कुरकुरीत चिकन पकोडा रेसिपी

Spread the love

How to make: कुरकुरीत चिकन पकोडा रेसिपी

Step 1: बाउलमध्ये सर्व सामग्री एकत्र घ्या

एका मोठ्या बाउलमध्ये एक कप मैदा, कॉर्न फ्लोर, तांदळाचं पीठ, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे धणे पूड, दीड चमचा मिरपूड, दोन चमचे हळद, दोन अंडी, चिरलेले लसूण, किसलेले आले, कढीपत्ता, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरेपूड, एक चमचा चिकन मसाला, एक चमचा हिंग, अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि कोथिंबीर एकत्र घ्या. सर्व सामग्री नीट मिक्स करा. यानंतर बारीक चिरलेले कांदे देखील घाला.

Step 2: पिठात चिकन मिक्स करा

बाउलमध्ये थोडंसं पाणी ओता व सर्व सामग्री एकजीव करून घ्या. यानंतर बाउलमध्ये चिकन मिक्स करा. पकोड्यांची चव अधिक वाढवण्यासाठी आपण त्यात व्हिनेगर देखील घालू शकता.

chicken pieces

Step 3: पकोडे फ्राय करा

पकोड्याचं मिश्रण सेट होण्यासाठी ३० मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. थोड्या वेळानंतर पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. थोडं थोडं मिश्रण घेऊन पकोडे तळून घ्या. तेलामध्ये कढीपत्ता देखील घालावा. पकोडे नीट फ्राय करून घ्यावेत.

fry pakoras batter

Step 4: चिकन पकोड्यांचा घ्या आस्वाद

गरमागरम पकोडे सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

चिकन पकोडा

Step 5: चिकन पकोडा रेसिपी, पाहा संपूर्ण व्हिडीओ

क्रिस्पी चिकन पकोडा


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *