बॉलिवूडमधील कलाकार आपल्या स्टाइलमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. पण त्यांचे फॅशनमधील प्रयोग रेखा यांच्या पारंपरिक लुकसमोर खरंच फिके पडतात. रेखा यांची पारंपरिक स्टाइल फॉलो करणाऱ्यांची संख्या भलीमोठी आहे. एखाद्या कौटुंबिक सोहळ्यासाठी किंवा लग्नासाठी खास ट्रेडिशनल लुक कॅरी करायचा असल्यास तुम्ही देखील त्यांची स्टाइल सहजरित्या फॉलो करू शकता.
(करीना कपूरला ‘या’ ग्लॅमरस लुकवरून नेटकऱ्यांनी केलं होतं ट्रोल, म्हणाले…)
गोल्डन साडी
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या वेडिंग रिसेप्शनसाठी रेखा यांनी गोल्डन साडीची निवड केली होती. या साडीमध्ये रेखा प्रचंड सुंदर दिसत होत्या, उपस्थितांची नजर त्यांच्यावरच खिळली होती. या मोहक लुकमध्ये सोनेरी व पांढऱ्या रंगाची साडी, ब्लाउजसह भरतकाम केलेली चोळी, सैल कुर्ता, चुडीदार आणि पाच मीटर लांबीचा दुपट्टा या पाच पोषाखांचा समावेश होतो.
(प्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दीपिकाने करीनाची स्टाइल केली कॉपी? फोटो झाले होते व्हायरल)
पारंपरिक वेशभूषा

रेखा यांनी हैदराबादची पारंपरिक वेशभूषा परिधान केलीय, तेथील स्थानिक स्त्रिया निकाह किंवा विवाह सोहळ्यामध्ये अशा प्रकारची वेशभूषा परिधान करतात. रेखा यांनी साडीवर पारंपरिक दागदागिने घातले होते. यामध्ये स्टेटमेंट नेकलेस, मांगटिका, झुमके आणि बांगड्यांचा समावेश होता.
(मौनी रॉयची रफल साडी की मीरा राजपूतचा सिल्क कुर्ता, कोणतं आउटफिट खरेदी करायला आवडेल?)
केशरी आणि गुलाबी रंगाची बनारसी साडी

ईशा अंबानीच्या लग्नसोहळ्यामध्ये रेखा यांनी फेमस फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली नारंगी आणि गुलाबी रंगाच्या बनारसी साडीची निवड केली होती. डबल शेड कॉम्बिनेशन असणाऱ्या या बनारसी साडीमध्ये रेखा मोहक दिसत होत्या. साडीवरने हाताने गोल्डन जरी बॉर्डर तयार करण्यात आली होती. या साडीवर त्यांनी वजनदार चोकर नेकलेस, बांगड्या, मांगटिका आणि केसांमध्ये गजरा माळला होता. तर हातामध्ये मॅचिंग पोटली बॅग घेतली होती.
(हिना खानच्या ‘या’ स्वस्त ड्रेससमोर फिका पडला जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक)
गोल्ड अँड पर्पल कांजीवरम साडी

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या वेडिंग रिसेप्शनसाठी रेखा यांनी गोल्ड अँड पर्पल रंगाची कांजीवरम साडी नेसली होती. या साडीवर त्यांनी सुंदर डिझाइनचे ब्लाउज आणि जांभळ्या रंगाचा दुप्पटा देखील मॅच केला होता. या साडीवर हँडमेड मायक्रो प्रिंट बुटी आपण पाहू शकता. बॉर्डरमुळे साडीला आकर्षक लुक मिळाला आहे. परफेक्ट लुक मिळावा यासाठी रेखा यांनी हातामध्ये गोल्डन रंगाची पोटली बॅग घेतली होती आणि अंगावर पारंपरिक गोल्ड ज्वेलरी घातली होती. मोहक मेकअपसह त्यांनी केसांमध्ये गजरा देखील माळला होता.
(आलिया भटचा ‘हा’ लुक पाहून नेटकऱ्यांना दीपिका पादुकोणची आली आठवण, म्हणाले…)
गोल्ड सिल्क साडी

आकाश अंबानी आणि श्लोका मेहताच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये रेखा यांनी गोल्डन जरीची साडी नेसली होती. त्यांच्या या लुकची प्रचंड चर्चा देखील झाली होती. रेशीम फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेल्या या साडीवर मायक्रो प्रिंट हातानं सुंदर एम्ब्रॉयडरी करण्यात आलीय. त्यांच्या ब्लाउजचे डिझाइन देखील सुंदर आणि हटके होतं. त्यांचा मेकअप देखील परफेक्ट होता. रेखा यांनी अरमान जैन आणि अनिशा मल्होत्रा यांच्या वेडिंग रिसेप्शनसाठीही गोल्ड सिल्कची साडी नेसली होती. त्यांच्या या साडीने सर्वाचं लक्ष वेधून घेतलं होतं.
(काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव)
Source link
Recent Comments