काजोलनं शॉर्ट ड्रेसमधील ग्लॅमरस फोटो केला शेअर, चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव

Spread the love

​चाहत्यांनी म्हटलं ‘I Love You Ma’am’

काजोलने इन्स्टाग्रामसह आपल्या दुसऱ्या ऑफिशअल प्लॅटफॉर्मवर ग्लॅमरस अवतारातील फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिनं ए-सिमेट्रिकल डिझाइनचे आउटफिट परिधान केल्याचे आपण पाहू शकता. या आउटफिटमधील वरील भाग प्लेन फॅब्रिकपासून तयार करण्यात आला आहे; ज्यामध्ये हाय नेक, फुल स्लीव्ह्ज आणि बॉडी फिट डिझाइन देण्यात आलं आहे.

(अंकिता लोखंडेच्या सुंदर आणि मोहक ड्रेसचे कलेक्शन, पाहा हे ५ फोटो)

या ए-सिमेट्रिकल स्कर्टवर काळ्या आणि पांढऱ्या रंगाचं स्ट्राइप डिझाइन दिसत आहे. या लुकसाठी काजोलने मेकअप देखील ग्लॅमरस केला होता. यामध्ये तिनं लाल रंगाचं लिपस्टिक लावलं होतं आणि स्टायलिश हेअर स्टाइल केली होती. काजोलचे हे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यास करण्यास सुरुवात केली. तिच्या या लुकचे सर्वांनी कौतुक देखील केलं.

(रणवीर सिंह विचित्र फॅशनमुळे पुन्हा चर्चेत, गळ्यात मोत्यांची माळ घातलेला फोटो केला शेअर)

​शिमरी ड्रेस

काजोलची पारंपरिक कपड्याप्रमाणेच वेस्टर्न आउटफिट्सचीही निवड एकदम शानदार आहे. या फोटोमध्ये तिनं नेव्ही निळ्या रंगाचा शिमरी गाउन परिधान केल्याचे आपण पाहू शकता. या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची कर्वी फिगर सुंदर दिसत आहे. तर दुसरीकडे या अभिनेत्रीनं रेड कार्पेट इव्हेंटसाठी सोनेरी आणि चंदेरी रंगाचा फ्लोर लेंथ गाउन घातला होता. या संपूर्ण आउटफिटवर पूर्णतः सीक्वंस वर्क करण्यात आलं होतं. ज्यामुळे काजोलला ग्लॅमरस लुक मिळाला आहे.

(ऐश्वर्या ते अनुष्कासह यांनीही परिधान केले होते ग्लॅमरस बॅकलेस ड्रेस, फोटोंमुळे उडाला धुरळा)

​पँटसूट लुक

एका प्रमोशनल इव्हेंटसाठी या अभिनेत्रीने निळ्या रंगाचा पँटसूट सेट परिधान केला होता. काजोलनं या स्ट्रेटकट पँटसह फ्रिल आणि पेप्लम ब्लेझर मॅच केलं होतं. या ब्लेझरमध्ये डीप व्ही कट आणि पफ्ड शोल्डर डिझाइन जोडण्यात आलं होतं. यासह काजोलनं ट्रान्सपरंट आणि सॉलिड मिक्स्ड मटेरिअलने तयार करण्यात आलेलं फ्लोरल टॉप परिधान केलं होतं. काजोलचे हे आउटफिट लेबनानी फॅशन डिझाइनर Saiid Kobeisyने डिझाइन केलंय.

(मौनी रॉयची रफल साडी की मीरा राजपूतचा सिल्क कुर्ता, कोणतं आउटफिट खरेदी करायला आवडेल?)

​बोल्ड नेकलाइन आउटफिट

काजोल आपली कर्वी फिगर अतिशय आत्मविश्वासाने फ्लाँट करते. ती प्लंजिंग किंवा फिटिंग ड्रेस अतिशस सहजरित्या परिधान करते. एक अवॉर्ड शोसाठी या अभिनेत्रीनं पिस्ता रंगाचे पँटसूट परिधान केलं होतं.

(को-स्टारच्या पार्टीमध्ये दीपिका पादुकोणची हजेरी, स्टायलिश पारंपरिक ड्रेस केला होता परिधान)

यामध्ये ब्लेझर पोर्शनवर केप डिझाइनसह लेसचा वापर करण्यात आला होता. या ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन आपण पाहू शकता. यामुळे काजोलला बोल्ड लुक मिळाला होता, शिवाय तिच्या या लुकची प्रचंड चर्चा देखील झाली होती.

(आलिया भटने बहिणीच्या वाढदिवशी हा महागडा ड्रेस केला होता परिधान, पाहा स्टायलिश फोटो)


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *