कुरळ्या केसांची कशी करावी देखभाल? कसं तयार करायचं ‘हे’ हेअर पॅक

Spread the love

​सामग्री –

  • साबुदाणा – चार चमचे
  • दही – दोन चमचे
  • कोरफड जेल – तीन चमचे

(केसगळती रोखण्यासाठी करा हा रामबाण उपाय, महिन्याभरात केसांमध्ये दिसेल आश्चर्यकारक फरक)

​हेअर पॅक तयार करण्याची पद्धत

  • सर्व प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे वाटून घ्या आणि त्याची बारीक पावडर तयार करा.
  • आता गॅसवर एका भांड्यामध्ये ग्लासभर पाणी उकळत ठेवा.
  • उकळत्या पाण्यामध्ये साबुदाण्याची पावडर मिक्स करा.
  • पाच मिनिटे ही सामग्री उकळू द्यावी. यानंतर गॅस बंद करावा.
  • साबुदाण्याचे मिश्रण थंड होऊ द्यावे.

(Hair Care Tips केसांसाठी टॉनिक आहे ग्लिसरीन; मऊ आणि चमकदार केसांसाठी असा करा वापर)

​दही आणि कोरफड जेल

यानंतर कोरफड जेल आणि दही नीट मिक्स करून घ्या. या मिश्रणाची पेस्ट तयार करा. दही व कोरफडची पेस्ट साबुदाण्याच्या मिश्रणात मिक्स करा. तयार आहे साबुदाण्याचे हेअर मास्क (Hair Care Tips). ही पेस्ट मुळांसह संपूर्ण केसांना लावा.

(Winter Hair Care Tips हिवाळ्यात होणाऱ्या कोरड्या केसांच्या समस्येतून हवीय सुटका)

​कसे लावायचे साबुदाण्याचे हेअर मास्क

केसांमध्ये तेल असल्यास सर्वप्रथम हेअर वॉश करून घ्या आणि केस सुकवा. केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर करू नये. यानंतर ब्रश किंवा हाताच्या मदतीने संपूर्ण केसांना ही पेस्ट लावा. हेअर पॅक लावल्यानंतर शॉवर कॅप घालावी. ४५ मिनिटांनंतर हर्बल शॅम्पूने केस स्वच्छ धुऊन घ्यावेत आणि नैसर्गिक पद्धतीनेच केस सुकवावेत.

(Skin Care Tips आयुर्वेदिक वनस्पतींपासून केस व त्वचेच्या समस्या कशा दूर कराव्यात, जाणून घ्या पद्धत)

​कोरफड जेलचे फायदे

कोरफड जेलच्या वापरामुळे टाळूच्या भागातील रक्तप्रवाह वाढतो. तसंच आपल्या टाळूची त्वचा देखील स्वच्छ होते. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत मिळते. केसगळतीची समस्या रोखण्यासाठी कोरफड जेल एक प्रभावी आणि रामबाण उपाय आहे. कोरफडमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई हे घटक आहेत. या पोषण तत्त्वांमुळे केस मजबूत होण्यास मदत मिळते. कोरफडमध्ये अँटी – इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. यामुळे कोंड्याची समस्या सुद्धा दूर होते.

(Hair Care Tips केसांच्या वाढीसाठी नेमकी काय घ्यावी काळजी? हेअर प्रोडक्ट्सचा कोणत्या क्रमाने करावा वापर)

​गुणकारी दही

प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये दही सहजरित्या आढळतेच. दही आपल्या केसांसाठी वरदान आहे. यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन यासारख्या पोषण तत्त्वांचा साठा आहे. याव्यतिरिक्त दह्यामध्ये लॅक्टोज, लोह आणि प्रोटीन यासह फॉस्फोरसचीही मात्रा पुरेशा प्रमाणात आहे.

(Natural Hair Care टक्कल पडण्याची आहे भीती? केसगळती रोखण्यासाठी या नैसर्गिक तेलांचा)

NOTE केसांशी संबंधित कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


Source link

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *