करीना कपूरला ‘या’ ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल, म्हणाले…

Spread the love

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला (Kareena Kapoor Khan) आपल्या स्टाइलमध्ये तडजोड करणं अजिबात पसंत नाही. रेड कार्पेट लुक असो किंवा एखादा कौटुंबिक सोहळा, बेबोची फॅशन नेहमीच अप्रतिम असते. बोल्ड ड्रेसपासून ते जीन्स, ब्लेझर्स आणि मोनोग्राम लुकमध्ये करीनाचे सुंदर अवतारातील फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मनिष मल्होत्रा, प्रबल गुरुंग, गौरी-नैनिका, Gucci आणि H&M यासारख्या शानदार ब्रँडच्या आउटफिट्सचे कलेक्शनतिच्या वॉर्डरोबमध्ये पाहायला मिळतं.

दरम्यान करीना कपूरला बोल्ड लुक कॅरी करताना वेगवेगळे प्रयोग करणंही पसंत आहे. ‘टशन’ सिनेमादरम्यान बेबोनं साइज झीरो फिगर कमावली होती. यावेळेस तिच्या वॉर्डरोबमध्ये शिमर कपड्यांचे सुंदर कलेक्शन पाहायला मिळालं होतं. यानंतर २०१८ मध्ये तिचा ‘वीरे दी वेडिंग’ सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला होता. तैमूरच्या जन्मानंतर करीनानं या सिनेमाद्वारे कमबॅक केलं होतं. या सिनेमाच्या प्रमोशनसाठीही बेबोनं एकापेक्षा एक सुंदर आणि बोल्ड आउटफिट परिधान केले होते. पण जास्त स्टायलिश दिसण्याच्या नादात करीनाला ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता.
(सारा अली खानवर भारी पडली करीना कपूरची स्टाइल, या ड्रेसमुळे मिळाला मोहक लुक)

​स्टायलिश लुकमुळे बेबो झाली ट्रोल

तैमूरच्या जन्मानंतर करीना कपूर-खानने ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाद्वारे कमबॅक केलं होतं. यामध्ये बेबोनं सोनम कपूर, शिखा तल्सानिया आणि स्वरा भास्कर यासारख्या अभिनेत्रींसोबत काम केले. प्रेक्षकांना करीना कपूरचा सिनेमातील लुक प्रचंड आवडला. पण प्रमोशनदरम्यान परिधान केलेल्या पोषाखावरून नेटकऱ्यांनी तिला भरपूर ट्रोल केलं. सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकण्यापूर्वी करीना आणि सोनम कपूर फोटोशूट केलं होतं. या फोटोशूटसाठी करीनाने प्रचंड बोल्ड ड्रेसची निवड केली होती.

(करीना कपूरच्या स्टायलिश अवतारावर भारी पडला मीरा राजपूतचा मोहक लुक)

​करीनाचा बोल्ड ड्रेस

‘वीरे दी वेडिंग’ सिनेमासाठी करण्यात आलेल्या फोटोशूटमध्ये करीनानं ग्रीक फेमस फॅशन डिझाइनर Celia Kritharioti ने डिझाइन केलेला काळ्या रंगाच्या मोनोक्रोमॅटिक आउटफिटची निवड केली होती. या ड्रेसमध्ये स्वीटहार्ट नेकलाइनसह कोर्सेट लुक डिझाइन जोडण्यात आलं होतं. या मोनोक्रोमॅटिक गाउनला आकर्षक लुक देण्यासाठी हाय-थाई स्लिट पॅटर्न देण्यात आलंय. या लुकसाठी करीनानं आकर्षक मेकअप केला होता. यासाठी तिनं स्मोकी आईज, लाइट टोन लिपस्टिक, बीमिंग हाइलाइटर आणि सॉफ्ट कर्ल्स हेअर स्टाइल केली होती. गळ्यामध्ये तिनं केवळ डायमंडचे नेकलेस देखील घातलं होतं.

(प्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दीपिकाने करीनाची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)

​सोनम कपूरची हटके स्टाइल

दुसरीकडे या फोटोशूटसाठी सोनम कपूर आणि रिया कपूरने इंडियन फॅशन डिझाइनर अबू जानी संदीप खोसलाने डिझाइन केलेले आउटफिट्स परिधान केले होते. सोनम आणि रियाने कशीदाकारी हँडमेड स्टायलिश पारंपरिक पोषाखांची निवड केली होती. या पोषाखांमध्ये दोघीही सुंदर दिसत होत्या. काळ्या आणि चंदेरी रंगाच्या लेहंग्यामुळे सोनमला स्टायलिश लुक मिळाला होता. या लेहंग्यावर मायक्रो प्रिंटसह सुंदर एम्ब्रॉयडरी आपण पाहू शकता. तर रिया कपूरने पठाणी सूटची निवड केली होती.

(आलिया भटने बहिणीच्या वाढदिवशी हा महागडा ड्रेस केला होता परिधान, पाहा स्टायलिश फोटो)

​करीना कपूरवर नेटकऱ्यांची टीका

सोनम, रिया आणि करीना कपूरच्या या फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर आल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. बोल्ड ड्रेसवर नेटकऱ्यांनी बेबोवर निशाणा साधला. या आउटफिटवरून नेटकऱ्यांनी तिला अतिशय वाईट पद्धतीने ट्रोल केलं. दरम्यान कपड्यांवरून ट्रोल होण्याची करीना कपूरची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी स्टायलिश लुकवरून तिला अनेकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.

(प्रेग्नेंसीमध्ये करीना-अनुष्का परिधान करताहेत इतके स्वस्त कपडे, तुम्हीही फॉलो करू शकता ही फॅशन)

फॅशनिस्ता बेबो
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *