कांजीवरम साडी नव्हे तर रेखा यांनी परिधान केले होते इतके ग्लॅमरस कपडे, फोटोही झाले होते व्हायरल

Spread the love

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा (Rekha) यांच्या चिरतरुण सौंदर्याचे आजही लाखो चाहते आहेत. त्यांचे चिरतरूण सौंदर्य पाहिल्यानंतर रेखा यांनी वयाची साठी ओलांडलीय, यावर कोणाचा विश्वासच बसत नाही. आजही त्यांच्या मोहक सौंदर्यामुळे चाहते मंडळी घायाळ होतात. एव्हरग्रीन रेखा आपल्या स्टाइल आणि सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

कांजीवरम सिल्क साडी आणि आकर्षक मेकअप अशी रेखा यांची ओळख निर्माण झाली आहे. दरम्यान या अभिनेत्रीनं सिल्व्हर स्क्रीनवर देखील असंख्य प्रकारच्या स्टाइल कॅरी करून आपल्या चाहत्यांचे हृदय जिंकलंय. पारंपरिक लुकप्रमाणेच रेखा वेस्टर्न आउटफिट देखील सहजरित्या कॅरी करतात. त्यांचे ग्लॅमरस अवतारातील फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
(स्ट्रेच मार्क्सवरून ट्रोल करणाऱ्यांना मलायकानं दिलं सडेतोड उत्तर, क्रॉप टॉप घालून फ्लॉन्ट केले अ‍ॅब्स)

​काळ्या रंगाची वेलवेट साडी

नेहमीच पारंपरिक अवतारात दिसणाऱ्या रेखा यांनी अनिल अंबानींनी आयोजित केलेल्या एका पार्टीमध्ये काळ्या रंगाची वेलवेट साडी नेसली होती. त्यांचा हा लुक पाहून चाहत्यांना धक्का बसला होता. या पार्टीसाठी रेखा यांनी मोनोक्रोमॅटिक साडीची निवड केली होती. सिल्क आणि वेलवेट यासारख्या फॅब्रिकपासून ही साडी डिझाइन करण्यात आली होती. तर साडीवरील कटआउट स्लीव्ह्ज ब्लाउजने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं होतं. क्लासिक कलर कॉम्बिनेशनमुळे रेखा यांचा लुक अतिशय आकर्षक वाटत होता. याव्यतिरिक्त त्यांनी आपल्या स्टायलिंगवरही विशेष लक्ष दिले होते. स्मोकी आईज, लाल रंगाचे लिपस्टिक आणि वेट हेअरस्टाइलमध्ये रेखा सुंदर दिसत होत्या.

(भारताचे ‘व्हॅक्सिन मॅन’ अदार पूनावालांची पत्नी आहे खूप सुंदर व स्टायलिश, पाहा हे ८ फोटो)

​सिल्क कफ्तान

रेखा आपली वेशभूषा अतिशय मोहकतेने कॅरी करतात. यामुळेच त्यांचा साधा लुक देखील अतिशय सुंदर आणि आकर्षक दिसतो. काही वर्षांपूर्वी रेखा फॅशन डिझाइनर मनीष मल्होत्राच्या स्टोअर बाहेर दिसल्या होत्या. यादरम्यान रेखा यांनी आयव्हरी शेडचा कुर्ता घातल्याचं पाहायला मिळालं. यावर त्यांनी मॅचिंग प्लाजो पँट आणि क्रीम रंगाची ओढणी परिधान केली होती. रेखा यांचे हे आउटफिट सिल्क फॅब्रिकने तयार करण्यात आलं होतं. त्यांचा हा ड्रेस ओव्हरसाइज्ड पॅटर्न डिझाइनमध्ये होता. परफेक्ट लुक मिळावा यासाठी रेखा यांनी डार्क मेकअप केला होता. यावर त्यांनी नॉट हेडबँड देखील मॅच केलं होतं.

(सारा अली खानने शेअर केले मोहक व सुंदर फोटो, कौतुक आणि प्रेमाचा होतोय वर्षाव)

​कुर्ता विथ ओव्हरकोट

रेखा यांचा वेस्टर्न अवतार देखील पारंपरिक लुक प्रमाणे शानदार असतो. या अभिनेत्रीचे स्टायलिश फोटो पाहिल्यानंतर तुम्हालाच याचा अंदाज येईल. क्रीम रंगाच्या सिल्क कुर्त्यासह ओव्हरकोट जॅकेट, मॅचिंग कॅप आणि क्रीम रंगाच्याच दुपट्ट्यामध्ये रेखा प्रचंड सुंदर दिसत होत्या. त्यांचे हे आउटफिट अतिशय साधे पण आकर्षक होते. लाइट टोन मेकअप स्मोकी आईज, लाल रंगाचे लिपस्टिक, सिल्व्हर हूप्स, बीमिंग हायलाइटर, चंदेरी रंगाचे स्पोर्ट शूज अशा अवतारात रेखा प्रचंड हटके दिसत होत्या.

(Celebrity Fashion सुंदरा! ‘या’ टेलिव्हिजन अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो पाहिले? चाहते झाले घायाळ)

​सौंदर्य आणि मोहकता

रेखा यांचे हे दोन्ही फोटो बरेच जुने आहेत. आपल्या पेहरावामध्ये मोहकतेसह आकर्षक लुक कसा जोडावा, याची चांगलीच माहिती रेखा यांना आहे. हे दोन्ही फोटो एका फोटोशूटमधील आहेत. ज्यामध्ये त्यांचा वेगळाच लुक चाहत्यांना पाहायला मिळाला. पहिल्या फोटोमध्ये या अभिनेत्रीनं फिकट गुलाबी रंगाचा ब्लेझर आणि शॉर्ट स्कर्ट परिधान केल्याचे आपण पाहू शकता. तर दुसऱ्या फोटोमध्ये त्यांनी एक मऊ ब्लँकेट अंगावर घेतल्याचे दिसतंय. या दोन्ही फोटोमध्ये त्यांची हटके स्टाइल चाहत्यांना पाहायला मिळाली.

(करीना कपूरसमोर फिका पडला साराचा लुक, अंबानींच्या कार्यक्रमातही बेबोनं मारली बाजी)

ग्लॅमरस लुक

हटके लुक
Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *