कुर्ता परिधान केला होता. या स्टाइलमध्ये यापूर्वी करीना कपूरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

(आलिया भटचा मोहक लुक, ३५ शाळकरी मुलांनी या लेहंग्यावर काढले आहेत असे सुंदर डिझाइन)

​सारा अली खानची हटके स्टाइल

साराने देखील ‘केदारनाथ’ सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान फॅशन लेबल ‘रॉ मँगो’ ब्रँडचाच ब्रोकेड प्रिंट कुर्ता परिधान केला होता. सारा आणि करीनाच्या ड्रेसचा रंग पूर्णतः वेगळा होता. साराच्या कुर्त्याचा रंग निळा आणि सोनेरी होता. पण दोघींचंही ड्रेस पॅटर्न आणि डिझाइन एकसारखंच होतं. साराच्या कुर्त्यावर तुम्ही बोट नेकलाइन डिझाइन पाहू शकता. तसंच आकर्षक लुक मिळावा यासाठी साराने स्ट्रेट हेअर स्टाइल आणि लाइट टोन मेकअप केला होता.

(Sonam Kapoor ‘या’ स्टायलिश ड्रेसमुळे नेटकऱ्यांनी सोनम कपूरला केलं ट्रोल, म्हणाले…)

​करीनावर भारी पडली साराची स्टाइल

एकीकडे सोन्याच्या तारांपासून तयार करण्यात आलेल्या ब्रोकेड कुर्तामध्ये करीना कपूर स्टायलिश दिसत होती तर दुसरीकडे सारा अली खानचा हा मोनोटोन लुक देखील एकदम सुंदर दिसत होता. तसं पाहायला गेलं तर दोघींचीही स्टाइल हटके होती. पण फॅशनच्या बाबतीत यावेळेस सारा अली खान बॉलिवूडच्या बेगमवर भारी पडल्याचं दिसलं.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *