काजल अग्रवालचा सुंदर ब्रायडल लुक, लेहंगा तयार करण्यासाठी लागले इतके दिवस

Spread the love

​दररोज २० लोक करत होते लेहंग्याचे काम

काजल अग्रवालचा ब्रायडल लेहंगा सुप्रसिद्ध फॅशन डिझाइनर अनामिका खन्नाने डिझाइन केला आहे. या ब्रायडल लेहंग्यावरील वर्क पूर्णतः हाताने तयार करण्यात आलं आहे. लाल रंगाच्या फॅब्रिकवर हातानं एम्ब्रायडरी करण्यात आल्याचे म्हटलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काजलचा लेहंगा तयार होण्यासाठी जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला होता. तसंच हा लेहंगा तयार करण्यासाठी दररोज २० लोक काम करत होते.

(सारा अली खान व कृति सेनॉनने परिधान केलं एकसारखं आउटफिट? कोणाचा लुक आहे सुपर स्टायलिश)

​एम्ब्रॉयडरी आणि मोत्यांचे वर्क

अभिनेत्रीच्या हँडमेड लेहंग्यावर अत्यंत बारीक स्वरुपातील जरदोजी वर्क करण्यात आलं होतं. यासाठी सोनेरी, चंदेरी आणि रंगीबेरंगी धाग्यांचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण लेहंग्यावर तुम्ही फ्लोरल डिझाइन पाहू शकता.

(गुलाबी रंगाची क्रेझ : कपड्यांपासून ते फॅशनेबल वस्तूंपर्यंत हवाहवासा गुलाबी रंग)

लेहंग्याला युनिक टच देण्यासाठी मोती आणि अन्य सुंदर खड्यांचाही वापर केला गेलाय. लेहंग्याच्या ब्लाउजला प्रिंसेस कट ऐवजी क्वीन अ‍ॅन नेकलाइन कट देण्यात आलं होतं. लेहंग्याच्या ओढणीवरही लेहंग्याशी मॅचिंग असलेली एम्ब्रॉयडरी डिझाइन ठेवण्यात आलं होतं.

(Lakme Fashion Weekमध्ये मृणाल ठाकूरने परिधान केला होता ‘हा’ ड्रेस, किंमत ऐकून बसेल धक्का)

​काजल अग्रवालचे दागिने

काजलने सुप्रसिद्ध ज्वेलरी डिझाइनर सुनीता शेखावत यांनी डिझाइन केलेले दागिने परिधान केले होते. हँड क्राफ्टेड चोकर नेकपीस, ईअररिंग्स, मांगटिका इत्यादी दागिन्यांचा समावेश होता.

(करीना कपूरने परिधान केला आतापर्यंतचा सर्वात सुंदर ड्रेस, चाहत्यांना आवडला लुक)

या दागिन्यांवर पाचू, मोत्यांचे वर्क करण्यात आले होते, ज्यामुळे दागिने प्रचंड आकर्षक दिसत आहेत. काजलचे कलीरे मृणालिनी चन्द्राने डिझाइन केले होते. याच डिझाइनरने प्रियंका चोप्रा आणि सोनम कपूरसाठीही कलीरे तयार केले होते.

(प्रसिद्ध डिझाइनर तरुण तहिलियानीने लाँच केले ब्रायडल लेहंग्यांचे नवं कलेक्शन)

​गौतम किचलूची शेरवानी

लग्नसोहळ्यासाठी नवरदेवाने म्हणजेच गौतम किचलूने ऑफ व्हाइट रंगाची सिल्कची शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी अनीता डोंगरे यांनी डिझाइन केली होती. संपूर्ण शेरवानीवर सोनेरी आणि आयव्हरी रंगाच्या धाग्यांनी हँडमेड एम्ब्रॉयडरी वर्क करण्यात आलं होतं.

(बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा ग्लॅमरस अवतार, तिचे हे स्टायलिश फोटो पाहिले आहेत का?)

फुल स्लीव्ह्ज आणि मँडेरियन कॉलर डिझाइन तुम्ही या शेरवानीमध्ये पाहू शकता. ही शेरवानी डिझाइनरच्या अधिकृत संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. वेबसाइटवर नमूद करण्यात आलेल्या माहितीनुसार या शेरवानीची किंमत एक लाख १५ हजार रुपये एवढी आहे.

(Kareena Kapoor करीना कपूरने पार्टी लुकसाठी ‘या’ लाख रुपयांच्या फुटवेअर केली निवड)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *