करीना कपूरने पुन्हा सर्वांचं लक्ष घेतलं वेधून, ‘या’ आकर्षक ड्रेसमध्ये दिसतेय सुपर स्टायलिश

Spread the love

​करीनाचा आकर्षक ड्रेस

करीना कपूर आपल्या शुटिंगच्या कामामध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान करीना तिच्या घराबाहेर पांढऱ्या रंगाच्या सुंदर ड्रेसमध्ये दिसली. या सुपर स्टायलिश लुकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या स्टायलिश ड्रेसमध्ये बेबो मोहक दिसतेय. तिनं परिधान केलेल्या मॅक्सी ड्रेसमध्ये ए-सिमेट्रिकल डिझाइन होतं, यामुळे ड्रेसला आकर्षक लुक मिळाला आहे. करीनानं घातलेला हा फ्लेअर्ड डिझाइन ड्रेस प्रेग्नेंट महिलांसाठी परफेक्ट आउटफिट ठरू शकते.

(सारा अली खानची ‘ही’ साडी पाहून नेटिझन्सना हसू आवरेना, अशा केल्या होत्या कमेंट्स)

​पोल्का डॉट्स डिझाइन

बेबोच्या आउटफिटमध्ये स्पॅगटी स्लीव्ह्ज आणि व्ही कट नेकलाइन डिझाइन तुम्ही पाहू शकता. या ड्रेसवर काळ्या आणि राखाडी रंगाचे पोल्का डॉट्स डिझाइन देखील आहे. सध्या या पॅटर्नच्या ड्रेसचा ट्रेंड सुरू आहे. करीनाने या ड्रेसवर सोनेरी रंगाचे फ्लॅट्स मॅच केले होते. तसंच ड्रेसचे नेकलाइन हाइलाइट करण्यासाठी तिनं स्लीक पोनी हेअर स्टाइल केली होती. तर काळ्या चष्म्यामुळे तिला परफेक्ट लुक मिळाला आहे.

(Malaika Arora Style मलायका अरोराचा ग्लॅमरस लुक, फोटो पाहून चाहते झाले फिदा)

​करीनाचा ऑल व्हाइट लुक

यापूर्वीही करीनाचं पांढऱ्या रंगाच्या आउटफिटवरील विशेष प्रेम पाहायला मिळालं आहे. आपल्या वाढदिवशी बेबोने एका जाहिरातीचे शुटिंग केले होते. यासाठी तिनं पांढऱ्या रंगाची पँट आणि त्यावर मॅचिंग कॉलर शर्ट परिधान केलं होतं. तसंच या लुकसाठी तिनं पांढऱ्या रंगाचेच फुटवेअर मॅच केले होते आणि स्लीक हेअर स्टाइल कॅरी केली होती. प्रेग्नेंट करीनाने या सुपर स्टायलिश लुकसाठी केवळ गोल्ड हुप ईअररिंग्स घातले होते.

(काजल अग्रवालचा सुंदर ब्रायडल लुक, लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके दिवस)

​ग्लॅमरस शिमरी ड्रेस

या दिवसांत करीना कपूर (Kareea Kapoor Khan) ग्लॅमरस ड्रेस देखील परिधान करताना दिसत आहे. प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करणाऱ्या या अभिनेत्रीनं काही दिवसांपूर्वी शिमरी सिल्व्हर ड्रेस परिधान केला होता. या बॉडीकॉन फिटिंग ड्रेसमध्ये करीना सुंदर दिसत आहे. या ड्रेसवर करीनानं स्ट्रॅप्स हील्स घातले होते आणि मेसी हेअरस्टाइल कॅरी केली होती. तसंच लाइट टोन मेकअप केला होता.

(Kareena Kapoor करीना कपूरची ही साडी पाहून लोक भडकले होते, म्हणाले…)

​कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक

करीना कपूर कम्फर्ट फॅशनमध्येही कधीही तडजोड करत नाही. काही दिवसांपूर्वी ती मॅटर्निटी लेगिंग्स लुकमध्ये दिसली होती. या लुकमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काळ्या रंगाच्या लेगिंग्सवर बेबोने डेनिमचे शर्ट परिधान केले होते.

(Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का)

तिचा हा लुक स्टायलिश आणि कम्फर्टेबल दिसतोय. या लुकसाठी तिनं सोनेरी रंगाच्या फ्लॅट सँडल मॅच केल्या होत्या. बेबोचा हा लुक साधा पण स्टायलिश दिसत होता.

(आलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *