करीना आणि मलायका अरोरा बुधवारी ( १९ ऑगस्ट) अमृता अरोराच्या (Amrita Arora) घराबाहेर दिसल्या होत्या. यादरम्यान दोघींचंही ड्रेसिंग स्टाइल एकसारखेच होते. करीना पती सैफ अली खानसोबत आपल्या बेस्ट फ्रेंडच्या घरी पोहोचली होती. या दिवसांमध्ये करीना कपूर अतिशय कम्फर्टेबल आउटफिटमध्ये आपल्याला दिसत आहे. अमृताच्या घरी जाताना तिनं निळ्या रंगाची रिप्ड जीन्स परिधान केली होती. ज्यावर वॉश्ड पॅटर्न देखील दिसत होतं.
(करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक)
बॅगी जीन्ससह करीनाने पांढऱ्या रंगाचा स्लीव्हलेस टँक टॉप (Tank Top) परिधान केला होता. तिनं गळ्यामध्ये चेन देखील घातली होती. तिच्या हातामध्ये जीन्सला मॅचिंग असलेलं डेनिम जॅकेट देखील दिसत आहे. या लुकसह तिने काळ्या आणि सोनेरी रंगाचे स्लिपऑन्स घातले होते आणि बन हेअर स्टाइल केली होती.
(सैफीनाच्या लग्नाचे कळताच अमृताने या व्यक्तीला केला होता फोन,खुद्द साराने दिली ही माहिती)
दरम्यान, करीना आणि सैफ (Saif Ali Khan) पुन्हा एकदा आई बाबा होणार आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी त्यांच्या चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर केली होती.

मलायकाचा लुक
मलायकाने देखील करीना प्रमाणेच टँक टॉप लुकची निवड केली होती. पण मलायकाचे स्लीव्हलेस टँक टॉप बॉडी फिट पॅटर्नचे होते. तसंच तिने डोक्यावर निळ्या रंगाची कॅपही घातली होती.
(लॉकडाउनमध्ये करीना कपूरला नणंद सोहा अली खानचे कपडे वापरावे लागले?)
मलायका आणि करीना कपूर दोघींचाही लुक कूल (Cool Look) असाच होता. तुम्हाला हा लुक आवडला असेल तर तुम्ही देखील सहजरित्या कॅरी करू शकता.

(करीना कपूरसारखे कपडे घातल्याने मीरा राजपूत झाली होती ट्रोल, लोक म्हणाले…)
Source link
Recent Comments