करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर – खान (Kareena Kapoor Khan) अभिनयाव्यतिरिक्त आपल्या अप्रतिम स्टाइलसाठीही ओळखली जाते. बॉलिवूडची बेबो करीना कपूरचे एकापेक्षा एक सुंदर आणि फॅशनेबल (Fashion Tips) आउटफिटमधील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. रेड कार्पेट लुक असो किंवा मॅटरनिटी फॅशन; करीना कपूरची स्टाइल (Style) प्रत्येक वेळी पाहण्यासारखी असते. करीनाची स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे.

दरम्यान करीनाचे डेनिमवर विशेष प्रेम आहे. यासाठी आपल्या डेनिम पँट्स बहीण करिश्मासोबत शेअर करणं तिला अजिबात पसंत नाही. डेनिमनंतर करीनाला सध्या फ्लोरल पेस्टल पॅटर्न पोषाख सुद्धा परिधान करण्यास आवडत असल्याचे दिसत आहे. यामुळेच करीनाने आपल्या वॉर्डरोबमध्ये एकापाठोपाठ एक फ्लोरल पेस्टल पॅटर्न कपड्यांचा समावेश केल्याचे पाहायला मिळतंय.
(Navratri 2020 नवरात्रौत्सवासाठी ५ सुंदर साड्यांचा पर्याय, वजनाने हलक्या व स्टाइलमध्येही आहेत जबरदस्त)

​फॅशनिस्ता करीना कपूर

करीना कपूरचे (Kareena Kapoor Khan) रिअल लाइफमधील फॅशनेबल कपडे, डिझाइनर बॅग, अगदी स्टेटमेंट ज्वेलरीशी संबंधित आवडी-निवडी देखील रील लाइफ इतक्याच क्लासिक आहेत. एकापेक्षा एक स्टायलिश पोषाख परिधान करून नेहमीच चर्चेत असणाऱ्या करीनाने नुकतेच एका जाहिरातीसाठी शुटिंग केलं. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जाहिरातीसाठी करीनाने अतिशय सुंदर डिझाइनर ड्रेस परिधान केला होता. अशाच पॅटर्नचा ड्रेस तुम्ही देखील परिधान करू शकता. एखाद्या सेलिब्रेशन किंवा पार्टीसाठी हा ड्रेस परफेक्ट आहे.

(Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)

​करीनाचा डिझाइनर ड्रेस

जाहिरातीच्या शुटिंगसाठी करीनाने फॅशन डिझाइनर हेमंत आणि नंदिता यांनी डिझाइन केलेला फिकट निळ्या रंगाच्या ड्रेसची निवड केली होती. ज्यामध्ये Peek-a-Boo डिटेलिंगसह व्ही शेप नेकलाइन, टाय अप कटऑफ डिझाइन असा स्टायलिश व आकर्षक लुक ड्रेसला देण्यात आला होता. हा ड्रेस तयार करण्यासाठी क्रिंकल रेयॉन फॅब्रिक वापरण्यात आलं होतं.

(देबिनापासून ते प्रियंका चोप्रापर्यंत या सेलिब्रिटींनी दोन पद्धतींनी थाटलं लग्न, असा होता वेडिंग लुक)

ज्यामुळे या पोषाखास चमकदार लुक मिळत आहे. ड्रेसचे स्लीव्ह्ज फ्लॉउन्स पफी डिझाइनचे आहेत, ज्यामुळे ड्रेस अधिक मोहक दिसत आहे.

(सोनमच्या लग्नात जॅकलीनने परिधान केला होता साडेसात लाख रुपयांचा लेहंगा, तर करीनाच्या ड्रेसची होती एवढी किंमत)

​ड्रेसची किंमत किती?

करीना कपूरच्या या सुंदर ड्रेसची किंमत जवळपास २४ हजार ९५५ रुपये एवढी आहे. तुम्हाला देखील पेस्टल ड्रेस परिधान करण्याची आवड असल्यास, करीनाचा हा लेटेस्ट अवतार फॉलो करू शकता.

(इतक्या वर्षांनंतर जेव्हा माधुरी दीक्षितच्या स्टायलिश ड्रेसबद्दल ट्रोलर्स म्हणाले, ‘अखियाँ मिलाऊँ या चुराऊँ…’)

तुमच्या वॉर्डरोबमध्ये आतापर्यंत फ्लोरल पॅटर्न ड्रेस नसेल तर अशा मिळत्या-जुळत्या डिझाइनचा ड्रेस तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला या ड्रेसमुळे मोहक लुक मिळेल.

​कूल लुक

मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जायचे असल्यास, सेलिब्रेशन, पार्टी किंवा एखादा खास कार्यक्रम असल्यास हा फ्लोरल पेस्टल पॅटर्न ड्रेस एकदम परफेक्ट निवड ठरू शकतो. हा ड्रेस स्टायलिश असण्यासह परिधान करण्यासही कम्फर्टेबल आहे. फ्लोरल ड्रेसचे हे पॅटर्न तुम्ही ऑनलाइन देखील खरेदी करू शकता.

(ऐश्वर्या रायची ७५ लाख रुपयांची लग्नातील साडी, मौल्यवान खडे व सोन्याच्या धाग्यांचा केला होता वापर)

​फिकट निळ्या रंगाची फॅशन

फिकट निळ्या रंगाच्या आउटफिट्सचा सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहे. या रंगाची तरुणाईमध्ये क्रेझ वाढत आहे. करीनाच्या या ड्रेसशी मिळता-जुळता ड्रेस तुम्हाला आपल्या वॉर्डरोबमध्ये हवा असल्यास कित्येक पर्याय सहजरित्या उपलब्ध होऊ शकता.

(Kareena Kapoor Birthday २० वर्षांत इतकी बदलली करीना कपूरची फॅशन, कधी कौतुक तर कधी झाली होती ट्रोल)

किंवा एखादे नवीन डिझाइन देखील तुम्हाला आवडू शकते.

(Kareen Kapoor Birthday करीना कपूरने बर्थडे सेलिब्रेशनसाठी परिधान केला होता हा महागडा स्टायलिश ड्रेस)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *