करोना व वायू प्रदुषणापासून मुलांना सुरक्षित ठेवायचं असल्यास अशी वाढवा त्यांची रोगप्रतिकारक शक्ती!

Spread the love

रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) म्हणजे आपल्या शरीराचे सुरक्षा कवच असते. जर रोगप्रतिकार शक्ती उत्तम नसेल तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम शरीराला भोगावे लागतात. लहान मुले आणि अतिप्रौढ अर्थात जेष्ठ व्यक्ती यांचे शरीर हे कमजोर आणि संवेदनशील असते. अशा शरीराला विविध आजार आणि रोग सहज लक्ष्य करतात. म्हणून खास करून लहान मुलांची शक्य तितकी काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते. प्रदुषणाची (air pollution) समस्या तर आपल्याला दिवसागणिक विळखा घालतच आहे मात्र कोरोना (corona virus) सारखे संकटही अजून टळलेले नाही.

अशावेळी लहान मुलांच्या आरोग्य सर्वाधिक धोक्यात येत आहे व त्याचा थेट परिणाम होत आहे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर! आज आपण या लेखातून जाणून घेऊया की वाढते प्रदूषण आणि कोरोना महामारीच्या या विळख्यात आपण लहान मुलांचे आरोग्य कसे जपू शकतो आणि ते आरोग्य उत्तम राहावे म्हणून त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी काय काय करू शकतो.

प्रदुषणाची समस्या

रोज बातम्यांना दाखवले जाणारे वाढते प्रदुषणाचे अहवाल आहून प्रत्येक पालकाला आपल्या मुलाच्या आरोग्याबाबत काळजी वाटू लागली आहे. एकीकडे प्रदूषण आहे आणि दुसरीकडे करोना, कारण करोना विषाणू लहान मुलांना अधिकाधिक लक्ष्य कतो हे एव्हाना सिद्ध झालेले आहे. या स्थितीमध्ये पालकांनी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल आणि त्यांचे शरीर स्वत:च विविध आजारांपासून मुलांना दूर कसे ठेवेल यावर भर देणे गरजेचे आहे. आता आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत, ज्या वापरून तुम्ही मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकता आणि त्यांना प्रदूषण आणि करोना संकटाशी लढा देण्याकरता सक्षम बनवू शकता.

(वाचा :- बाळाच्या हाडे व स्नायूंना द्यायची असेल बळकटी तर अशी करा खास मालिश!)

व्हिटॅमिन सी

करोनाशी लढण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत गरजेचे आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांच्या आहारात आवर्जून जास्तीत जास्त व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करायला हवा. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की असे कोणते पदार्थ मुलांना खाऊ घालू शकतो ज्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असेल. तर संत्री, टोमॅटो आणि लिंबू पाणी यांसारखे पदार्थ तुम्ही मुलांना खायला देऊ शकता. अजून असे अन्य अनेक पदार्थ व रेसिपी आहे ज्यात व्हिटॅमिन सी आढळते. याबाबत तुम्ही डॉक्टर वा डाएटीशियन यांच्या बोलू शकता.

(वाचा :- मुलांना सतत लघुशंका होणं असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, काय काळजी घ्यावी?)

च्‍यवनप्राश

हो मंडळी च्यवनप्राश सुद्धा खरंच खूप प्रभावी असून मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करू शकतं. अनेकांना च्यवनप्राश हे निरुपयोगी वाटतं पण त्यात अशा अनेक पदार्थांचा समावेश असतो जे शरीराला पोषण देतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आरोग्य सक्षम करतात. तुम्ही मुलाला रोज एक चमचा च्यवनप्राश तरी खाऊ घातले पाहिजे. च्यवनप्राश हे अनेक औषधी वनस्पतींपासून तयार होते जे इम्युनिटी मजबूत राखण्याचे काम करते. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात, त्या तुम्ही आवर्जुन आपल्या मुलाला खाऊ घातल्या पाहिजेत.

(वाचा :- हिवाळ्यात लहान मुलांसाठी घरच्या घरी असं बनवा गाजर-बीटचं सूप!)

पालेभाज्या

आपण आतच पाहिलं की हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते आणि या हिरव्या पालेभाज्या मुलांच्या आरोग्यासाठी खरंच खूप फायदेशीर असतात. कारण यात विविध प्रकारचे पोषण तत्वे असतात. अनेक पालक आपल्या मुलाला दिवसातून दोनदा दूध प्यायला देतात. या दुधात केसर, तुळशीची पाने आणि हळद सुद्धा तुम्ही मिसळू शकता. तुळस आणि हळद रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे शक्य तितके मुलाला हिरव्या पालेभाज्या खाऊ घाला आणी सुदृढ बनवा.

(वाचा :- पहिल्यांदा आई होणा-या महिलांना अभिनेत्री जेनेलिया डिसूझाने दिल्यात ‘या’ खास टिप्स!)

आले

हा एक असा पदार्थ सगळ्यांच्या घरात नेहमीच असतो आणि हा अत्यंत उपयुक्त आणि पौष्टिक पदार्थ आहे. जर मुलाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुम्ही आवर्जून मुलाला आले खायला दिले पाहिजे. जर मुल आले खात असेल तर त्याचे लहान लहान तुकडे कापून किंवा किसून त्याला दुधातून ते खाऊ घाला. जर तुम्ही राहता त्या परिसरात वायूप्रदूषण जास्त असेल तर घरात एयर प्युरीफायर सुद्धा नक्की लावून घ्या. यामुळे घराची हवा शुद्ध होते आणि मुलाला शुद्ध हवा सुद्धा मिळते. तर या टिप्स नक्की वापरा आणि मुलांची काळजी घ्या.

(वाचा :- लहान वयात आई झालेली मीरा राजपूत मुलांना सांभाळताना येणा-या अडथळ्यांवर अशी करते आहे मात!)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *