करीना कपूर दुसऱ्यांदा होणार आई, गुड न्यूज शेअर केल्यानंतर समोर आली पहिली झलक

Spread the love

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि सैफ अली खानने (Saif Ali Khan) काही दिवसांपूर्वीच आपल्या चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली होती. करीना आणि सैफ दुसऱ्यांदा आई बाबा होणार आहेत. दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गोड बातमी सांगितल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच करीना कपूरची झलक सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळाली. रविवारी (१६ ऑगस्ट) सैफ अली खाननं आपला ५० वा वाढदिवस साजरा केला. सैफच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे व्हिडीओ करीना कपूरने सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडीओमध्ये करीना कपूर तिच्या सध्याच्या आवडीच्या आउटफिटमध्ये चाहत्यांना दिसली.


करीना कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर १६ ऑगस्टला सैफच्या बर्थ – डे सेलिब्रेशनचे दोन व्हिडीओ शेअर केले. या व्हिडीओमध्ये सैफने हलक्या गुलाबी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा परिधान केल्याचे दिसत आहे. त्याच्या कुर्त्याचे बटण आणि कॉलर देखील पांढऱ्या रंगाचे होते.


(सैफीनाच्या लग्नाचे कळताच अमृताने या व्यक्तीला केला होता फोन,खुद्द साराने दिली ही माहिती)

तर करीना कपूर खानने स्टायलिश पण अतिशय कम्फर्टेबल आउटफिटची निवड केली होती. करीना कपूरने कफ्तान ड्रेस परिधान केला होता. राखाडी आणि गुलाबी रंगसंगती असलेला हा ड्रेस सिल्क मटेरिअलचा होता. यावर लायनिंग पॅटर्न देखील होते. ड्रेसवर प्लीट्स लुक देण्यासाठी बेबोने चॉकलेटी रंगाचा लेदर बेल्ट घातला होता.
(करीना कपूरसारखे कपडे घातल्याने मीरा राजपूत झाली होती ट्रोल, लोक म्हणाले…)


तिच्या या ड्रेसची व्ही-शेप नेकलाइन होती. यावर करीनाने स्टेटमेंट इअररिंग्स मॅच केले होते. या इअररिंग्सचे रंग तिच्या ड्रेसशी मिळतेजुळते होते. बेबोने अतिशय कमी मेक अप केला होता. तिनं आपल्या डोळ्यांच्या पापण्यांना आयलाइनरने हायलाइट केले होतं. तिने ‘टाइट स्लीक बन’ अशी हेअर स्टाइल केली होती.
(लॉकडाउनमध्ये करीना कपूरला नणंद सोहा अली खानचे कपडे वापरावे लागले?)


दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये करीना कपूर- खान बऱ्याचदा कफ्तान ड्रेसमध्येच पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्याच ड्रेसमध्ये तिचे चार ते पाच फोटो सोशल मीडियावर दिसत आहेत. या फोटोंमध्ये तिचा लुक अतिशय कम्फर्टेबल आहे आणि आपल्या कुटुंबीयांसोबत वेळ एन्जॉय करताना ती दिसत होती.


(करीना कपूरचा हा अवतार पाहून सर्व झाले स्तब्ध, इव्हेंट संपल्यानंतर लक्षात आली चूक)
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *